भारतीय स्वातंत्र्य दिवस

भारतात राष्ट्रीय सुट्टी
(स्वातंत्र्य दिवस या पानावरून पुनर्निर्देशित)
Dia de la Independencia (es); સ્વતંત્રતા દિવસ (gu); Dia de la Independència de l'Índia (ca); Unabhängigkeitstag (de-ch); Unabhängigkeitstag (de); Independence Day (en-gb); روز استقلال (fa); 印度獨立日 (zh); mam Sa̱t (kcg); Bağımsızlık Günü (tr); 独立記念日 (ja); Indiens självständighetsdag (sv); ඉන්දීය නිදහස් දිනය (si); ಭಾರತದ ಸ್ವಾತಂತ್ರ್ಯೊ ದಿನಾಚರಣೆ (tcy); स्वातन्त्र्यदिनोत्सवः (sa); स्वतन्त्रता दिवस (hi); స్వాతంత్ర్య దినోత్సవం (te); ਸੁਤੰਤਰਤਾ ਦਿਵਸ (pa); স্বাধীনতা দিৱস (as); Independence Day (en-ca); இந்தியாவின் விடுதலை நாள் (ta); Giorno dell'indipendenza dell'India (it); স্বাধীনতা দিবস (bn); jour de l'Indépendance (fr); یوم آزادی (ur); Ημέρα Ανεξαρτησίας της Ινδίας (el); Үндістанның тəуелсіздік күні (kk); Հնդկաստանի անկախության օր (hy); День независимости Индии (ru); भारतीय स्वातंत्र्यदिवस (mr); Tasavallan päivä (fi); ସ୍ଵାଧୀନତା ଦିବସ‌ (or); den indiske uavhengighetsdagen (nb); Dia da Independência (pt); Onafhanklikheidsdag (af); Дан независности (sr); ᱯᱷᱩᱨᱜᱟ.ᱞ ᱢᱟᱸᱦᱟ (sat); 印度独立日 (wuu); יום העצמאות (הודו) (he); วันเอกราช (ประเทศอินเดีย) (th); Hari Kemerdekaan (India) (id); स्वतंत्रता दिवस (bho); സ്വാതന്ത്ര്യദിനം (ml); onafhankelijkesdag (nl); آزادی دن، بھارت (pnb); День незалежності Індії (uk); ಭಾರತದ ಸ್ವಾತಂತ್ರ್ಯ ದಿನಾಚರಣೆ (kn); Tago de Sendependeco (eo); Independence Day (en); يوم الاستقلال (ar); dì de ła indipendensa (vec); 독립기념일 (ko) हर बरिस 15 अगस्त के भारत मे मनावल जाये वाला राष्ट्रीय परब हवे (bho); ১৫ আগস্ট ভারতে পালিত জাতীয় দিবস (bn); fête nationale en Inde (fr); ભારતનો સ્વતંત્રતા દિવસ (gu); भारतात राष्ट्रीय सुट्टी (mr); Nationalfeiertag in Indien (de); ଭାରତର ସ୍ବାଧୀନତା ଦିବସ (or); mam a̱byin mi̱ Ndiya, á̱ song nhu 15 Zwat A̱ni̱nai (kcg); بھارت کا یوم آزادی (ur); allmän helgdag i Indien (sv); fiesta nacional India celebrada el 15 de agosto (es); 1947-ൽ ഇന്ത്യ ഒരു സ്വതന്ത്ര രാജ്യമായതിന്റെ ഓർമ്മദിനം (ml); ಭಾರತ ಸ್ವಾತಂತ್ರ್ಯ ಪಡೆದ ದಿನದ ಆಚರಣೆ (kn); festotatgo en Barato; 15a de Aŭgusto (eo); भारत का स्वतन्त्रता दिवस (hi); భారత స్వాతంత్ర్య దినోత్సవం (te); national day in India, celebrated on 15 August (en); ভাৰতে ব্ৰিটিছৰ শাসনৰ পৰা স্বাধীনতা লাভ কৰাৰ ঐতিহাসিক দিন (as); مهرجان هندي (ar); Ινδική εθνική αργία (el); இந்தியா விடுதலை பெற்ற நாள் (ta) आजादी दिवस (bho); স্বাধীনতা দিবস (ভারত), ভারতের স্বাধীনতা দিবস (bn); Independence Day (sv); ಸ್ವಾತಂತ್ರ್ಯ ದಿನಾಚರಣೆ (kn); స్వతంత్ర్య దినోత్సవం (te); १५ अगस्त (hi); Swatantrata Divas (de); ସ୍ୱତନ୍ତ୍ରତା ଦିବସ (or); swatantrata diwas, swadhinata diwas, Fifteenth of August (en); ১৫ আগষ্ট (as); Σβατάντρατα ντιβάς, Σβαντίνατα ντιβάς, 15η Αυγούστου (el); swatantrata diwas, Swak ma̱ng A̱fwuon Zwat A̱ni̱nai, mam fwung mi̱ Ndiya (kcg)

स्वातंत्र्य दिन (१५ ऑगस्ट) हा भारताचा विशेष महत्त्वाचा दिवस आहे.[१] ब्रिटिश साम्राज्यापासून दिनांक १५ ऑगस्ट इ.स. १९४७ रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले.[२] त्यामुळे भारताचा स्वातंत्र्य दिन दरवर्षी १५ ऑगस्ट रोजी साजरा केला जातो. हा भारतातील एक राष्ट्रीय सण आहे. या दिवशी दिल्लीतील लाल किल्ल्यावर भारताचा राष्ट्रध्वज फडकवला जातो. देशभरातही बहुतांश ठिकाणी ध्वजारोहण, मिरवणुका व सांस्कृतिक कार्यक्रमांद्वारे हा दिवस साजरा केला जातो.[३][४]

भारतीय स्वातंत्र्यदिवस 
भारतात राष्ट्रीय सुट्टी
Mumbai Independence Day, Brihanmumbai Municipal Corporation (28366782313).jpg
माध्यमे अपभारण करा
Wikipedia-logo-v2.svg  विकिपीडिया
प्रकारभारतीय सण आणि उत्सव,
स्वातंत्र्यदिवस,
सार्वजनिक सुट्टी,
independence day
स्मरणोत्सव
स्थान भारत
अधिकार नियंत्रण
साचा:Translations:Template:Wikidata Infobox/i18n/msg-editlink-alttext/mr
दिल्लीतील toलाल किल्ल्यावरील ध्वजारोहण

भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यात योगदान असलेल्या सर्व ज्ञात-अज्ञात व्यक्तींचे कृतज्ञतापूर्वक स्मरण या दिवशी केले जाते.

इतिहाससंपादन करा

इ.स. १७७० पासून भारतावर इंग्रजांचे राज्य होते. १९व्या शतकापासूनच सर्व राज्यांना इंग्रजांनी आपल्या सैन्यबळावर ताब्यात ठेवले होते. १८५७ च्या स्वातंत्र्य समरानंतर ब्रिटिशांनी त्यांची व्यवस्था अजूनच शिस्तीची केली. १८८५ साली भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाली.

दुसऱ्या महायुद्धानंतर ब्रिटिशांना लक्षात आले की, आपल्याला भारतावरचे राज्य व युद्ध हे सांभाळता येणार नाही आहे. तसेच दुसऱ्या बाजूला भारतीय क्रांतिकारकांचा जोर वाढत होता. ही गोष्ट कळल्यानंतर ब्रिटनच्या पंतप्रधानांनी जून १९४७ पर्यंत भारत पूर्णपणे स्वतंत्र करण्याची हमी दिली. अखेर दिनांक १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारत स्वतंत्र झाला. पण त्यावेळी भारताचे पाकिस्तान आणि भारत असे दोन तुकडेही पडले.[५] पाकिस्तानी भागात राहणाऱ्या अनेक पंजाब्यांना व सिंधीना त्यांचे घरदार, पैसा सोडून यावे लागले. अनेक लोक ह्यामध्ये मारलेही गेले. पुढे ह्या विभाजनामुळे काश्मीरचा प्रश्नही पुढे आला.

स्वतंत्र भारतसंपादन करा

स्वतंत्र भारत २६ जानेवारी १९५० रोजी प्रजासत्ताक झाला.[६] भारताची राज्यघटना तयार करण्यात बाबासाहेब आंबेडकर ह्यांचा मोलाचा वाटा होता. प्रजासत्ताक भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू[७] व पहिले राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद होते.[८] रवींद्रनाथ टागोर ह्यांनी लिहिलेले जन गण मन हे भारताचे राष्ट्रगीत[९][१०] तर बंकिमचंद्र चट्टोपाध्याय ह्यांनी लिहिलेले वन्दे मातरम् हे राष्ट्रीय गीत म्हणून ठरवले गेले.[११]

स्वातंत्र्य दिनाचा उत्सवसंपादन करा

 
लाल किलल्यावर स्वातंत्र्यदिन उत्सव

भारतात सर्व ठिकाणी स्वातंत्र्य दिनाची सार्वजनिक सुट्टी दिली जाते. सर्व शाळा, महाविद्यालये-कार्यालयांमध्ये ध्वजारोहण व ध्वजवंदन असते.[१२] भारताचे पंतप्रधान हे दरवर्षी भाषण देतात.[१३] या दिवशी लाल किल्ला येथे भारताचे पंतप्रधान ध्वजारोहण करतात.[१४] त्यादिवशी बहुतांश रेडिओ केंद्रावर तसेच दूरदर्शनवर देशभक्तिपर गाणी, कार्यक्रम, चित्रपट लागतात.

अमृत महोत्सवसंपादन करा

भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव २०२२ साली देशभरात साजरा होत आहे.[१५] या दिवसाचे विशेष औचित्य साधून देशभरात विविध सामाजिक, ऐतिहासिक उपक्रम राबविण्यात येत आहेत.[१६]

संबंधित पुस्तकेसंपादन करा

 • ते पंधरा दिवस.. : १ ऑगस्ट १९४७ ते १५ ऑगस्ट १९४७ या, भारताचे भवितव्य ठरविणाऱ्या पंधरा दिवसांची गाथा (लेखक - प्रशांत पोळ)

हे सुद्धा पहासंपादन करा

संदर्भसंपादन करा

 1. ^ Sabharwal, Gopa. India Since 1947: The Independent Years (इंग्रजी भाषेत). Penguin Books India. ISBN 9780143102748.
 2. ^ Chandra, Bipan; Mukherjee, Mridula; Mukherjee, Aditya; Panikkar, K. N.; Mahajan, Sucheta (2016-08-09). India's Struggle for Independence (इंग्रजी भाषेत). Penguin UK. ISBN 978-81-8475-183-3.
 3. ^ "वाघा बॉर्डरवर स्वातंत्र्यदिनानिमित्त खास सोहळा". झी २४ तास. ९ ऑगस्ट २०१९ रोजी पाहिले.
 4. ^ "स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा". महाराष्ट्र टाइम्स. १७ ऑगस्ट २०१७. ९ ऑगस्ट २०१९ रोजी पाहिले.
 5. ^ Thatte, Yadunath Dattatray (1969). Sarahadda Gāndhī. Sādhanā Prakāśana.
 6. ^ "Happy Republic Day 2018 : प्रजासत्ताक दिनानिमित्त गुगलचं हे विशेष डुडल पाहिलंत का?". लोकसत्ता. ११ ऑगस्ट २०१८ रोजी पाहिले.
 7. ^ "जाणून घ्या आतापर्यंतच्या १४ पंतप्रधानांचे शिक्षण". लोकसत्ता. ११ ऑगस्ट २०१८ रोजी पाहिले.
 8. ^ "Dr Rajendra Prasad: Remembering the Man, and the President". The Quint (इंग्लिश भाषेत). ११ ऑगस्ट २०१८ रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
 9. ^ "107th year of Jana -Gana-Mana | The Arunachal Times". arunachaltimes.in. ११ ऑगस्ट २०१८ रोजी पाहिले.
 10. ^ "15 ऑगस्ट : स्वातंत्र्यदिनाच्या दहा रंजक गोष्टी". एबीपी माझा. ९ ऑगस्ट २०१९ रोजी पाहिले.
 11. ^ हिंदी, टीम बीबीसी. "'वंदे मातरम' लिखने वाले बंकिमचंद्र को कितना जानते हैं आप". BBC News हिंदी. ११ ऑगस्ट २०१८ रोजी पाहिले.
 12. ^ "७०वा स्वातंत्र्य दिन अमाप उत्साहात साजरा". महाराष्ट्र टाइम्स. ९ ऑगस्ट २०१९ रोजी पाहिले.
 13. ^ "स्वतंत्रता दिवस: पीएम मोदी के 57 मिनट के भाषण में कश्मीर से लेकर महिलाओं का जिक्र, देखें वीडियो" (हिंदी भाषेत). ११ ऑगस्ट २०१८ रोजी पाहिले.
 14. ^ Khanna, Savita. Milestones Social Science – 3 with Map Workbook (इंग्रजी भाषेत). Vikas Publishing House. ISBN 9789325967472.
 15. ^ "Independence Day: आज 75 वा स्वातंत्र्यदिन; लाल किल्ल्यावरुन देशाला संबोधित करणार पंतप्रधान". न्यूज१८ लोकमत. 2021-08-15 रोजी पाहिले.
 16. ^ "स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव! 15 ऑगस्टच्या सोहळ्याची जय्यत तयारी". सकाळ. 2021-08-14 रोजी पाहिले.