Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.

जपान (En-us-Japan.ogg उच्चार )(जपानी- 日本) हा पूर्व आशियामधील एक द्वीप-देश आहे. जपानच्या पश्चिमेला जपानचा समुद्र, चीन, उत्तर कोरिया, दक्षिण कोरियारशिया, उत्तरेला ओखोत्स्कचा समुद्र व दक्षिणेला पूर्व चीन समुद्रतैवान आहेत. आपल्या अतिपूर्वेकडील स्थानामुळे जपानला उगवत्या सूर्याचा देश असे संबोधण्यात येते.

जपान
日本国
निप्पोन-कोकू
जपानचा ध्वज जपानचे चिन्ह
ध्वज चिन्ह
राष्ट्रगीत:

किमी गा यो (君が代?)
जपानचे स्थान
जपानचे जागतिक नकाशावरील स्थान
राजधानी
(व सर्वात मोठे शहर)
टोकियो
अधिकृत भाषा जपानी
सरकार वैधानिक राजतंत्र व सांसदीय लोकशाही
 - राष्ट्रप्रमुख सम्राट अकिहितो (राजा)
 - पंतप्रधान शिंझो अबे
महत्त्वपूर्ण घटना
 - स्वातंत्र्य दिवस फेब्रुवारी ११, इ.स.पू. ६६० 
 - प्रजासत्ताक दिन (वर्तमान राज्यघटना) मे ३, १९४७ 
क्षेत्रफळ
 - एकूण ३,७७,९४४ किमी (६२वा क्रमांक)
 - पाणी (%) ०.८
लोकसंख्या
 - २०११ १२,७९३,६०,०००[१] (१०वा क्रमांक)
 - घनता ३३७/किमी²
वार्षिक सकल उत्पन्न (पीपीपी)
 - एकूण ५.०६८ निखर्व[२] अमेरिकन डॉलर (३वा क्रमांक)
 - वार्षिक दरडोई उत्पन्न ३२,६०८ अमेरिकन डॉलर (२३वा क्रमांक)
मानवी विकास निर्देशांक  (२०१०) ०.८८४[३] (अति उच्च) (११वा)
राष्ट्रीय चलन जपानी येन (JPY)
आंतरराष्ट्रीय कालविभाग जपानी प्रमाणवेळ (JST) (यूटीसी+९)
आय.एस.ओ. ३१६६-१ JP
आंतरजाल प्रत्यय .jp
आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक ८१
राष्ट्र_नकाशा


जपान प्रशांत महासागरामधील एकूण ६,८५२ बेटांवर वसला असून होन्शू, क्युशू, शिकोकूहोकायडो ही येथील चार प्रमुख बेटे आहेत. सुमारे १२.८ कोटी लोकसंख्या असलेल्या जपानचा लोकसंख्येच्या बाबतीत जगात दहावा क्रमांक लागतो. टोकियो हे जपानमधील सर्वात मोठे शहर, राष्ट्रीय राजधानी व जगातील सर्वात मोठे महानगर आहे. प्राचीन इतिहास असलेला हा देश औद्योगिकदृष्ट्या प्रगत असून जपानची अर्थव्यवस्था जगात तिसरऱ्या क्रमांकावर (अमेरिकेची संयुक्त संस्थानेचीनच्या खालोखाल) आहे. येथील राहणीमानाचा दर्जा उच्च असून एका अंदाजानुसार जपानमधील लोकांचे आयुष्यमान जगात सर्वाधिक आहे. वयाची शंभरी म्हणजेच १०० वर्ष पार केलेली लक्षावधी लोक जपानमध्ये आहेत.

अनुक्रमणिका

इतिहाससंपादन करा

जपानला संन्यासी राष्ट्र असेही म्हणतात. जपानला २,००० हून जास्त वर्षांचा लिखित इतिहास आहे.

नावाची व्युत्पत्तीसंपादन करा

जपानी भाषेत जपानला "निहोन" किंवा "निप्पोन" असं म्हणतात. "उगवत्या सूर्याचा देश" असा अर्थ या संबोधनातून व्यक्त होतो.

प्रागैतिहासिक कालखंडसंपादन करा

भूगोलसंपादन करा

जपान देश पूर्णपणे बेटांवर वसला असून त्याची कोणत्याही इतर देशासोबत जमिनीवरील सीमा नाही. होन्शू, क्युशू, शिकोकूहोकायडो ही येथील चार प्रमुख बेटे आहेत. जपानची बव्हंशी लोकसंख्या ह्या चार बेटांवर एकवटली आहे. तसेच रायुकू द्वीपसमूह हा अनेक लहान बेटांचा समूह जपानच्या हद्दीत आहे.

