रशिया हा आशिया खंडाच्या उत्तर भागातील एक देश आहे. क्षेत्रफळाच्या दृष्टीने रशिया हा जगातील सर्वात मोठा देश आहे. पृथ्वीच्या जमिनी पृष्ठभागाचा ९वा भाग रशियाने व्यापला आहे, असे असले तरी रशियाची लोकसंख्या अतिशय कमी म्हणजे फक्त १४,२९,०५,२०० एवढी आहे. ही लोकसंख्यासुद्धा देशाच्या पश्चिम भागातच एकवटली आहे. मॅास्को ही रशियाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. रूबल हे रशियाचे चलन आहे. ख्रिश्चन व निधर्मी हे येथील प्रमुख धर्म आहेत. दुसऱ्या महायुद्धापर्यंत रशिया ही एक महासत्ता होती, त्यानंतर रशियाची पीछेहाट झाली.
रशिया हा लेख अपूर्ण आहे आणि पूर्ण करण्यास आपण हातभार लावू शकता.
हा लेख संपादित करण्यासाठी येथे टिचकी द्या.
'विकिपीडिया' मध्ये अपूर्ण लेख संपादित करण्यासाठी मदतीचा लेख येथे उपलब्ध आहे.
इ.स. १७२१ साली, पीटर द ग्रेटच्या अधिपत्याखाली रशियन साम्राज्य उदयास आले. इ.स. १६८२ ते १७२५ या काळात पीटर रशियावर राज्य करत होता. त्याने उत्तरेकडच्या महान युद्धातस्वीडिश साम्राज्याचा पराभव केला व स्वीडनकडील प्रदेश स्वतःच्या ताब्यात घेतले. हे प्रदेश बाल्टिक समुद्राला लागून असल्याने रशियाला समुद्रातून व्यापार करणे शक्य झाले. बाल्टिक समुद्राला लागूनच पीटर द ग्रेटने सेंट पीटर्सबर्ग ही राजधानी उभारली.
पीटर द ग्रेटची मुलगी एलिझाबेथ ही पीटरनंतर गादीवर बसली. तिच्या कारकिर्दीत रशियाने सात वर्षीय युद्धात भाग घेतला, व पूर्व प्रशिया जिंकून घेतले. परंतु एलिझाबेथच्या मृत्यूनंतर तिसरा प्योत्र याने हे सर्व विभाग प्रशियाच्या ताब्यात दिले. कॅथेरिन दुसरी किंवा "महान कॅथेरिन" हिने रशियावर इ.स. १७६२-९६ या कालावधीत राज्य केले. हिचा कालखंड रशियाच्या प्रबोधनाचा कालखंड म्हणून ओळखला जातो.
रशिया हा जगातील क्षेत्रफळानुसार सर्वांत मोठा देश आहे. रशियाचे एकूण क्षेत्रफळ १,७०,७५,४०० चौ.किमी. आहे. रशियात २३ जागतिक वारसा स्थळे व ४० राष्ट्रीय उद्याने आहेत.
रशियातील रेल्वे वाहतूक संपूर्णपणे सरकारने चालविलेल्या रशियन रेल्वे मार्फत होते. रशियात एकूण ८५,००० कि.मी.चे रेल्वेमार्ग आहेत.
२००६ साली रशियात ९,३३,००० कि.मी. रस्ते होते. यातील ७,५५,००० कि.मी. रस्ते पक्के होते.