तुर्कमेनिस्तान

मध्य आशियातील एक देश



तुर्कमेनिस्तान (रशियन Туркмения, तुर्कमेन Türkmenistan ) मध्य आशियातील एक देश आहे. ११९१ सालापर्यंत तुर्कमेनिस्तान हे सोव्हियत संघाचा एक घटक होता.. अश्गाबाद ही तुर्कमेनिस्तानची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे.

तुर्कमेनिस्तान
Turkmenistan
तुर्कमेनिस्तानचा ध्वज तुर्कमेनिस्तानचे चिन्ह
ध्वज चिन्ह
तुर्कमेनिस्तानचे स्थान
तुर्कमेनिस्तानचे स्थान
तुर्कमेनिस्तानचे जागतिक नकाशावरील स्थान
राजधानी अश्गाबाद
सर्वात मोठे शहर अश्काबाद
अधिकृत भाषा तुर्कमेन
 - राष्ट्रप्रमुख गर्बांगुलाय बेर्दिमुहम्मेदोव
 - पंतप्रधान -
महत्त्वपूर्ण घटना
 - स्वातंत्र्य दिवस (सोव्हिएत युनियनपासून)
ऑक्टोबर २७, १९९१ (घोषित)
डिसेंबर ८, १९९१ (मान्यता) 
 - प्रजासत्ताक दिन
क्षेत्रफळ
 - एकूण ४,८८,१०० किमी (५२वा क्रमांक)
 - पाणी (%) ४.९
लोकसंख्या
 -एकूण ४८,३३,००० (११३वा क्रमांक)
 - गणती {{{लोकसंख्या_गणना}}}

{{{लोकसंख्या_गणना_वर्ष}}}

 - घनता १०/किमी²
वार्षिक सकल उत्पन्न (पीपीपी)
 - एकूण २९.३८ अब्ज अमेरिकन डॉलर (८६वा क्रमांक)
 - वार्षिक दरडोई उत्पन्न ५,९०० अमेरिकन डॉलर (७३वा क्रमांक)
राष्ट्रीय चलन तुर्कमेनिस्तानी मानाट (TMM)
आंतरराष्ट्रीय कालविभाग यूटीसी+५
आय.एस.ओ. ३१६६-१ TM
आंतरजाल प्रत्यय .tm
आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक +९९३
राष्ट्र_नकाशा
राष्ट्र_नकाशा

इतिहास

संपादन

११ व्या शतकात तुर्कमेन लोकांचे या भागात आगमन झाले. इ.स. १८८० मध्ये तुर्कमेनिस्तानवर रशियाने कब्जा केला व तुर्कमेनिस्तान रशियन तुर्कीस्तानचा एक भाग झाला. इ.स. १९२५ मध्ये हे तुर्कमेन सोव्हिएत संघाचे गणराज्य झाले. इ.स. १९९१ साली सोव्हिएत संघ राज्यापासून संपूर्ण स्वतंत्र होऊन तुर्कमेनिस्तान म्हणून अस्तित्वात आले. स्वातंत्र्य मिळाल्यापासून सपार्मुरात नियाझोव डिसेंबर २१ २००६ पर्यंत तुर्कमेनिस्तानचा तहहयात राष्ट्रप्रमुख होता. त्याच्या मृत्यूनंतर गर्बांगुलाय बेर्दिमुहम्मेदोव हा कार्यकारी राष्ट्रप्रमुख झाला. नंतर फेब्रुवारी ५, २००७ला झालेल्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत तोच विजयी होऊन तुर्कमेनिस्तानच्या राष्ट्रपतीपदाची त्याने फेब्रुवारी १४ २००७ रोजी शपथ घेतली.[]

नावाची व्युत्पत्ती

संपादन

प्रागैतिहासिक कालखंड

संपादन

भूगोल

संपादन

मध्य आशियात वसलेला तुर्कमेनिस्तान ३५° उ. ते ४३° उ. अक्षांशांदरम्यान आणि ५२° पू. ते ६७° पू. रेखांशांदरम्यान पसरला आहे. ४,८८,१०० वर्ग कि.मी. क्षेत्रफळ असलेला ह देश जगातील बावन्नाव्या क्रमांकाचा देश आहे. स्पेनच्या आकारमानापेक्षा याचे आकारमान थोडेसे कमी पण कॅलिफोर्नियापेक्षा काहीसे जास्त आहे. तुर्कमेनिस्तानला १७६८ किलोमीटरचा कॅस्पियन समुद्राचा किनारा लाभलेला आहे.

चतुःसीमा

संपादन

तुर्कमेनिस्तानच्या दक्षिणेस इराण, आग्नेयेस अफगाणिस्तान, इशान्येस उझबेकिस्तान तर वायव्येस कझाकस्तान हे देश आहेत. तुर्कमेनिस्तानच्या पश्चिमेस कास्पियन समुद्र आहे.

