झी मराठी

भारतीय दूरचित्रवाणी


झी मराठी ही झी एंटरटेनमेंट एंटरप्राइजेस समूहाच्या मालकीची भारतातील दूरचित्रवाणी वाहिनी आहे. या वाहिनीची सुरुवात १५ ऑगस्ट १९९९ मध्ये झाली. २७ मार्च २००५ पर्यंत ही वाहिनी अल्फा टीव्ही मराठी या नावाने ओळखली जात होती. ही वाहिनी मराठी प्रेक्षकांमध्ये अत्यंत लोकप्रिय आहे. या वाहिनीवर दैनंदिन मालिका आणि कथाबाह्य कार्यक्रम दाखवले जातात. झी मराठी एचडी वाहिनी ही २० नोव्हेंबर २०१६ रोजी सुरू झाली. महिन्याच्या रविवारी झी मराठी महाएपिसोड प्रसारित केले जातात.

झी मराठी
सुरुवात१५ ऑगस्ट १९९९
मालक झी एंटरटेनमेंट एंटरप्राइजेस
ब्रीदवाक्य मी मराठी, झी मराठी
देशभारत
मुख्यालय१३५, कॉंटीनेंटल बिल्डींग, डॉ.ॲनी बेझंट मार्ग, वरळी, मुंबई, ४०००१८
जुने नावअल्फा टीव्ही मराठी
भगिनी वाहिनीझी युवा, झी टॉकीज, झी २४ तास, झी वाजवा, झी चित्रमंदिर
प्रसारण वेळसंध्या. ६ ते रात्री ११ (प्राइम टाइम)
संकेतस्थळhttp://www.zeemarathi.com

माहिती

संपादन

सुरुवातीला वाहिनीवर सोमवार ते शुक्रवार मालिका दाखवण्यात येत असे, पण १ जुलै २००७ पासून मालिका सोमवार ते शनिवार दाखवण्यास सुरुवात झाली. २४ जुलै २०१७ पासून झी मराठीने दुपारचा नवा प्राईम टाइम सुरू केला होता, परंतु त्यास लोकांचा प्रतिसाद न मिळाल्याने २५ नोव्हेंबर २०१७ रोजी हा प्राईम टाइम बंद करण्यात आला. १३ फेब्रुवारी २०२३ पासून "आपली दुपार, झी मराठी दुपार" नावाने पुन्हा दुपारी मालिका सुरू केल्या होत्या, पण कमी टीआरपी अभावी दुपारच्या मालिका २७ मे २०२३ रोजी बंद करण्यात आल्या. झी मराठी वाहिनीने जय मल्हार आणि एका लग्नाची दुसरी गोष्ट या मालिकांच्या एपिसोड्सवरून चित्रपट तयार केले आहेत.

कोरोना महामारीमुळे इतिहासात पहिल्यांदाच झी मराठीचे दैनंदिन कार्यक्रम २७ मार्च २०२० ला बंद करण्यात आले, परंतु ८ जून २०२० पासून नवीन लाॅकडाऊन विशेष मालिका सुरू करण्यात आल्या. तसेच १३ जुलै २०२० पासून दैनंदिन कार्यक्रम दाखवण्यास सुरुवात झाली. त्यामुळेच त्यादिवशी मराठी मनोरंजनाच्या शुभारंभानिमित्त संपूर्ण महाराष्ट्रात उत्सव साजरा करण्याचे झी मराठीकडून आवाहन करण्यात आले होते.

मुंबई पोलिसांना कामातून थोडी विश्रांती मिळावी म्हणून झी मराठी दरवर्षी स्वरतरंग हा कार्यक्रम आयोजित करत असे. एप्रिल २०१४ पासून झी मराठीने नक्षत्र या कार्यक्रमाद्वारे दर रविवारी मराठी रंगभूमीवरील अनेक प्रायोगिक आणि व्यावसायिक नाटके दाखवण्यास सुरुवात केली होती. त्यामुळे नक्षत्र कार्यक्रम अल्पावधीतच लोकप्रिय झाला. तसेच झी मराठीने नक्षत्रांचे देणे या कार्यक्रमातून जुन्या लोकप्रिय गायकांची गाणी सादर केली आहेत. मनोरंजनाचा अधिकमास याद्वारे झी मराठीतर्फे दरवर्षी मे अथवा ऑक्टोबर महिन्याच्या दर रविवारी मालिका प्रक्षेपित करण्यात येतात.