चतु:सीमासंपादन करा

पॅसिफिक महासागरातील द्वीपसमूह असलेला जपान आशियाच्या पूर्व भागात आहे. जपानच्या पश्चिमेस ओखोत्स्कचा समुद्रपूर्व चीन समुद्र आहेत. त्यांपलीकडे चीन, दक्षिण कोरियारशिया हे देश आहेत.

राजकीय विभागसंपादन करा

मुख्य लेख: जपानचे प्रभाग

जपान देश एकूण ८ भौगोलिक प्रदेशांमध्ये व ४७ प्रभागांमध्ये (प्रिफॅक्चर) विभागला गेला आहे.

प्रदेश प्रभाग
होकायडो होकायडो
तोहोकू अकिता · इवाते · ओमोरी · फुकुशिमा · मियागी · यामागाता
कांतो इबाराकी · गुन्मा · कनागावा · चिबा · तोक्यो · तोचिगी · सैतामा
चुबू इशिकावा · ऐची · गिफू · तोयामा · नागानो · निगाता · फुकुई · यामानाशी · शिझुओका
कन्साई ओसाका · क्योतो · नारा · मिई · वाकायामा · शिगा · ह्योगो
चुगोकू ओकायामा · तोतोरी · यामागुची · शिमाने · हिरोशिमा
शिकोकू एहिमे · कागावा · कोची · तोकुशिमा
क्युशू क्युशू बेट: ओइता · कागोशिमा · कुमामोतो · नागासाकी · फुकुओका · मियाझाकी · सागा
रायुकू द्वीपसमूह: ओकिनावा

मोठी शहरेसंपादन करा

शहर प्रांत वस्ती[४]
1 टोकियो टोकियो ८५,३५,७९२
2 योकोहामा कनागावा ३६,०२,७५८
3 ओसाका ओसाका २६,३५,४२०
4 नागोया ऐची २२,२३,१४८
5 सप्पोरो होकायडो १८,८८,९५३
6 कोबे ह्योगो १५,२८,६८७
7 क्योतो क्योतो १४,७२,५११
8 फुकुओका फुकुओका १४,१४,४१७
9 कावासाकी कनागावा १३,४२,२६२
10 सैतामा सैतामा ११,८२,७४४

समाजव्यवस्थासंपादन करा

वस्तीविभागणीसंपादन करा

धर्मसंपादन करा

बौद्ध धर्म हा जपानमध्ये मुख्य धर्म आहे. बौद्ध धर्माचाच शिंतो नावाचा जपानी पंथ येथे अधिक प्रमाणात आहे. जपानच्या लोकसंख्येत ९६% जपानी हे बौद्ध धर्मीय आहेत. जपानमध्ये ख्रिश्चनमुस्लिम धर्मीयही अल्प आहेत. प्रत्येक धर्माची प्रार्थनास्थळे आहेत. काही तरुण जपानी लोक निधर्मी आहेत तसेच प्रत्येकाला स्वत:च्या आवडीचा धर्म स्वीकारण्याची मुभा आहे. त्यामुळे एकाच कुटुंबाचे सदस्य असूनही धर्म वेगवेगळा असण्याची उदाहरणे दिसून येतात.

शिक्षणसंपादन करा

जपान मध्ये मेइजि काळाची पुनःस्थापन करताना (१८७२) मध्ये प्राथमिक,माध्यमिक आणि महाविद्यलयांची स्थापना करण्यात आली.१९४७ च्या नंतर जपान मध्ये प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण (नऊ वर्षांसाठी म्हणजे वयवर्षे ६ पासुन१५पर्यन्त) अनिवार्य करण्यात आले.

संस्कृतीसंपादन करा

राजकारणसंपादन करा

डिसेंबर २०१२ मधील सार्वत्रिक निवडणुकीत लिबरल डेमोक्रॅटिक पार्टीने (एलडीपी) २९४ जागा जिंकून बहुमत मिळविले; तर सत्ताधारी डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ जपानला (डीपीजे) ५७ जागांवर समाधान मानावे लागले. यामध्ये जपानच्या पंतप्रधानपदी शिंझो अबे यांची दुसऱ्यांदा निवड झाली.

अर्थतंत्रसंपादन करा

हेसुद्धा पहासंपादन करा

संदर्भ व नोंदीसंपादन करा

  1. Official Japan Statistics Bureau estimate.
  2. Japan.
  3. Human Development Report 2010.
  4. Japan—City Population. citypopulation.de. 2007-02-01 रोजी पाहिले.

बाह्य दुवेसंपादन करा