पॅरिस मेट्रो (फ्रेंच: Métro de Paris) ही पॅरिस शहरामधील उपनगरी रेल्वेजलद वाहतूक सेवा आहे. आपल्या स्थानकांच्या वास्तूशास्त्रासाठी पॅरिस मेट्रो जगभर प्रसिद्ध आहे. मुख्यतः जमिनीखालुन भुयारी मार्गांमध्ये धावणाऱ्या ह्या रेल्वेचे १६ मार्ग आहेत व एकूण ३०० स्थानके आहेत. ह्या १६ मार्गांची एकूण लांबी २१४ किमी एवढी आहे. १९ जुलै १९०० रोजी पॅरिस मेट्रोचा पहिला मार्ग सुरू झाला.

पॅरिस मेट्रो
स्थान पॅरिस
वाहतूक प्रकार जलद वाहतूक
मार्ग १६
मार्ग लांबी 214 कि.मी.
एकुण स्थानके ३००
दैनंदिन प्रवासी संख्या ४५ लाख
सेवेस आरंभ १९ जुलै १९००
संकेतस्थळ http://www.ratp.info
मार्ग नकाशा

Carte Métro de Paris.jpg

मॉस्कोखालोखाल पॅरिस मेट्रो ही युरोपातील दुसरी सर्वात वर्दळीची रेल्वे सेवा आहे. दररोज सुमारे ४५ लाख प्रवासी ह्या रेल्वेने प्रवास करतात.

बाह्य दुवे

संपादन

गॅलरी

संपादन
 
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: