जलद परिवहन किंवा जलद वाहतूक ही भूयारी,सब-वे ,उन्नत रेल्वे,मेट्रो या सर्व प्रवाश्यांसाठी शहरी भागातील जास्त क्षमतेच्या,अधिक वारंवारिता असणाऱ्या व ईतर वाहतूकींपासून वेगळ्या असलेल्या,वीजेवर चालणाऱ्या प्रणाली आहेत.[][] ह्या प्रणाल्या एकतर भूमिगत असतात किंवा रस्त्याच्या उंचीपेक्षा उंच रुळांवर असतात. शहरी भागाबाहेर, जलद परिवहन ही इतर रेल्वे रुळांपेक्षा वेगळ्या पद्धतीने जमिनीवर असलेल्या रुळांवरून असते.

न्यू यॉर्क सिटी सबवे हा स्थानके व मार्गांची लांबी लक्षात घेता जगात सर्वात मोठी जलद वाहतूक आहे.
लंडन भूयारी वाहतूकीचे एक स्थानक
हेलसिंकी मेट्रोच्या आतील दृष्य
ताईपेई मेट्रोच्या भूयारी मार्गातील एक भूयार

जरी काही प्रणाली पथनिर्धारित रबरी धाव(गायडेड रबर टायर्स) किंवा चुंबकिय ख-भ्रमण(मॅग्नेटिक लेव्हीटेशन) किंवा मोनोरेल द्वारे चालविल्या जातात,तरी बहुतांश रेल्वे मार्गांवर असलेल्या दोन जलद वाहतूक स्थानकांचे दरम्यान विद्युत बहुआयामी एककाद्वारे सेवा पूरविण्यात येते.या सेवा दुसऱ्या सार्वजनिक वाहतूक सेवांशी एकात्मिक केल्या जातात व त्याच सार्वजनिक वाहतूक प्राधिकरणातर्फे चालविल्या जातात. जलद परिवहन ही ट्राम सेवेपेक्षा जलद आहे.थोड्या अंतरासाठी,कमीत कमी जागेचा उपयोग करून, जास्त प्रमाणात प्रवासी वाहून नेण्याची त्याची क्षमता निर्विवाद आहे.

लंडन भूयारी रेल्वे सेवा ही या प्रकारची प्रथम सेवा होती जी १८६३ मध्ये सुरू झाली. हे तंत्रज्ञान युरोपच्या इतर शहरात लवकरच पोचले.त्यानंतर अमेरिकेत जेथे अनेक उन्नत रेल्वेसेवा सुरू झाल्या.प्रथम, यात बाष्पचलित इंजिन वापरल्या गेले, नंतर या प्रणालीत विद्युत इंजिनांची भर पडली. नुकतीच, आशियात, विनाचालक प्रणालीही सुरू झाली. जगातील १६० पेक्षा जास्त शहरात जलद वाहतूक प्रणाली स्थापण्यात आली आहे व ८००० किमी रेल्वे मार्गांचे जाळे आहे.त्याजी जवळपास ७००० स्थानके आहेत. २५ शहरांत ही प्रणाली स्थापण्यात येत आहे.

न्यू यॉर्क सिटी सबवे ही मार्गांची लांबी(अनुत्पादक मार्गिकांसह) व स्थानकांचे आकडे लक्षात घेता, सर्वात मोठी मेट्रो प्रणाली आहे तर शांघाय मेट्रोलंडन भूयारी रेल्वे ही प्रवासी मार्गांची लांबी लक्षात घेता, मोठ्या आहेत.[] दररोजची व वार्षिक वहन क्षमता बघता, जगातील सर्वात व्यस्त मेट्रो प्रणाली तोक्यो सबवे,मॉस्को मेट्रोसोल मेटोपॉलिटन सबवे ह्या आहेत.

मॉंट्रियल मेट्रोच्या एका स्थानकाचे विशिष्ट थाटात असणारे प्रवेशद्वार.
तोक्यो मेट्रोचे एक स्थानक
लंडनच्या मेट्रोपॉलिटन रेल्वेच्या पूर्वीच्या बांधकामाचे १८६१ मधील एक दृष्य.

व्याख्या

संपादन

मेट्रो हा शब्द सामान्यतः जमीनीखालील जलद वाहतूक प्रणाल्यांसाठी वापरला जातो. तो शहराच्या सर्वात व्यस्त भागातुन, कोणत्या माध्यमाद्वारे जातो त्यावरून शक्यतोवर याचे नाव ठरवितात.बोगदा असेल तर सबवे,[] भूयारी अथवा भूमिगत,[] स्काय टेन, मेट्रो इत्यादी. इंग्रजीमध्ये सब-वे हा शब्द पादचाऱ्यांच्या भूमीखालून जाणाऱ्या रस्त्यांसाठी वापरला जातो.त्याप्रमाणेच भूयारी अथवा नलिका हा शब्द निवडण्यात येतो. स्कॉटलंड मध्ये ग्लासगोच्या जलद वाहतूक सेवेस ग्लासगो सबवे म्हणतात. तसेच पॅरिस शहरामधील भुयारी जलद वाहतूक सेवेचे पॅरिस मेट्रो हेच नाव आहे.

इतिहास

संपादन

वाफेच्या इंजिनपासून जलद वाहतूकीचा उद्भव १९ व्या शतकाच्या शेवटी झाला. या तंत्रज्ञानाचा प्रसार हळूहळू सर्व शहरांत होत गेला. १९४० मध्ये अशा प्रकारच्या १९ प्रणाल्या अस्तित्वात होत्या. अद्ययावत तंत्रज्ञानाने मानव रहित प्रणालीही विकसित केली आहे.

सुचालन

संपादन
 
तुरीन मेट्रोच्या भूयारात.

जलद वाहतूक ही शहरांच्या, समूहांच्या,महानगर क्षेत्रात, उच्च वारंवारितेवर प्रवासी वाहतूकीसाठी वापरतात.वाहतूकीच्या अनेक व्युहरचनेनुसार याची पोच क्षमता बदलते. मोठ्या महानगरात याचा आवाका फक्त आतील शहरी भागांसाठीच किंवा एका विशिष्ट घेऱ्यातील उपनगरांसाठीच असू शकतो.त्यापुढे, मग इतर वाहतूकीच्या साधनांनी जाता येऊ शकते. यात अनेक वाहतूक रेल्वेंची सरमिसळही असू शकते.


 
तायपेई मेट्रोचे एक स्थानक.

जलद वाहतूकीच्या मर्यादा लक्षात घेता, त्यास अनेक पुरवणी वाहतूक व्यवस्था असू शकतात. अनेक शहरांनी , त्यांच्या मुख्य गाभ्यात ट्रामच पसंत केली आहे. त्यानंतर, मेट्रो.दुसरी पर्यायी व्यवस्था अशी आहे की, जलद वाहतूकीच्या थांब्यांपर्यंत बस किंवा ट्राम सेवा पुरविणे. याने शहराच्या अत्यंत व्यस्त असलेल्या मध्यभागात वाहन चालवित जाण्याचा त्रास वाचतो.

टोरांटो मध्ये जवळपास ५० %च्या वर स्थानके ही बस व ट्रामने जोडलेली आहेत. जलद वाहतूक प्रणाल्यांमध्ये उच्च स्थिर आकार राहतो. बहुतांश प्रणाल्या ह्या स्थानिक/राज्य शासनाच्या, वाहतूक प्राधिकरणाच्या किंवा राष्ट्रीय मालकिच्या असतात.त्याचे मालकी हक्क हे खाजगी किंवा खाजगी कंपन्यांकडे राहू शकतात. यांच्या मालकांच्या निगडित बस सेवा किंवा संलग्न खाजगी सेवाही असू शकतात. याचे प्रवास भाडे प्रत्यक्ष लागणाऱ्या खर्चापेक्षा नक्कीच कमी राहते.त्याची तुट,जाहिराती वा शासनातर्फे सुट देऊन करण्यात येते. तिकिटांपासूनचे उत्पन्न व चालविण्याचा खर्च याचा अनुपात हा लाभ दर्शवितो. तो अनेक प्रणालीत १०० %च्या वर आहे.[] व ताईपेई[]

 
आर४६ श्रेणीचा एक डबा. हा डबा १९७५ साली सेवेत टाकण्यात आला होता.
 
'पर्पल लाईन' वर चालणारीबंगळुरू मेट्रो.

वाहिन्या व त्यांची क्षमता

संपादन

प्रत्येक जलद परिवहन प्रणालीत एक वा अनेक वाहिन्या असतात.त्यापैकी एका मार्गावरील प्रत्येक वाहीनीच्या किमान काही वा अनेक स्थानकावर गाडी थांबते.बहुतेक प्रणालीत अनेकविध मार्ग असतात.त्यातील फरक रंगांनी, नावांनी, आकड्यांनी वा या सर्वांच्या मिश्रणाने दाखविण्यात येतात.यातील काही वाहिन्या एकदुसऱ्यांच्या मार्गावर चालू शकतात.काही वाहिन्या एकाच स्थानकावर केंद्रित होऊ शकतात.

एखाद्या वाहिनीची क्षमता ही त्याच्या डब्यांची आसनक्षमता,गाडीची लांबी व गाड्यांची वारंवारिता यांना एकत्रित गुणुन प्राप्त केल्या जाते.जास्त मोठ्या जलद वाहतूकीच्या गाड्यांना ६ ते १२ डबे राहू शकतात. त्यापेकी काहींना ४ किंवा त्यापेक्षाही कमी डबे राहू शकतात.प्रत्येक डब्याची प्रवासी वहन क्षमता १०० ते १५० असते. ती प्रवाश्यांच्या आसनक्षमता व उभे प्रवास करण्याच्या अनुपातात असते. ज्यात उभ्या-उभ्याच प्रवास करण्याची सोय असते ते डबे जास्त प्रवासी वाहू शकतात. प्रवासी वहन क्षमता ही प्रत्येक गाडीत सुमारे १२०० प्रवासी म्हणजे ३६००० प्रवासी प्रती तास.

 
वाहतूकीचा एक नकाशा-त्यात एक मार्ग दाखविला आहे.
 
इले़क्ट्रॉनिक माहिती फलक-सिंगापूर एमआरटी गाडीची सध्याची स्थिती व येणारी स्थानके दर्शविण्यात आली आहेत.

प्रवासी माहिती

संपादन

मार्गाचा नकाशा हा सार्वजनिक वाहतूकीत एक महत्त्वाचा भाग आहे. त्यामुळे, मार्ग व स्थानकांचे ज्ञान होते. त्यात वेगवेगळे मार्ग दाखविणारे वेगवेगळे रंग व संकेत वापरण्यात येतात.ते नकाशे डब्यात,प्लॅटफॉर्मव व स्थानकांवर सहजगत्या दिसेल अशा ठिकाणी लावण्यात येतात .वेळापत्रक हे छापिल स्वरूपात असते. त्याचा उद्देश हा प्रवाश्यांना सेवेची माहिती उपलब्ध करून देणे हा आहे.त्यात अनेक मुद्यांचा अंतर्भाव असतो.[]

 
शिकागो मेट्रोचे एक दृष्य.

दक्षता व सुरक्षा

संपादन

जलद परिवहन हे सार्वजनिक जागेत होते म्हणून सुरक्षेचे प्रश्न उद्भवू शकतात.त्यात छोटे गुन्हे जसे:पाकिटमारी, सामानाची चोरी व जास्त दखलपात्र म्हणजे: हिंसा इत्यादी होतात. सुरक्षेचे उपाय म्हणजे व्हिडियोने देखरेख,सुरक्षा रक्षक तैनात करणे, वाहक नेमणे इत्यादी.काही शहरात, त्यासाठी गाडीत पोलिसही असतात. या तैनातीने विनातिकिट प्रवाशांवरही आळा बसतो व महसूलाचे नुकसानही टळते. अनेक वेळेस, ही वाहतूक दहशतवादाचेही मुख्य लक्ष्य असते.[]

वाहतूकीच्या इतर साधनांशी तुलना केली तर,जलद वाहतूकीचा दर्जा सुरक्षेचे दृष्टीने चांगला आहे,कारण यात अत्यंत कमी अपघात होतात.रेल्वेचे वाहतूक विनियम हे सुरक्षा लक्षात घेता, कडक आहेत. त्यात चांगल्या पद्धती आहेत व त्याचे सुचालन हे जोखिम कमीतकमी ठेवते. दोन वाहिन्यांमुळे समोरासमोर टक्करी अपवादात्मक असतात.कमी गतीने चालण्यामुळे मागुन धडकीची व रुळावरून घसरण्याची शक्यता व तीव्रता कमी करतात.भूयारी रेल्वेत आगीचा धोका बळावतो पण सर्व प्रणालीत गाडी तातडीने रिकामी करण्याबाबत सोय करण्यात आली असते.[१०][११]

पायाभूत संरचना

संपादन
 
पॅरिस मेट्रोबहुतांश जमीनीखालूनच धावते.

