भोजपुरी भाषा
भोजपुरी ही भारत देशामधील एक बोलीभाषा आहे. हिंद-आर्य भाषासमूहामधील भोजपुरी भाषा प्रामुख्याने उत्तर प्रदेश, झारखंड व बिहार राज्यांत तसेच पूर्व नेपाळमध्ये वापरली जाते. इतरत्र भोजपुरी भाषा गयाना, सुरिनाम, फिजी व मॉरिशस ह्या देशांमध्ये देखील वापरात आहे.
भोजपुरी 𑂦𑂷𑂔𑂣𑂳𑂩𑂲 | |
---|---|
स्थानिक वापर | भारत, नेपाळ, मॉरिशस |
लोकसंख्या | ४ कोटी |
भाषाकुळ | |
लिपी |
देवनागरी कैथी |
अधिकृत दर्जा | |
प्रशासकीय वापर | मधेश (नेपाळ) |
भाषा संकेत | |
ISO ६३९-२ | bho |
ISO ६३९-३ | bho (विदागारातील आवृत्ती वेबॅक मशिनवर) |
पण जवळपास ८ कोटी लोकांची मातृभाषा असून देखील या भाषेला भारतामध्ये अधिकृत भाषा म्हणून मान्यता नाही. अलीकडेच या भाषेला मान्यता मिळावी म्हणून आंदोलने होत आहेत..