मोनोरेल ही एका रुळाच्या आधाराने रुळाच्या बाजूने, रुळावरून किंवा रुळाला लटकून धावणारी आगगाडी किंवा तिची परिवहन प्रणाली आहे. या प्रणालीतील रूळ सामान्य लोहमार्गात वापरल्या जाणाऱ्या रुळासारखा लोखंडी असतो किंवा कॉंक्रीटच्या तुळईसारखा असतो. या रुळाला किंवा तुळईला घट्ट धरून किंवा त्यावरून या प्रणालीतील वाहने, अर्थात डबे, सरपटत जातात. अशा प्रणालीतील तुळईला देखील मोनोरेल असे संबोधले जाते. पूर्वी मोनोरेलमध्ये लोखंडी रूळ वापरत. इ.स. १८९७ च्या सुमारास मोनो (एकेरी) आणि रेल (लोखंडी रूळ) या शब्दांपासून मोनोरेल शब्दाची व्युत्पत्ती झाल्याचे आढळते.[] ही परिवहन प्रणाली रेल्वे या वर्गात मोडते[]. मोनोरेल या संज्ञेशी जमिनीपासूनच्या उंचीचा संबंध नसून, प्रामुख्याने एकेरी मार्गिकेच्या आधारावर चालणारी प्रणाली या संकल्पनेशी आहे. जगातील काही शहरांमधे मोनोरेल जमिनीलगत किंवा भुयारातून देखील धावताना आढळतात [ संदर्भ हवा ]. सेयफिज प्रकारच्या उभारणींमधे मोनोरेलचे डबे तुळई किंवा रुळाच्या वरून न सरकता त्यावरून लटकवलेले असतात (उदा. जपान मधील चिबा अर्बन मोनोरेल).

मुंबई मोनोरेल ही भारत देशामध्ये कार्यरत असनारी एकमेव मोनोरेल आहे.
वॉल्ट डिसने वर्ल्ड रिसॉर्टमधील स्ट्रॅडल-बीम प्रकारची डब्लू डी डब्लू मोनोरेल
वॉशिंग्टन (उत्तर अमेरिका) मधील एस सी एस (SCS) मोनोरेल, स्ट्रॅडल-बीम प्रकारची मोनोरेल

मोनोरेल आणि रेल्वेवर आधारित इतर परिवहन प्रणाली

संपादन

खालील वैशिष्ट्ये[] असल्यावरच एखाद्या परिवहन प्रणालीला मोनोरेल म्हणता येईल :

  • मूळ मार्गिका एका लोखंडी रुळाची किंवा सिमेंट अथवा तत्सम तुळईची बनलेली असावी
  • प्रणालीतील वाहन मार्गिकेपेक्षा रुंद असावे

साधर्म्य

संपादन

इतर परिवहन प्रणालींच्या मार्गिकांच्या तुलनेत,

  • या प्रणालीतील मार्गिका इतर परिवहन प्रणाली अथवा पादचारी मार्गांना भेदत नाहीत. प्रणालीतील मार्गिका बहुधा उंचावरून किंवा जमिनीखालून जात असल्यामुळे पूर्णपणे स्वतंत्र व अडथळारहित असतात.
  • या प्रणालीतील मुख्य तुळई वाहनांना आधार देते व मार्गदर्शन करते. या उलट सॅप्पोरो म्युनिसिपल सबवेच्या रबरी टायरवर आधारित मेट्रोमधील वाहने, रबरी टायरवर पळतात व आतील बाजूस असलेली लोखंडी चाके रुळांचा आधार घेऊन फक्त मार्गदर्शन करतात.
  • या प्रणालीत विद्युत ऊर्जा ग्रहणासाठी पॅण्टोग्राफचा वापर होत नाही. त्याऐवजी, मुख्य तुळईवर एका बाजूला वीज वाहक लोकंडी पट्टी असते आणि या पट्टीच्या सतत स्पर्शात असलेला विद्युत ग्राहक वाहनास विजेचा पुरवठा करतो.

मॅगलेव

संपादन

मोनोरेल सोसायटीच्या तुळईच्या व्याख्येला अनुसरून, जर्मनी मधील ट्रान्सरॅपिड व जपान मधील लिनिमो अशा काही प्रणाली वगळता, इतर मॅगलेव प्रणालींचे मोनोरेलमध्ये वर्गीकरण होत नाही. मॅगलेव प्रणालीतील वाहने बहुतांश वेळ तुळईच्या संपर्कात न रहाता, तुळईपासून काही मिलिमीटर अंतरावर चुंबकीय शक्तीच्या आधारे तरंगतात.

इतिहास

संपादन
 
गायरोस्कोपच्या मदतीने संतुलित केलेली (१९०७) ब्रेनान आणि सर्लची मोनोरेल
मुख्य पान: :en:Monorail history

संदर्भ

संपादन