राजकीय विभाग

संपादन

तुर्कमेनिस्तानात एकूण पाच राजकीय विभाग येतात.

 
तुर्कमेनिस्तानचे राजकीय विभाग
अ.क्र. विभागाचे नाव मुख्यालय क्षेत्रफळ
अहाल अनाऊ ९७,१६० कि.मी. (३७,५१० चौ.मैल)
बाल्कन बाल्कनाबाद १,३९,२७० कि.मी. (५३,७७० चौ.मैल)
दशौझ दशौझ ७३,४३० कि.मी. (२८,३५० चौ.मैल)
लेबाप तुर्कमेनाबाद ९३,७३० कि.मी. (३६,१९० चौ.मैल)
मेरी मेरी ८७,१५० कि.मी. (३३,६५० चौ.मैल)

मोठी शहरे

संपादन

इ.स. १९९२ च्या तुर्कमेनिस्तानच्या घटनेप्रमाणे तुर्कमेन ही येथील अधिकृत कार्यालयीन भाषा आहे. येथील तुर्कमेन भाषा बोलणारांचे प्रमाण ७२% आहे तर रशियन भाषा १२%, उझबेक भाषा ९% आणि उर्वरीत ७% लोक इतर भाषा बोलतात.[]

समाजव्यवस्था

संपादन

वस्तीविभागणी

संपादन

तुर्कमेनिस्तानात बहुतांश म्हणजे ८९% लोक मुस्लिमधर्मीय आहेत. ९% लोक आर्थोडॉक्स वंशाचे तर इतर धर्मीय लोक २% आहेत.[]

शिक्षण

संपादन

संस्कृती

संपादन

राजकारण

संपादन

ऑगस्ट २००० मध्ये तुर्कमेनिस्तानच्या मजलिसने (संसद) महिने व दिवस यांची नावे बदलण्याच्या बाजूने कौल दिला त्या वेळेपासून जानेवारी महिना तुर्कमेनिस्तानमध्ये तुर्कमेनबाशी या नावाने (त्यावेळचे राष्ट्राध्यक्ष नियाझोव यांचे नाव तुर्कमन बाशी असे होते.) ओळखला जातो. इ.स. २००२ मध्ये राष्ट्रप्रमुख नियाझोवने उच्चपदस्थ अधिकाऱ्यांच्या संख्येत वाढ केली व कमीत कमी मंत्र्यांच्या हाती जास्तीत जास्त खात्यांची जबाबदारी या धोरणाचा अवलंब केला. नियाझोवने तुर्कमेनिस्तान आणि अफगाणिस्तानातून पाकिस्तानात जाणाऱ्या पाईपलाइनच्या प्रकल्पासाठी सक्रिय प्रयत्‍न केला.

अर्थतंत्र

संपादन

दिनांक ऑक्टोबर ५ १९४८ रोजी तुर्कमेनिस्तानातील अश्गाबाद याठिकाणी झालेल्या ७.३ रिश्टर स्केलच्या भूकंपात या शहरातील एकूण लोकसंख्येच्या २/३ म्हणजेच १,१०,००० लोक मृत्यूमुखी पडले होते.[] मेरी शहराजवळ असणारी मेर्व ही मरूद्यान नगरी म्हणून तुर्कमेनिस्तानात प्रसिद्ध आहे. बाराव्या शतकात मेर्व हे जगातील सर्वाधिक मोठ्या शहरांपैकी एक हाते.[] मेर्वला युनेस्कोने जागतिक वारसास्थान म्हणून घोषित केलेले आहे.[]

संदर्भ आणि नोंदी

संपादन
  1. ^ "नवीन तुर्कमेन राष्ट्रपतीचा शपथविधी" (इंग्लिश भाषेत). ६/११/२०११ रोजी पाहिले. |अ‍ॅक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)CS1 maint: unrecognized language (link)
  2. ^ a b "CIA संकेतस्थळ" (इंग्लिश भाषेत). 2007-06-12 रोजी मूळ पान पासून संग्रहित. ६/११/२०११ रोजी पाहिले. |अ‍ॅक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)CS1 maint: unrecognized language (link)
  3. ^ "१२ जागतिक विनाशकारी भूकंप" (इंग्लिश भाषेत). ६/११/२०११ रोजी पाहिले. |अ‍ॅक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)CS1 maint: unrecognized language (link)
  4. ^ "ऐतिहासिक मोठी शहरे" (इंग्लिश भाषेत). 2016-08-18 रोजी मूळ पान पासून संग्रहित. ६/११/२०११ रोजी पाहिले. |अ‍ॅक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)CS1 maint: unrecognized language (link)
  5. ^ "युनेस्कोने घोषित केलेली जागतिक वारसास्थाने" (इंग्लिश भाषेत). ६/११/२०११ रोजी पाहिले. |अ‍ॅक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)CS1 maint: unrecognized language (link)