बहुतांश जलद वाहतूकीच्या गाड्या ह्या इलेक्ट्रिक बहुआयामी एककांवर(इलेक्ट्रिक मल्टिपल यूनिट्स) वर चालतात.त्यात ३ ते १० डवे असू शकतात.[१२] तिसऱ्या वाहिनीद्वारे किंवा उंच बांधलेल्या तारांद्वारे विद्युत पुरवठा केल्या जातो.लंडन भूयारी रेल्वेचे जाळे हे 'चौथी वाहिनी' वापरते.इतर लिनीयर मोटरचा वापर गती पकडण्यास करतात.[१३] यापैकी अनेक परंपरागत रुळांवरून चालतात, तर काही रबराची धाव असलेली चाके वापरतात जसे-मॉंट्रियल मेट्रोमेक्सिको सिटी मेट्रो.रबरी धावेमुळे जरी अधिक उतारावर व विनागचके प्रवास होत असला तरी त्याच्या देखरेखीचा खर्च जास्त असतो.त्यास जास्त उर्जा लागते.बर्फाळ व दमट वातावरणात त्याचे घर्षण कमी होते[१४] गाडीतील कर्मचाऱ्यांचा खर्च बराच कमी झाला आहे व सध्या अनेक गाड्या स्वयंचलित पद्धतीने विना कर्मचारी धावतात. [१५]

हे सुद्धा पहा

संपादन

संदर्भ

संपादन
  1. ^ "रॅपिड ट्रांझिट (जलद वाहतूक)". Merriam-Webster. 2008-02-27 रोजी पाहिले.; "मेट्रो". International Association of Public Transport. 2010-10-10 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2008-02-27 रोजी पाहिले.(इंग्लिश मजकूर)
  2. ^ "वाहतूक संज्ञावलीचा शब्दसंग्रह". American Public Transportation Association. 2012-02-05 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2008-02-27 रोजी पाहिले.(इंग्लिश मजकूर)
  3. ^ "शांघाय -जगातील सर्वात लांबीची मेट्रो". 4 May 2010. 2010-05-15 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 4 May 2010 रोजी पाहिले.(इंग्लिश मजकूर)
  4. ^ Executive ed.: Joseph P. Pickert... (2000). इंग्लिश भाषेतील अमेरिकन हेरिटेज डिक्शनरी, चौथी आवृत्ती. Houghton Mifflin Company. ISBN 0-618-08230-1. (इंग्लिश मजकूर)
  5. ^ "अंडरग्राउंडची व्याख्या Definition of "Underground"". Chambers Reference Online. 2006-11-28 रोजी पाहिले.(इंग्लिश मजकूर)
  6. ^ MTR Corporation (2008-08-05). "जून २००८ला समाप्त होणाऱ्या सहामाहीचा अंकेक्षण अहवाल" (PDF). 2008-08-21 रोजी पाहिले.(इंग्लिश मजकूर)
  7. ^ "तायपेई रॅपिड ट्रांझिट कॉर्पो. २००८चा वार्षिक अहवाल" (PDF). Taipei Rapid Transit Corporation. p. 96. 2011-12-25 रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. 2010-07-06 रोजी पाहिले.(इंग्लिश मजकूर)
  8. ^ Oslo Sporveier (2005). "आर२०१०" (PDF) (Norwegian भाषेत). p. 4. 2008-09-09 रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. 2008-08-20 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)(इंग्लिश मजकूर)
  9. ^ El Mundo. "El auto de procesamiento por el 11-M" (Norwegian भाषेत). 2008-09-08 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)(नॉर्वेजियन मजकूर)
  10. ^ Office of Hazardous Materials Safety. "जोखमींची तुलना : अपघाती मृत्यु-अमेरिका-१९९९-२००३". U.S. Department of Transportation. 2007-09-07 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2007-09-10 रोजी पाहिले.(इंग्लिश मजकूर)
  11. ^ "रेल्वे विनियमांचे कार्यालय". UK. Health & Safety Executive. 2014-01-27 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2007-09-10 रोजी पाहिले.(इंग्लिश मजकूर)
  12. ^ White, 2002: 64
  13. ^ Sato, Yoshihiko; Matsumoto, Akira and Knothe, Klaus (2002). "रेल्वे अभ्यासाचे पुनर्विलोकन". Wear. 253 (1–2): 130. doi:10.1016/S0043-1648(02)00092-3. 2008-08-21 रोजी पाहिले.CS1 maint: multiple names: authors list (link)(इंग्लिश मजकूर)
  14. ^ Société de transport de Montréal. The Montreal Métro, a source of pride (PDF). p. 6. ISBN 2-921969-08-4. 2009-02-06 रोजी मूळ पान (pdf) पासून संग्रहित. 2012-01-03 रोजी पाहिले.(इंग्लिश मजकूर)
  15. ^ Railway Technology. "Toulouse मेट्रो, France". 2008-08-20 रोजी पाहिले.(इंग्लिश मजकूर)

बाह्य दुवे

संपादन