झी मराठी वाहिनीने झी मराठी दिशा हे पहिले साप्ताहिक वृत्तपत्र ९ डिसेंबर २०१७ रोजी सुरू केले, पण काही कारणास्तव १२ ऑक्टोबर २०१९ रोजी हे साप्ताहिक बंद करण्यात आले. याबरोबरच खाली डोकं वर पाय (लहान मुलांसाठी उन्हाळी सुट्टीतील मासिक), सुखकर्ता (गणेशोत्सव विशेष मासिक) आणि उत्सव नात्यांचा (दिवाळी विशेष मासिक) ही वार्षिक मासिके सुरू केली होती. तसेच नोव्हेंबर २०१५ साली महिला सक्षमीकरणासाठी झी मराठी जागृती हा नवा उपक्रम सुरू केला.

ॲप्लिकेशन्स

संपादन

झी मराठीने मोबाईल ॲप्स देखील सुरू केले आहेत.

  1. झी मराठी ॲप (ओझी ॲप / झी फाईव्ह ॲप)
  2. तुमचं आमचं जमलं ॲप
  3. होम मिनिस्टर ॲप
  4. किसान अभिमान ॲप
  5. टॅलेंट ॲप

झी मराठीने २०१८ पासून नाटकांची प्रस्तुती करण्यास सुरुवात केली.

  1. हॅम्लेट
  2. आरण्यक
  3. नटसम्राट
  4. अलबत्या गलबत्या
  5. एका लग्नाची पुढची गोष्ट
  6. तिला काही सांगायचंय!
  7. इडियट्स
  8. राजाला जावई हवा
  9. कापूसकोंड्याची गोष्ट
  10. झुंड
  11. तीसरे बादशाह हम!
  12. इब्लिस
  13. नियम व अटी लागू

प्रसारित मालिका

संपादन
प्रसारित दिनांक मालिका वेळ रूपांतरण
२२ ऑगस्ट २०२२ अप्पी आमची कलेक्टर संध्या. ६.३० वाजता
२३ सप्टेंबर २०२४ सावळ्याची जणू सावली संध्या. ७ वाजता बंगाली टीव्ही मालिका कृष्णकोळी
१२ फेब्रुवारी २०२४ पारू संध्या. ७.३० वाजता तेलुगू टीव्ही मालिका मुद्धा मंदारम
१३ मार्च २०२३ तुला शिकवीन चांगलाच धडा रात्री ८ वाजता
८ जुलै २०२४ लाखात एक आमचा दादा रात्री ८.३० वाजता तमिळ टीव्ही मालिका अण्णा
१२ फेब्रुवारी २०२४ शिवा रात्री ९ वाजता ओडिया टीव्ही मालिका सिंदुरा बिंदू
१८ मार्च २०२४ पुन्हा कर्तव्य आहे रात्री ९.३० वाजता हिंदी टीव्ही मालिका पुनर्विवाह - जिंदगी मिलेगी दोबारा
नवरी मिळे हिटलरला रात्री १० वाजता हिंदी टीव्ही मालिका गुड्डन तुमसे ना हो पायेगा
१२ सप्टेंबर २०२२ सातव्या मुलीची सातवी मुलगी रात्री १०.३० वाजता बंगाली टीव्ही मालिका त्रिनयनी

कथाबाह्य कार्यक्रम

संपादन
प्रसारित दिनांक कथाबाह्य कार्यक्रम वार वेळ
९ ऑक्टोबर २०२३ अवघा रंग एक झाला दररोज सकाळी ७ वाजता
८ जून २०२० वेध भविष्याचा सकाळी ८ वाजता
२२ जून २०२४ ड्रामा जुनिअर्स शनि-रवि रात्री ९.३० वाजता

नव्या मालिका

संपादन
प्रसारित दिनांक मालिका वेळ रूपांतरण
लवकरच... लक्ष्मी निवास TBA तमिळ टीव्ही मालिका थवामई थवामिरुंधू
जगद्धात्री बंगाली टीव्ही मालिका जगद्धात्री

जुन्या मालिका

संपादन
  1. १०० डेझ
  2. ३६ गुणी जोडी
  3. ४०५ आनंदवन
  4. अंकुर
  5. अगं अगं सूनबाई काय म्हणता सासूबाई?
  6. अग्गंबाई सासूबाई
  7. अग्गंबाई सूनबाई
  8. अजूनही चांदरात आहे
  9. अधुरी एक कहाणी
  10. अनुबंध
  11. अभिलाषा
  12. अमरप्रेम
  13. अरुंधती
  14. अल्टी पल्टी सुमडीत कल्टी
  15. अवंतिका
  16. अवघाचि संसार
  17. असंभव
  18. असे हे कन्यादान
  19. अस्मिता
  20. आभाळमाया
  21. आभास हा
  22. उंच माझा झोका
  23. ऊन पाऊस
  24. एक गाव भुताचा
  25. एका लग्नाची तिसरी गोष्ट
  26. एका लग्नाची दुसरी गोष्ट
  27. एकाच ह्या जन्मी जणू
  28. कळत नकळत
  29. का रे दुरावा
  30. काय घडलं त्या रात्री?
  31. कारभारी लयभारी
  32. काहे दिया परदेस
  33. कुंकू
  34. कुलवधू
  35. कॉन्स्टेबल कामना कामतेकर
  36. खुलता कळी खुलेना
  37. गाव गाता गजाली
  38. गुंतता हृदय हे
  39. ग्रहण
  40. घरात बसले सारे
  41. घेतला वसा टाकू नको
  42. चंद्रविलास
  43. चूकभूल द्यावी घ्यावी
  44. जगाची वारी लयभारी
  45. जय मल्हार
  46. जाऊ बाई गावात: न पाहिलेली मजा
  47. जागो मोहन प्यारे
  48. जाडूबाई जोरात
  49. जावई विकत घेणे आहे
  50. जुळून येती रेशीमगाठी
  51. टोटल हुबलाक
  52. डिस्कव्हर महाराष्ट्र
  53. ती परत आलीये
  54. तुझं माझं जमेना
  55. तुझं माझं ब्रेकअप
  56. तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं!
  57. तुझ्यात जीव रंगला
  58. तुझ्याविना
  59. तुला पाहते रे
  60. तू चाल पुढं
  61. तू तिथे मी
  62. तू तेव्हा तशी
  63. दार उघड बये
  64. दिल दोस्ती दुनियादारी
  65. दिल दोस्ती दोबारा
  66. दिल्या घरी तू सुखी राहा
  67. देवमाणूस
  68. देवमाणूस २
  69. नकटीच्या लग्नाला यायचं हं
  70. नवा गडी नवं राज्य
  71. नांदा सौख्य भरे
  72. नाममात्र
  73. पसंत आहे मुलगी
  74. पाहिले न मी तुला
  75. पिंजरा
  76. प्रदक्षिणा
  77. बंधन
  78. बाजी
  79. भागो मोहन प्यारे
  80. भाग्यलक्ष्मी
  81. भाग्याची ही माहेरची साडी
  82. मन उडू उडू झालं
  83. मन झालं बाजिंद
  84. मला सासू हवी
  85. मस्त महाराष्ट्र
  86. महाराष्ट्राची किचन क्वीन
  87. माझा होशील ना
  88. माझिया प्रियाला प्रीत कळेना
  89. माझी तुझी रेशीमगाठ
  90. माझे पती सौभाग्यवती
  91. माझ्या नवऱ्याची बायको
  92. मालवणी डेझ
  93. मिसेस मुख्यमंत्री
  94. यशोदा - गोष्ट श्यामच्या आईची
  95. या सुखांनो या
  96. येऊ कशी तशी मी नांदायला
  97. रात्रीस खेळ चाले
  98. रात्रीस खेळ चाले २
  99. रात्रीस खेळ चाले ३
  100. राधा ही बावरी
  101. लवंगी मिरची
  102. लक्ष्मणरेषा
  103. लग्नाची वाईफ वेडिंगची बायकू
  104. लज्जा
  105. लागिरं झालं जी
  106. लाडाची मी लेक गं!
  107. लोकमान्य
  108. वहिनीसाहेब
  109. वादळवाट
  110. वारस
  111. शुभं करोति
  112. शेजारी शेजारी पक्के शेजारी
  113. श्रीयुत गंगाधर टिपरे
  114. सत्यवान सावित्री
  115. साडे माडे तीन
  116. सारं काही तिच्यासाठी
  117. सावित्री
  118. साहेब बीबी आणि मी
  119. स्वराज्यरक्षक संभाजी
  120. हम तो तेरे आशिक है
  121. हृदयी प्रीत जागते
  122. होणार सून मी ह्या घरची
  123. अग्निपरीक्षा
  124. आक्रित
  125. अल्फा स्कॉलर्स
  126. अल्फा बातम्या
  127. आमच्यासारखे आम्हीच
  128. आकाश पेलताना
  129. आम्ही ट्रॅव्हलकर
  130. आमने सामने
  131. अर्थ
  132. अभियान
  133. असा मी तसा मी
  134. बुक शेल्फ
  135. बुवा आला
  136. बोल बाप्पा
  137. भटकंती
  138. चक्रव्यूह एक संघर्ष
  139. कॉमेडी डॉट कॉम
  140. क्रिकेट क्लब
  141. शेफ व्हर्सेस फ्रीज
  142. डार्लिंग डार्लिंग
  143. दे धमाल
  144. डिटेक्टिव्ह जय राम
  145. दिलखुलास
  146. दुहेरी
  147. दुनियादारी
  148. एक हा असा धागा सुखाचा
  149. एका श्वासाचे अंतर
  150. गहिरे पाणी
  151. घडलंय बिघडलंय
  152. गुडमॉर्निंग महाराष्ट्र
  153. गीतरामायण
  154. हा कार्यक्रम बघू नका!
  155. हसा चकट फू
  156. हाऊसफुल्ल
  157. होम स्वीट होम
  158. इंद्रधनुष्य
  159. जगावेगळी
  160. जल्लोष गणरायाचा
  161. जिभेला काही हाड
  162. जोडी नं.१
  163. कथाकथी
  164. खरंच माझं चुकलं का?
  165. किनारा
  166. कोपरखळी
  167. क्या बात है!
  168. मानसी तुमच्या घरी
  169. मेघ दाटले
  170. मिसाळ
  171. मिशा
  172. मृण्मयी
  173. मुंबई पोलीस
  174. नमस्कार अल्फा
  175. नायक
  176. नुपूर
  177. पतंजलि योग
  178. पेशवाई
  179. पिंपळपान
  180. पोलीस फाईल्स
  181. प्रपंच
  182. राम राम महाराष्ट्र
  183. रिमझिम
  184. रेशीमगाठी
  185. ऋणानुबंध
  186. साईबाबा
  187. सांजभूल
  188. सूरताल
  189. शॉपिंग शॉपिंग
  190. श्रावणसरी
  191. थरार
  192. तुंबाडचे खोत
  193. युनिट ९
  194. वाजवू का?
  195. व्यक्ती आणि वल्ली
  196. वस्त्रहरण
  197. युवा
  198. झी न्यूझ मराठी
  199. झाले मोकळे आकाश
  200. झुंज

अनुवादित मालिका

संपादन
  1. झाशीची राणी
  2. जय भीम: एका महानायकाची गाथा

कथाबाह्य कार्यक्रम

संपादन
  1. आम्ही सारे खवय्ये
  2. होम मिनिस्टर
  3. सा रे ग म प (११ पर्वे)
  4. चला हवा येऊ द्या (९ पर्वे)
  5. फू बाई फू (९ पर्वे)
  6. एका पेक्षा एक (७ पर्वे)
  7. सा रे ग म प: लिटील चॅम्प्स (४ पर्वे)
  8. खुपते तिथे गुप्ते (३ पर्वे)
  9. डान्स महाराष्ट्र डान्स (३ पर्वे)
  10. तुफान आलंया (३ पर्वे)
  11. किचन कल्लाकार (२ पर्वे)
  12. बँड बाजा वरात (२ पर्वे)
  13. मराठी पाऊल पडते पुढे (२ पर्वे)
  14. महाराष्ट्राचा सुपरस्टार (२ पर्वे)
  15. हप्ता बंद (२ पर्वे)
  16. हास्यसम्राट (२ पर्वे)
  17. जाऊ बाई गावात
  18. अळी मिळी गुपचिळी
  19. कानाला खडा
  20. झिंग झिंग झिंगाट
  21. डब्बा गुल
  22. डान्सिंग क्वीन
  23. तुमचं आमचं जमलं
  24. बस बाई बस
  25. मधली सुट्टी
  26. मधु इथे अन् चंद्र तिथे
  27. महा मिनिस्टर
  28. महाराष्ट्राची लोकधारा
  29. याला जीवन ऐसे नाव
  30. हे तर काहीच नाय

