ओसाका
ओसाका (जपानी: 大阪; उच्चार (सहाय्य·माहिती)) हे जपान देशामधील एक विशेष दर्जा असलेले शहर आहे. हे शहर जपानच्या होन्शू बेटावर प्रशांत महासागराच्या किनाऱ्यावर वसले असून ते ओसाका ह्याच नावाच्या प्रभागाची राजधानी आहे. २०१२ साली २८.७१ लाख लोकसंख्या असलेले ओसाका हे जपानमधील तिसऱ्या क्रमांकाचे सर्वाधिक लोकसंख्येचे शहर आहे (तोक्यो व योकोहामाखालोखाल). ओसाका-कोबे-क्योटो ह्या महानगर क्षेत्राची लोकसंख्या सुमारे १.८८ कोटी असून ह्या बाबतीत ते जपानमधील दुसऱ्या क्रमांकाचे तर जगातील तेराव्या क्रमांकाचे महानगर आहे.
ओसाका 大阪 |
||
जपानमधील शहर | ||
| ||
देश | ![]() |
|
बेट | होन्शू | |
प्रांत | ओसाका | |
प्रदेश | कन्साई | |
क्षेत्रफळ | २२३ चौ. किमी (८६ चौ. मैल) | |
लोकसंख्या (२०१२) | ||
- शहर | २८,७१,६८० | |
- घनता | १,६९९ /चौ. किमी (४,४०० /चौ. मैल) | |
- महानगर | १,८७,६८,३९५ | |
प्रमाणवेळ | यूटीसी + ९:०० | |
city.osaka.lg.jp |
जपानमधील सर्वात बलाढ्य आर्थिक केंद्रांपैकी ओसाका एक असून मित्सुबिशी, पॅनासॉनिक, शार्प, सॅन्यो इत्यादी अनेक जागतिक कंपन्यांची मुख्यालये ओसाकामध्ये अहेत.
बाह्य दुवेसंपादन करा
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |