बौद्ध
बौद्ध (इंग्रजी: Buddhist / बुद्धिस्ट) हे गौतम बुद्धांनी स्थापन केलेल्या बौद्ध धर्माचे अनुयायी होय. बौद्ध अनुयांयाचे दोन वर्ग आहेत — भिक्खु-भिक्खुणी आणि उपासक-उपासिका. गौतम बुद्ध हे या बौद्धांचे गुरू आहेत. जगातील अतिप्राचीन धर्मांपैकी एक आणि पहिला विश्वधर्म म्हणजे बौद्ध धर्म होय. लोकसंख्येच्या दृष्टीने बौद्ध हा जगातील द्वितीय क्रमांकाचा धर्म आहे. जगभरातील ७ अब्ज लोकसंख्येत १.६ अब्ज ते २.१ अब्ज (२३% ते २९%) लोकसंख्या बौद्ध अनुयायी आहेत.[१][२][३] बौद्ध अनुयायी हे जगातील प्रत्येक खंडात आढळतात मात्र आशिया खंडात हे बहुसंख्यक आहेत. आशिया व्यतिरिक्त युरोपातील बौद्ध बहुसंख्य असलेला काल्मिकिया हा एकमेव प्रजासत्ताक प्रांत (स्वातंत्र्य राज्य) आहे.
हे सुद्धा पहा
संपादनसंदर्भ
संपादन- ^ "Buddhists in the World - The Dhamma - thedhamma.com - Vipassana Foundation". www.thedhamma.com. 2016-01-16 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2018-03-16 रोजी पाहिले.
- ^ "Buddhist Population 1.6 Billion According to Some Experts" (इंग्रजी भाषेत). 2015-10-04. 2022-08-25 रोजी पाहिले.
- ^ "List of Religious Populations | List Religious Populations". www.liquisearch.com. 2018-03-16 रोजी पाहिले.
बाह्य दुवे
संपादनविकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |