विकिपीडिया ([२]) हा महाजालावरील एक मुक्‍त ज्ञानकोश आहे. महाजालावरील ह्या ज्ञानकोशात कुणालाही नव्याने लेख लिहिता येतो तसेच आधी लिहिलेल्या लेखाचे संपादन करता येते. विकी हे सॉफ्टवेयर वापरून हा ज्ञानकोश तयार केला आहे. विकिपीडियातील मजकूर हा मुक्त स्वरूपात उपलब्ध आहे. म्हणजे उचित श्रेयनिर्देश करून हा मजकूर कुणालाही कोणत्याही कारणासाठी (व्यावसायिक देखील) आहे तसा अथवा त्यात बदल करून वापरण्यास मोकळीक आहे. मात्र बदल करून वापरताना कोणते बदल केले आहेत ह्याचे निर्देश करणे आवश्यक आहे. तसेच अशी आधारित वा बदल करून तयार केलेली सामग्री वितरित करताना ती मुक्त स्वरूपातच वितरित करणे आवश्यक असते.[१]

विकिपीडिया
उद्योग क्षेत्र इंटरनेट, संगणक सॉफ्टवेर
स्थापना जानेवारी १५, २००१
मुख्यालय अमेरिका
संकेतस्थळ [१]

विकिमिडिया फाउंडेशन ही ना नफा-ना तोटा तत्त्वावर चालणारी संस्था ह्या ज्ञानकोशाच्या व्यवस्थेचे आणि नियंत्रणाचे काम पाहत आहे.

जिमी वेल्स आणि लॅरी सँगर ह्यांनी विकिपीडियाची सुरुवात १५ जानेवारी २००१ ह्या दिवशी इंग्रजी भाषेत केली.[२] आजघडीला जगातील विविध भाषांत ह्या ज्ञानकोशाच्या शाखा उपलब्ध आहेत.[३][४] विविध भाषांचे भाषक आपापल्या भाषेतील ज्ञानकोशाच्या निर्मितीत सहभागी होऊ शकतात. मराठी विकिपीडिया हा ह्या ज्ञानकोशाची मराठी भाषेतील शाखा आहे. विकिपीडियाचा सर्वांनाच खूप फायदा होतो.

मराठी विकिपीडियावर (या पानानुसार)सध्या यात ६४,३८३ लेख आहेत. तर संपूर्ण विकिपीडिया प्रकल्पांतर्गत आजतागायत एकूण तीन कोटींहून अधिक लेख जगातील विविध भाषात मिळून लिहीले गेले आहेत.

विकिपिडीयाची वैगुण्ये गृहित धरूनसुद्धा मुक्त सार्वत्रिक उपलब्धतेमुळे, विविध विषयांच्या व्यापक परिघामुळे, सहज शक्य असलेल्या चर्चा आणि सतत सुधारणा ह्यांमुळे विकिपीडिया हा आज महाजालावरील सर्वाधिक वापरला जाणारा ज्ञानकोश झाला आहे. मराठीतील विकिपिडीया इतर भाषांप्रमाणेच गूगल सारखी शोधयंत्रे वापरून शोधता येतो.

विकिपीडियाची वैशिष्ट्येसंपादन करा

बाह्य दुवेसंपादन करा

मनोगतसंपादन करा

संदर्भसंपादन करा

  1. ^ वापरण्याच्या अटी
  2. ^ कॉक, नेड व युंग, युसुन आणि सिन, टी.; विकिपीडिया ॲण्ड इ-कोलॅबरेशन रीसर्च : ऑपॉर्च्युनिटीज ॲण्ड चॅलँजेस; इंटरनॅशनल जर्नल ऑफ इ-कोलॅबरेशन; १२(२), १-८
  3. ^ विकिपीडियाचे मुख्य पान
  4. ^ विविध भाषांतील विकिपीडियांची यादी