मोटारवाहन

(मोटार वाहन या पानावरून पुनर्निर्देशित)

मोटारवाहन, मोटार, मोटारकार किंवा कार हे एक चाके असणारे एक स्वयंचलित वाहन आहे. अनेक व्याख्यांनुसार मोटारवाहनाला चार चाके असतात, ते रस्त्यावर चालते व कमाल ८ प्रवासी त्यामध्ये बसून प्रवास करू शकतात.

कार्ल बेंत्सने निर्माण केलेली जगतील सर्वात पहिली मोटारकार

जगातील पहिली मोटारकार जर्मन संशोधक कार्ल बेंत्स ह्याने १८८५ साली फोर स्ट्रोक इंजिन वापरून बनवली. मोठ्या प्रमाणावर कार उत्पादन करणारा जगातील पहिला कारखाना जनरल मोटर्सच्या ओल्ड्समोबिल कंपनीने १९०२ साली सुरू केला तर हेन्री फोर्ड ह्याने ह्या तंत्राचा मोठ्या प्रमाणावर विकास केला व किफायती दरात मोटारगाड्या विकण्यास सुरुवात केली. विसाव्या शतकाच्या सुरुवातीला व मध्यात मोटारगाड्यांवर मोठ्या प्रमाणात संशोधन झाले व मोटार तसेच मोटार उत्पादन तंत्रांची मोठ्या प्रमाणावर प्रगती झाली.

१९८३ सालापासून उपलब्ध असलेली मारुती ८०० ही भारतामधील पहिली मोठ्या-प्रमाणावर उत्पादित केलेली कार होती.

काही अनुमानांनुसार सध्या जगात सुमारे ६० कोटी मोटारवाहने अस्तित्वात आहेत.[][]

1908 मॉडेल टी ही फोर्ड मोटर कंपनीने बनवलेल्या अमेरिकन कारची सर्वसामान्यांना वापरण्यासारखी पहिली कार होती. अमेरिकेत मोटारींचा वेगाने अवलंब करण्यात आला, जिथे त्यांनी प्राण्यांनी ओढलेल्या गाड्याच्या बदल्यात स्वयंचलित गाड्या वापरायला सुरुवात केली.

जलद उत्पादन

संपादन

१९०१ मध्ये रॅन्सम ओल्ड्सने परवडणाऱ्या मोटारींचे असेंबी-लाइन उत्पादन सुरू केले. मॅसेच्युसेट्सच्या स्प्रिंगफील्डमधील स्प्रिंगफील्ड आर्मोरी येथे १९२१ मध्ये थॉमस ब्लाँकार्ड यांनी अमेरिकेत मोठ्या प्रमाणात उत्पादन आणि विनिमय करण्यायोग्य भागांची असेंब्ली लाइन शैली प्रस्थापित केली होती. हेन्री फोर्डने ही संकल्पना मोठ्या प्रमाणात विस्तारली, १९१३ मध्ये हायलँड पार्क फोर्ड प्लांटमधील कारसाठी जगातील पहिल्या फिरत्या असेंब्ली लाइनला सुरुवात केली.

परिणामी कमी मनुष्यबळ वापरत असताना, फोर्डची उत्पादकता आठपट वाढली. हे इतके यशस्वी झाले, की उत्पादन हे नुसत्या रंग कामा मुळे अडून राहायला लागले. बनला. जपान ब्लॅक हा एकमेव रंग जलद रीतीने कोरडा होऊ शकत होता म्हणून इतर प्रकारचे रंग बंद करण्यात आले. म्हणून त्या काळात फोर्डची any color as long as it's black ही जाहिरात प्रसिद्ध झाली. १९१४ मध्ये असेंब्ली लाइन कामगार चार महिन्यांच्या पगारासह मॉडेल टी खरेदी करू शकला. उच्च वेतन आणि उच्च कार्यक्षमतेच्या संयोगास "फोर्डिझम" असे म्हणले गेले. असेंब्ली लाइनमधून प्राप्त झालेल्या कार्यक्षमतेचा फायदा अमेरिकेच्या आर्थिक वाढीसह देखील झाला.

वाहन उद्योग

संपादन

मोटार वाहन उद्योग जगातील प्रमुख उद्योगांपैकी एक आहे. २०१९ मध्ये जगभरात ९१ दशलक्ष मोटारींचे उत्पादन झाले होते, मागील वर्षाच्या तुलनेत ४ दशलक्ष कमी.[]

अर्ध्याहून जास्त मोटारींचे उत्पादन हे चीन, यूएसए, जपान, जर्मनी व भारत ह्या प्रमुख पाच मोटार उत्पादक देशांमध्ये होते. चीनमध्ये सर्वाधिक वाहनांच (२५ दशलक्ष) उत्पादन होत, त्यानंतर यूएसए (१०.८ दशलक्ष), जपान (९.६ दशलक्ष), जर्मनी (४.६ दशलक्ष) आणि भारत (४.५ दशलक्ष) यांचा क्रमांक लागतो. सर्वात मोठी बाजारपेठ चीन आहे, त्यानंतर यूएसए आहे.

जगभरात रस्त्यावर सुमारे एक अब्ज कार आहेत. ते दरवर्षी सुमारे एक ट्रिलियन लिटर पेट्रोल आणि डिझेल इंधन जाळतात. चीन आणि भारतात कारची संख्या वेगाने वाढत आहे.

संदर्भ

संपादन

International Organization of Motor Vehicle Manufacturers

  1. ^ "WorldMapper – passenger cars". 2017-11-12 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2011-07-13 रोजी पाहिले.
  2. ^ "Cars produced in the world – Worldometers". Worldometers.info. 2007-12-19. 2010-07-11 रोजी पाहिले.
  3. ^ International Organization of Motor Vehicle Manufacturers