इ.स. २००१
वर्ष
सहस्रके: | इ.स.चे ३ रे सहस्रक |
शतके: | २० वे शतक - २१ वे शतक - २२ वे शतक |
दशके: | १९९० चे - २००० चे - २०१० चे - २०२० चे - २०३० चे |
वर्षे: | २००८ - २००९ - २०१० - २०११ - २०१२ - २०१३ - २०१४ |
वर्ग: | जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती |
ठळक घटना आणि घडामोडी
संपादनजानेवारी-जून
संपादन- जानेवारी १३ - एल साल्वाडोरमध्ये भूकंप. ८००हून अधिक ठार.
- जानेवारी १६ - कॉॅंगोचा अध्यक्ष लॉरें-डेझरे कबिलाची त्याच्याच अंगरक्षकाकडून हत्या.
- जानेवारी २६ - गुजरात मध्ये ७.७ तीव्रतेचा भूकंप. २०,००० ठार.
- जानेवारी २६ - व्हेनेझुएलात सिउदाद बॉलिव्हार जवळ डी.सी.३ जातीचे विमान कोसळले. २४ ठार.
- फेब्रुवारी ६ - सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करण्यास आणि तंबाखूपासून बनविण्यात आलेल्या सर्व उत्पादनांची जाहिरात करण्य़ावर बंदी घालणाऱ्या 'तंबाखू उत्पादने' विधेयकाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजूरी.
- फेब्रुवारी ६ - पश्चिम रेल्वेचे मुख्यालय असलेल्या चर्चगेटच्या इमारतीला शंभर वर्षे पूर्ण झाल्याबद्दल डाक विभागातर्फे टपाल तिकीट प्रसिद्ध.
- फेब्रुवारी ९ - यु.एस.एस. ग्रीनव्हिल ही अमेरिकेची पाणबुडी जपानच्या एहिमे-मारु या जहाजाला आदळली. १७ ठार.
- फेब्रुवारी १३ - एल साल्व्हाडोरमध्ये ६.६ रिश्टर मापनाचा भूकंप. ४०० ठार.
- फेब्रुवारी २८ - अमेरिकेच्या वॉशिंग्टन राज्यात रिश्टर मापनपद्धतिनुसार ६.८ तीव्रतेचा भूकंप.
- मार्च ३ - अमेरिकन वायु दलाचे सी.२३ जातीचे विमान जॉर्जियात कोसळले. २१ ठार.
- मार्च २- बामियानचे बुद्धांचा दोन उभ्या मूर्त्या नाश करण्यास तालिबान्यांनी सुरुवात केली .
- एप्रिल २८ - डेनिस टिटो हा पैसे देउन अंतराळात प्रवास करणारा पहिला अंतराळ प्रवासी झाला.
- मे २३ - एव्हरेस्ट शिखर प्रथमच भारतीय लष्कराच्या पथकाकडून सर.
- मे २५ - कॉलोराडोतील बोल्डर शहराचा एरिक वाइहेनमायर हा एव्हरेस्ट सर करणारा प्रथम अंध व्यक्ती ठरला. त्याच्या बरोबरचा न्यू कनान, कॉनेटिकटचा शेरमान बुल सगळ्यात वयस्कर व्यक्ती (६४ वर्षे) ठरला
- जून ७ - युनायटेड किंग्डममधील निवडणुकांत टोनी ब्लेरच्या नेतृत्वाखाली लेबर पार्टीला मोठे बहुमत.
- जून २० - परवेझ मुशर्रफ पाकिस्तानच्या राष्ट्राध्यक्षपदी.
जुलै-डिसेंबर
संपादन- जुलै ३ - व्लादिवोस्तोकिया एरलाइन्सचे टी.यु.१५४ प्रकारचे विमान इर्कुट्स्क येथे कोसळले. १४५ ठार.
- जुलै १८ - अमेरिकेच्या बाल्टिमोर शहरातील बोगद्यात रेल्वे गाडी रुळांवरून घसरली व पेटली. शहराचा मध्यवर्ती भाग बंद करावा लागला.
- जुलै २४ - सिमिओन सॅक्स-कोबर्ग-गोथा बल्गेरियाच्या पंतप्रधानपदी.
- जुलै २८ - अलेहांद्रो टोलेडो पेरूच्या राष्ट्राध्यक्षपदी.
- ऑगस्ट ९ - इस्रायेलची राजधानी जेरुसलेममध्ये दहशतवाद्यांच्या बॉम्बहल्ल्यात १५ ठार व १३० जखमी.
- सप्टेंबर ९ - नॉर्दन अलायन्सचा प्रमुख अहमदशहा मसूद याची तालिबानकडून हत्या करण्यात आली.
- सप्टेंबर ९ - व्हेनिस येथील आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात भारतीय चित्रपट दिग्दर्शिका मीरा नायर यांच्या मॉन्सून वेडिंग या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा गोल्डन लायन पुरस्कार मिळाला.
- सप्टेंबर ११ - अमेरिकेवरील ९/११ दहशतवादी हल्ल्यात जवळ जवळ ३,००० नागरिक ठार. अल कायदा संघटनेच्या अतिरेक्यांनी ४ प्रवासी विमानांचे अपहरण करून वर्ल्ड ट्रेड सेंटर, न्यू यॉर्क; पेंटागॉन, वॉशिंग्टन, डी.सी.; व शान्क्स्वील, पेनसिल्वानिया वर हल्ला केला.
- डिसेंबर १३ - पाकिस्तानी अतिरेक्यांनी भारताच्या संसदेवर हल्ला केला. पाचही अतिरेकी व सुरक्षा कर्मचाऱ्यांसह ८ अन्य व्यक्ती ठार.
- डिसेंबर २१ - देशावरील आर्थिक संकट आणि शहरांमधील दंगलींना जबाबदार ठरवून आर्जेन्टिनाच्या अध्यक्ष फर्नान्डो देला रुआची हकालपट्टी.
- डिसेंबर २२ - काबुल, अफगाणिस्तानमध्ये बुरहानुद्दीन रब्बानीने सत्तेची सूत्रे हमीद करझाईला दिली.
- डिसेंबर २२ - रिचार्ड रीड, शू बॉम्बरने अमेरिकन एरलाइन्स फ्लाइट ६३मध्ये आपल्या बुटात लपविलेली स्फोटके उडविण्याचा प्रयत्न केला.
- डिसेंबर २९ - पेरूची राजधानी लिमाच्या ऐतिहासिक मध्यवर्ती भागात आग. २७४ ठार.
- डिसेंबर ३० - आर्जेन्टिनात ब्युएनोस एर्सच्या रिपब्लिका क्रोमेन्योन नाईटक्लबमध्ये आग. १९४ ठार.
जन्म
संपादनमृत्यू
संपादन- जानेवारी ३ - सुशीला नायर, भारतीय आरोग्यमंत्री.
- जानेवारी १६ - पंडितराव बोरस्ते, भारतीय क्रीडा संघटक, शिवछत्रपती पुरस्कार विजेता.
- फेब्रुवारी ६ - बॅ.विठ्ठलराव गाडगीळ, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी केंद्रीय मंत्री.
- फेब्रुवारी ९ - दिलबागसिंग, माजी हवाई दल प्रमुख, एर चीफ मार्शल.
- फेब्रुवारी १२ - भक्ती बर्वे, मराठी अभिनेत्री.
- मार्च १८ - विश्वनाथ नागेशकर, भारतीय,गोवेकर चित्रकार.
- मे २ - मोहनलाल पिरामल, भारतीय उद्योगपती.
- मे ११ - डग्लस अॅडम्स, ब्रिटिश लेखक, नाटककार.
- मे १३ - आर.के. नारायण, भारतीय इंग्लिश लेखक.
- मे २५ - नीला घाणेकर, गायिका.
- जून २२ - डॉ. अरुण घोष, भारतीय अर्थतज्ञ.
- जून २६ - वसंत पुरुषोत्तम काळे, मराठी साहित्यिक.
- जुलै २१ - शिवाजी गणेशन, तमिळ चित्रपट अभिनेता.
- ऑगस्ट २१ - शरद तळवलकर, मराठी चित्रपटअभिनेते.
- ऑगस्ट २८ - व्यंकटेश माडगूळकर, मराठी लेखक, चित्रकार, शिकारी, पटकथाकार.
- सप्टेंबर ९ - अहमद शाह मसूद , अफगाण लष्करी कमांडर.
- सप्टेंबर १९ - अनंतराव दामले, प्रभात फिल्म कंपनीचे संचालक.
- सप्टेंबर २९ - न्विन व्हान थ्यु, दक्षिण व्हियेतनामचा राष्ट्राध्यक्ष.
- ऑक्टोबर ५ - थॉमस वॉटरफील्ड, ब्रिटिश-भारतीय साहित्यिक.
- नोव्हेंबर १२ - सत्गुरू शिवाय सुब्रमुनियस्वामी, अमेरिकाचे हिंदू गुरू
- डिसेंबर २९ - हर्षद मेहता, भारतीय शेअरदलाल.