रिॲलिटी शो

संपादन

झी मराठीने रिॲलिटी शो ही संकल्पना मराठी वाहिनीवर पहिल्यांदा आणली आणि अल्पावधीतच प्रेक्षकांनी तिला डोक्यावर घेतले. या वाहिनीने आतापर्यंत अनेक रिॲलिटी शोजची यशस्वी पर्वे सादर केली आहेत.

चला हवा येऊ द्या

संपादन

निलेश साबळे, भालचंद्र कदम, सागर कारंडे, श्रेया बुगडे, कुशल बद्रिके, भारत गणेशपुरे आणि तुषार देवल यांनी मिळून सुरू केलेला हा कार्यक्रम आहे. याबरोबरच योगेश शिरसाट, अंकुर वाढवे, स्नेहल शिदम, अरविंद जगताप हे सहकलाकार असून रमेश वाणी, विनीत भोंडे, शशिकांत केरकर, मानसी नाईक, संदीप रेडकर यांनी देखील यात काम केलेले आहे. या कार्यक्रमाचे सुद्धा अनेक पर्वे सादर झाली आहेत. महाराष्ट्र दौरा, भारत दौरा, विश्व दौरा, होऊ दे व्हायरल, शेलिब्रिटी पॅटर्न, उत्सव हास्याचा, लेडीज जिंदाबाद, वऱ्हाड निघालंय अमेरिकेला, लहान तोंडी मोठा घास ही ती पर्वे आहेत. हा कार्यक्रम नाटक, चित्रपट, मालिका यांना प्रोत्साहित करण्याचे काम करतो.

फू बाई फू

संपादन
मुख्य लेख: फू बाई फू

फू बाई फू हा झी मराठीवरील काॅमेडी शो आहे. याची ९ पर्वे सादर झाली. यात धूमधडाका, नया है यह, काॅमेडीचं आधारकार्ड, टोल फ्री कॉमेडी, जिथे असाल तिथे हसाल इत्यादी पर्वे होती. निलेश साबळे, वैदेही परशुरामी, सई ताम्हणकर हे सूत्रसंचालक आणि अश्विनी काळसेकर, उमेश कामत, निर्मिती सावंत, महेश कोठारे, रेणुका शहाणेस्वप्नील जोशी या सर्वांनी परीक्षकांचे काम केले आहे.

एका पेक्षा एक

संपादन
मुख्य लेख: एका पेक्षा एक

एका पेक्षा एक हा सचिन पिळगांवकर यांची निर्मिती असलेला नृत्याचा कार्यक्रम आहे. याची एकूण ७ पर्वे सादर झाली होती ज्यात अप्सरा आली हे पर्व‌ विशेष गाजले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आदेश बांदेकर, पुष्कर श्रोत्री यांनी केले असून सचिन पिळगांवकर महागुरू होते.

सा रे ग म प

संपादन
मुख्य लेख: सा रे ग म प

सा रे ग म प या कार्यक्रमाने तब्बल १४ पर्वे सादर केली. यामध्ये वेगवेगळी पर्व ठेवले गेले. पल्लवी जोशी हिने सूत्र संचालनाचे काम केले. त्याची संक्षिप्त माहिती पुढीलप्रमाणे:-

  • स्वप्न स्वरांचे : यामध्ये १८ ते २५ या वयोगटातील स्पर्धकांचा समावेश होता. हे सारेगमपचे पहिले पर्व होते. या पर्वाचा विजेता महागायक पदाचा मान कोल्हापूरचा अभिजीत कोसंबी याला मिळाला. त्यानंतरच्या पर्वाची विजेती महागायिका पदाचा मान जळगावची वैशाली भैसने-माडे हिला मिळाला. अशाचप्रकारे ऊर्मिला धनगर ही देखील विजेती होती. या पर्वांचे परीक्षक गायिका देवकी पंडित, रॉकस्टार अवधूत गुप्ते, संगीतकार अजय-अतुल इत्यादी दिग्गज व्यक्तींनी भूषवले.
  • स्वप्न स्वरांचे ४०+ : या कार्यक्रमामध्ये वय वर्ष ४० वर्षे व त्या पुढील वयाच्या स्पर्धकांनी भाग घेतला होता. या कार्यक्रमाच्या विजेता जोडीचा मान संगिता चितळे व यज्ञेश्वर लिंबेकर यांना तर उपविजेता जोडीचा मान मिरजचे गायक महेश मुतालिक व मुंबईच्या अनुजा वर्तक यांना मिळाला.
  • लिटील चॅम्प्स : या पर्वामध्ये लहानग्यांनी आपल्या सुरांनी जगाला मोहून टाकले. ६ ते १५ वयोगटातील स्पर्धकांनी भाग घेतला होता. या पर्वाला केवळ महाराष्ट्रातीलच नव्हे तर संपूर्ण जगातील प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले. या कार्यक्रमातील एका भागाला लता मंगेशकर यांनी उपस्थिती लावून सर्व स्पर्धकांना आशीर्वाद दिला. याशिवाय इतर अनेक दिग्गज गायकांनी लहानग्यांना शाबासकीची थाप दिली. लिटील चॅम्प्सच्या पहिल्या पर्वाने मराठी संगीत विश्वाला पंचरत्न बहाल केले. पंचरत्न म्हणजे
  • अलिबागची लिटिल मॉनिटर मुग्धा वैशंपायन
  • आळंदीची लिटिल मास्टर कार्तिकी गायकवाड
  • लातूरचा म्युझिक डायरेक्टर रोहित राऊत
  • पुण्याची ॲंग्री यंगगर्ल आर्या आंबेकर
  • रत्‍नागिरीचा उकडीचा मोदक प्रथमेश लघाटे

या कार्यक्रमातूनच घराघरांत पोहोचलेल्या केतकी माटेगांवकरने संगीताबरोबरच मराठी चित्रपटांद्वारे प्रेक्षकांची मने जिंकली. गायिका वैशाली सामंत व गायक-संगीतकार अवधूत गुप्ते या पर्वाचे परीक्षक होते. यासोबतच "सा रे ग म प"ने अनेक यशस्वी पर्वं प्रस्तुत केली. त्यामध्ये महाराष्ट्राचा आजचा आवाज, स्वप्न स्वरांचे सूर ताऱ्यांचे, पर्व नव्हे गर्व, सूर नव्या युगाचा, घे पंगा कर दंगा, इत्यादी पर्वांचा समावेश होता. सर्वच पर्वांना प्रेक्षकांनी प्रचंड प्रतिसाद दिला. झी मराठीने "सा रे ग म प" द्वारे मराठी संगीताला एका वेगळ्या उंचीवर नेले आहे.

पुरस्कार सोहळे

संपादन
वर्ष पुरस्कार संदर्भ
२००० – चालू झी चित्र गौरव पुरस्कार []
२००४ – चालू झी मराठी उत्सव नात्यांचा पुरस्कार []
२०१३ – चालू उंच माझा झोका पुरस्कार []
२०१५ – चालू झी नाट्य गौरव पुरस्कार []

संदर्भ

संपादन
  1. ^ "झी गौरव पुरस्कारात यांनी मारली बाजी, वाचा संपूर्ण यादी". लोकमत. 2019-04-03. 2020-12-05 रोजी पाहिले.
  2. ^ "या मालिकेने मारली झी मराठी अवॉर्ड्समध्ये बाजी, नुकतीच सुरु झालीये ही मालिका". लोकमत. 2019-10-12. 2020-12-05 रोजी पाहिले.
  3. ^ "स्त्री कर्तृत्वाचा सन्मान 'उंच माझा झोका पुरस्कार'". लोकसत्ता. 2017-08-22. 2020-12-05 रोजी पाहिले.
  4. ^ "दिमाखदार सोहळ्यात संपन्न झाला 'झी नाट्य गौरव पुरस्कार'". झी २४ तास. 2020-09-14. 2021-07-20 रोजी पाहिले.