सरकार ही जगातील एखादे राज्य, देश अथवा संस्था चालवण्यासाठी बनलेली प्रणाली आहे. प्रशासन हा शब्द देखील अनेक वेळा सरकारला समानार्थी वापरला जातो. सरकार हे धोरणे व कायदे ठरवण्यासाठी तसेच दैनंदिन राज्यकारभार चालवण्यासाठी जबाबदार असते. उदा. भारत सरकार किंवा महाराष्ट्र शासन.

प्रागैतिहासिक ग्रीक तत्त्ववेत्ता प्लेटोने पाच प्रकारांच्या सरकारांची चर्चा केली आहे. उच्चवर्गशाही, धनवर्गशाही अल्पवर्गशाही, लोकशाही व अत्याचारशाही.

 
सरकार प्रकारांप्रमाणे जगतील देश.
  अध्यक्षीय प्रजासत्ताक
  अर्ध-अध्यक्षीय प्रजासत्ताक
  संसदीय प्रजासत्ताक
  संसदीय प्रजासत्ताक जेथे संसदेद्वारे राष्ट्राध्यक्ष निवडला जातो.
  संविधानिक एकाधिकारशाही व संसदीय प्रजासत्ताक जेथे राजा/राणीला औपचारिक अधिकार आहेत.
  संविधानिक एकाधिकारशाही जेथे राजा/राणीला प्रमुख अधिकार आहेत व संसद दुबळी आहे.
  संपूर्ण एकाधिकारशाही
  एकपक्षीय सरकार
  संविधानिक सरकार बरखास्त झाले आहे.
 
निळ्या रंगाने दर्शवलेल्या देशांमध्ये लोकशाही निवडणुकीद्वारे सरकार स्थापन केले जाते.[]

सरकार प्रकार

संपादन

अध्यक्षीय प्रजासत्ताक

संपादन

येथे राष्ट्राध्यक्ष सरकारचा कार्यशील भाग व सरकारच्या कार्यकारिणी शाखेचा प्रमुख असतो:

संपूर्ण अध्यक्षीय पद्धत

संपादन

राष्ट्राध्यक्ष हा राष्ट्रप्रमुख तसेच सरकारप्रमुख असतो.

अध्यक्षीय सरकारे
संपादन
अध्यक्षीय सरकारे जेथे पंतप्रधान अस्तित्वात आहे.
संपादन

अर्ध-अध्यक्षीय प्रकार

संपादन

येथे राष्ट्राध्यक्ष व पंतप्रधान दोघांनाही संविधानिक अधिकार असतात. राष्ट्राध्यक्ष हा सरकारच्या कार्यकारिणी शाखेचा प्रमुख तर पंतप्रधान हा सरकारप्रमुख असतो.

संसदीय प्रजासत्ताक

संपादन

येथे सरकारच्या कार्यकारिणी शाखेचा प्रमुख पंतप्रधान असतो. ह्या प्रकारामध्ये राष्ट्राध्यक्षाला केवळ औपचारिक संविधानिक अधिकार असतात व त्याचे महत्त्व केवळ नाममात्र असते.

मिश्र प्रजासत्ताक प्रकार

संपादन

राष्ट्रप्रमुख व सरकारप्रमुख एकत्रितपणे निवडला जातो. परंतु तो संसदेला उत्तरदायी नाही.

संचालक पद्धत

संपादन

संचालक पद्धतीमध्ये कार्यकारिणी समितीकडे प्रशासकीय अधिकार असतात. ही समिती संसदेद्वारे निवडली जाते.

संविधानिक एकाधिकारशाही

संपादन

ह्या पद्धतीत राष्ट्रप्रमुख हा राजा किंवा राणीच्या स्वरूपात असतो. त्यांचे अधिकार संविधानिक कायद्याने आखून दिले आहेत.

संविधानिक एकाधिकारशाही व औपचारिक एकाधिकार

संपादन

येथे सरकारच्या कार्यकारिणी शाखेचा प्रमुख पंतप्रधान असतो.[][] राष्ट्रप्रमुखाचे स्थान राजा/राणीकडे असते व ज्यांना केवळ औपचारिक अधिकार असतात.

संविधानिक एकाधिकारशाही व कार्यशील राजा/राणी

संपादन

पंतप्रधान सरकारप्रमुख असला तरीही राजा/राणीला महत्त्वाचे राजकीय अधिकार आहेत.

संपूर्ण एकाधिकारशाही

संपादन

येथील राजा/राणीची देशावर संपूर्ण पकड असून ते संविधानिक कायद्याला बांधील नाहीत.

धर्मशाही

संपादन

देश जेथे राष्ट्रप्रमुख धर्मावर आधारित वर्गीकरणाद्वारे निवडला जातो..

एक राजकीय पक्षाची सत्ता

संपादन

येथे केवळ एकच राजकीय पक्ष अस्तित्वात असून संविधानाने ह्या पक्षाला संपूर्ण अधिकार दिले आहेत.

लष्करी राजवट

संपादन

येथे देशाची सत्ता लष्करी अधिकाऱ्यांच्या हातात असते.

परिवर्तनीय

संपादन

देश जेथे सत्तापरिवर्तन होत आहे.

संदर्भ

संपादन
  1. ^ "Freedom in the World" (PDF). 3 February 2013 रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. 14 February 2013 रोजी पाहिले.
  2. ^ While the office of prime minister exists, the president is both the head of state and government.
  3. ^ Collective presidency consisting of three members; one for each major ethnic group.
  4. ^ Formerly a semi-presidential republic, it's now a parliamentary republic according to David Arter, First Chair of Politics at Aberdeen University, who in his "Scandinavian Politics Today" (Manchester University Press, revised 2008), quotes Jaakko Nousiainen in "From semi-presidentialism to parliamentary government" in Scandinavian Political Studies 24 (2) p95-109 as follows: "There are hardly any grounds for the epithet 'semi-presidential'." Arter's own conclusions are only slightly more nuanced: "The adoption of a new constitution on 1 March 2000 meant that Finland was no longer a case of semi-presidential government other than in the minimalist sense of a situation where a popularly elected fixed-term president exists alongside a prime minister and cabinet who are responsible to parliament (Elgie 2004: 317)". According to the Finnish Constitution, the President has no possibility to rule the government without the ministerial approval, and substantially has not the power to disband the parliament under its own desire. Finland is actually represented by its Prime Minister, and not by its President, in the Council of the Heads of State and Government of the European Union.
  5. ^ a b Combines aspects of a presidential system with aspects of a parliamentary system. The president is elected by parliament and holds a parliamentary seat, much like a prime minister, but is immune from a vote of no confidence, unlike a prime minister.
  6. ^ Norwegian Parliament web page
  7. ^ "CIA factbook on Norway". 2020-05-06 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2013-03-01 रोजी पाहिले.
  8. ^ a b c d e f g h i j k l m n o p १६ एकाधिकारशाही राष्ट्रांपैकी एक. येथे युनायटेड किंग्डमची राणी एलिझाबेथ दुसरी ही राष्ट्रप्रमुख आहे. ह्या देशांमध्ये पंतप्रधान हा सरकारप्रमुख असून तो कार्यकारिणी शाखेचा प्रमुख आहे. ह्या देशांना एकत्रितपणे राष्ट्रकुल विश्व असे ओळखले जाते.
  9. ^ The UAE's constitution establishes the state as a federation of emirates, with the federal president drawn from hereditary emirs, but each emirate in turn functions as an absolute monarchy
  10. ^ a b पोप हा येथील प्रमुख असून तो रोमन कॅथलिक चर्चचा पुढारी आहे.
  11. ^ इराणमध्ये अध्यक्षीय प्रजासत्ताक व धर्मशाही ह्या दोन्ही पद्धती अस्तित्वात आहेत.

हे सुद्धा पहा

संपादन

जगातील देशांच्या राष्ट्रप्रमुख व सरकारप्रमुखांची यादी