योकोहामा

जपान शहर, कानगावा प्रांताची राजधानी

योकोहामा (जपानी: 横浜; ja-Yokohama.ogg उच्चार ) हे जपान देशामधील एक विशेष दर्जा असलेले शहर आहे. हे शहर जपानच्या होन्शू बेटावर प्रशांत महासागराच्या किनाऱ्यावर वसले असून ते कनागावा प्रांताची राजधानी आहे. २०१२ साली ३६.९८ लाख लोकसंख्या असलेले योकोहामा हे जपानमधील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वाधिक लोकसंख्येचे शहर (तोक्यो खालोखाल) तर सर्वाधिक लोकसंख्येची महापालिका आहे. टोकियो महानगराचा भाग असलेले योकोहामा नवीन तैपैखालोखाल जगातील दुसऱ्या क्रमांकाचे उपनगर मानले जाते.

योकोहामा
横浜
जपानमधील शहर


ध्वज
चिन्ह
योकोहामा is located in जपान
योकोहामा
योकोहामा
योकोहामाचे जपानमधील स्थान

गुणक: 35°26′39″N 139°38′17″E / 35.44417°N 139.63806°E / 35.44417; 139.63806

देश जपान ध्वज जपान
बेट होन्शू
प्रांत कनागावा
प्रदेश कांतो
क्षेत्रफळ ४३७.३८ चौ. किमी (१६८.८७ चौ. मैल)
लोकसंख्या  (२०१२)
  - शहर ३६,९७,८९४
  - घनता ८,५०० /चौ. किमी (२२,००० /चौ. मैल)
प्रमाणवेळ यूटीसी + ९:००
city.yokohama.lg.jp


निसान मैदान

योकोहामा जपानमधील एक प्रमुख बंदर असून निसान ह्या बहुराष्ट्रीय मोटार उत्पादन कंपनीचे मुख्यालय येथेच आहे. योकोहामामधील निसान मैदान हे जपानमधील सर्वात मोठे फुटबॉल स्टेडियम असून २००२ फिफा विश्वचषकाचा अंतिम फेरीचा सामना येथे खेळवला गेला होता. तसेच फिफा क्लब विश्वचषकाचे आयोजन योकोहामाने २००५-२००८ व २०११-२०१२ दरम्यान केले होते.

हे सुद्धा पहा संपादन

बाह्य दुवे संपादन

 
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: