ख्रिश्चन
ख्रिश्चन (ख्रिस्चन) किंवा ख्रिस्ती हे ख्रिश्चन धर्माचे अनुयायी आहेत, जो येशू ख्रिस्ताच्या जीवनावर आणि शिकवणींवर आधारित एकेश्वरवादी अब्राहम धर्म आहे. ख्रिस्त आणि ख्रिश्चन हे शब्द Koine Greek शीर्षक ख्रिस्तोस Christós (Χριστός) या शब्दापासून बनविलेले आहेत, हिब्रू बायबलमधील संज्ञा मशीहा mashiach (מָשִׁיחַ) चे भाषांतर आहे.
ख्रिस्ती धर्म पाळणारे व्यक्ती | |||
माध्यमे अपभारण करा | |||
![]() | |||
प्रकार | religious identity, group of humans | ||
---|---|---|---|
उपवर्ग | believer | ||
ह्याचा भाग | ख्रिश्चन धर्म | ||
चा आयाम | ख्रिश्चन धर्म | ||
धर्म | |||
| |||
![]() |
लोकसंख्यासंपादन करा
२०११ मधील प्यु रिसर्च सेंटरच्या सर्वेक्षणानुसार २०१० मध्ये जगभरात सुमारे २.२ अब्ज (३१%) ख्रिस्ती होते.[१] २०५० पर्यंत ख्रिश्चन लोकसंख्या ३ अब्जांपेक्षा जास्त होण्याची शक्यता आहे.[२] २०१२ च्या प्यू रिसर्च सेंटरच्या सर्वेक्षणानुसार जर सध्याची स्थिती कायम राहिली तर २०५० मध्ये ख्रिस्ती हा जगातील सर्वात मोठा धर्म राहील.[३]
३७% ख्रिस्ती अमेरिकेत राहतात, सुमारे २६% युरोपमध्ये राहतात, २४% उप-सहारा आफ्रिकेत राहतात, १३% आशिया आणि पॅसिफिकमध्ये राहतात आणि १% मध्य पूर्व आणि उत्तर आफ्रिकेत राहतात. जगभरातील सर्व ख्रिस्ती लोकांपैकी निम्मे कॅथोलिक (५०%) आहेत, तर तृतीयांशपेक्षा जास्त प्रोटेस्टंट (३७%) व ऑर्थोडॉक्स (१२%) आहेत. इतर ख्रिश्चन गट जगाच्या उर्वरित भागात आहेत. ख्रिस्ती लोक १५८ देशांत आणि प्रदेशांत आहेत. २८ कोटी ख्रिस्ती अल्पसंख्याक म्हणून जगतात.[४]
ख्रिश्चनांची लोकसंख्या जगभरात सुमारे २१.५ लक्ष (३१%) असून ते मोठ्या प्रमाणात प्रामुख्याने दक्षिण अमेरिका, उत्तर अमेरिका, ऑस्ट्रेलिया, युरोप या खंडांमध्ये आढळतात. आशियाात ख्रिश्चन धर्मीय हे बौद्ध, हिंदू व मुस्लिमांच्या तुलनेत फार कमी आहे परंतु आफ्रिका खंडाची अर्ध्यापेक्षा थोडी कमी लोकसंख्या ही ख्रिश्चन आहे. ख्रिश्चन असा एकमेव धर्म आहे की, ज्याचे प्रत्येक खंडात कोट्यवधी अनुयायी आहेत. जगभरातील लहान मोठ्या अशा सुमारे १५० देशांत ख्रिश्चन बहुसंख्य आहेत. भारताच्या लोकसंख्येत ख्रिश्चनांचे प्रमाण २.३% आहे आणि हा धर्म भारताच्या ४ राज्यांत बहुसंख्य आहे.
संप्रदायसंपादन करा
ख्रिश्चन धर्माचे ३३,०००हून अधिक संप्रदाय असून त्यांना मानणाऱ्या ख्रिश्चनांतही प्रकार आहेत. [५]
ख्रिश्चन सणसंपादन करा
- ॲश वेनसडे
- ईस्टर (पाश्चा)
- गुड फ्रायडे
- ट्रिनिटी सनडे
- नाताळ (ख्रिसमस)
- पाम सनडे
- रिसरेक्शन डे
- लेन्ट
- स्ट्रोव्ह ट्यूसडे (पॅनकेक डे), वगैरे
चित्रसंपादन करा
हे सुद्धा पहासंपादन करा
संदर्भसंपादन करा
- ^ NW, 1615 L. St; Washington, Suite 800; Inquiries, DC 20036 USA202-419-4300 | Main202-419-4349 | Fax202-419-4372 | Media. "The Size and Distribution of the World's Christian Population". Pew Research Center's Religion & Public Life Project (इंग्रजी भाषेत). 2019-09-16 रोजी पाहिले.
- ^ NW, 1615 L. St; Washington, Suite 800; Inquiries, DC 20036 USA202-419-4300 | Main202-419-4349 | Fax202-419-4372 | Media. "The Size and Distribution of the World's Christian Population". Pew Research Center's Religion & Public Life Project (इंग्रजी भाषेत). 2019-09-16 रोजी पाहिले.
- ^ "Christians". Wikipedia (इंग्रजी भाषेत). 2019-09-16.
- ^ "Christians". Wikipedia (इंग्रजी भाषेत). 2019-09-16.
- ^ http://www.philvaz.com/apologetics/a106.htm