प्रजासत्ताक अथवा गणराज्य (इंग्लिश: Republic) हे अशा प्रकारचे सरकार आहे ज्यामध्ये देश हा जनतेचा सार्वजनिक मामला मानला जातो. कोणा एका व्यक्ती किंवा गटाचा देशावर हक्क नसतो. प्रजासत्ताकामधील राष्ट्रप्रमुख, विविध पदाधिकारी व प्रशासक सार्वत्रिक निवडणुकीद्वारे नेमले जातात. थोडक्यात ज्या देशाचा राष्ट्रप्रमुख एखादा राजा, सम्राट, सुलतान नाही तो देश प्रजासत्ताक स्वरूपाचा आहे.

प्रजासत्ताक हा शब्द प्रामुख्याने सार्वभौम देशांसाठी वापरला जात असला तरीही अनेक देशांचे उपविभाग देखील प्रजासत्ताक असू शकतात. उदा: भूतपूर्व सोव्हिएत संघामधील युक्रेनियन सोव्हिएत साम्यवादी गणराज्य.

प्रकार संपादन