सचिन पिळगांवकर

अभिनेता, दिग्दर्शक, निर्माता, लेखक, गायक

सचिन पिळगांवकर (ऑगस्ट १७, इ.स. १९५७; मुंबई, महाराष्ट्र - हयात) हा मराठी चित्रपट अभिनेता, निर्माता आहेत. त्यांनी मराठी, हिंदी भाषांमधील चित्रपट, दूरचित्रवाणी कार्यक्रम, नाटकांतून अभिनय केला आहे. इ.स. १९६२ सालच्या हा माझा मार्ग एकला या मराठी चित्रपटाद्वारे वयाच्या चौथ्या वर्षी त्याचे चित्रपटक्षेत्रात पदार्पण झाले. ते उत्तम अभिनेते आहेत.[१]

सचिन
जन्म सचिन पिळगांवकर
ऑगस्ट १७, इ.स. १९५७
मुंबई, महाराष्ट्र
इतर नावे सचिन
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र अभिनेता, दिग्दर्शक, निर्माता आणि गायक.
भाषा स्वभाषा: मराठी,
अभिनय: मराठी, हिंदी
प्रमुख चित्रपट
  • हिंदी- शोले, सत्ते पे सत्ता आणि नादिया के पार.
  • मराठी- अशी ही बनवाबनवी , आयत्या घरात घरोबा , गंम्मत जंमत आणि आमच्या सारखे आम्हीच.
पुरस्कार राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार
पत्नी सुप्रिया पिळगांवकर
अपत्ये श्रेया पेळगावकर.

मराठी अभिनेत्री सुप्रिया पिळगांवकर त्यांची पत्नी आहे.

बालपणसंपादन करा

सचिन पिळगांवकर याचा जन्म मुंबईत एका मराठी-कोकणी परिवारात झाला. इ.स. १९६२ सालच्या हा माझा मार्ग एकला या मराठी चित्रपटातील बाल कलाकाराच्या भूमिकेद्वारे वयाच्या चौथ्या वर्षी त्याचा चित्रपटसृष्टीत प्रवेश झाला. या चित्रपटातील भूमिकेसाठी त्याला सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या हस्ते बालकलाकारासाठीचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला. त्यानंतर बालकलाकार म्हणून त्याने ज्वेलथीफ, ब्रह्मचारी, मेला आणि अन्य १५ चित्रपटांतून भूमिका केल्या.

कारकीर्दसंपादन करा

सचिन ने मराठी आणि हिंदी चित्रपटात अभिनय केला आहे.मराठी चित्रपटात त्यांनी अभिनय, लेखन‌ , दिग्दर्शन आणि काही चित्रपटात गायन केलेले आहे. त्यांनी अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे अश्या मराठी चित्रपटात सृष्टीतील अभिनेत्यांना बरोबर अभिनय केला आहे. सचीन अश्टपेलु कलाकार आहे.

चित्रपटसंपादन करा

  • मराठी चित्रपट-
चित्रपट साकारलेली भूमिका प्रदर्शनाचे वर्ष (इ.स.) भाषा सहभाग
कट्यार  काळजात  घुसली मराठी अभिनय
एकुलती  एक मराठी अभिनय
शर्यत मराठी अभिनय
तिचा  बाप  त्याचा  बाप मराठी अभिनय
आम्ही सातपुते मराठी अभिनय
नवरा माझा नवसाचा मराठी अभिनय
नवरी मिळे नवऱ्याला मराठी अभिनय
हा माझा मार्ग एकला मराठी अभिनय
अशी ही बनवा बनवी मराठी अभिनय
अदला बदली मराठी अभिनय
माझा पती करोड पती मराठी अभिनय
आयत्या घरात घरोबा केदार किर्तीकर, मानकू मराठी अभिनय
अशी ही बनवाबनवी मराठी अभिनय
आमच्या सारखे आम्हीच अभय , कैलाश १९९० मराठी अभिनय,दिग्दर्श,गायनन आणि लेखन.
गम्मत  जम्मत मराठी अभिनय
माझा पती करोडपती मराठी अभिनय
नवरी  मिळे  नवऱ्याला मराठी अभिनय
अष्टविनायक मराठी अभिनय
  • हिंदी चित्रपट-
चित्रपट साकारलेली भूमिका परदर्षणाचे वर्ष कार्य
शोले १९७५ अभिनय
सत्ते पे सत्ता सनि
नदिया के पार

बाह्य दुवेसंपादन कराकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.
  1. ^ "Sachin Pilgaonkar (Actor) Height, Weight, Age, Wife, Biography & More | StarsUnfolded". starsunfolded.com (en-GB मजकूर). 2018-07-13 रोजी पाहिले.