इ.स. २००६
वर्ष
सहस्रके: | इ.स.चे ३ रे सहस्रक |
शतके: | २० वे शतक - २१ वे शतक - २२ वे शतक |
दशके: | १९८० चे - १९९० चे - २००० चे - २०१० चे - २०२० चे |
वर्षे: | २००३ - २००४ - २००५ - २००६ - २००७ - २००८ - २००९ |
वर्ग: | जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती |
ठळक घटना आणि घडामोडी
संपादन- जानेवारी १६ - एलेन जॉन्सन-सर्लिफ लायबेरियाच्या राष्ट्राध्यक्षपदी. सर्वात प्रथम आफ्रिकन महिला राष्ट्राध्यक्ष.
- फेब्रुवारी १० - इटलीत तोरिनोयेथे विसावे हिवाळी ऑलिंपिक खेळ सुरू.
- मार्च १ - ताऱ्या हेलोनेन फिनलंडच्या अध्यक्षपदी.
- मार्च २ - पाकिस्तानच्या कराची शहरात बॉम्बस्फोट. अमेरिकन राजदूतासह ५ ठार, ५० जखमी.
- मार्च ९ - महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाची स्थापना
- मे ९ - तास्मानियात खाणीतील अपघातानंतर १४ दिवस जमिनीखाली अडकलेल्या दोन कामगारांची सुटका.
- जून ८ - इराकमधील अल कायदाचा म्होरक्या अबू मुसाब अल झरकावी विमानहल्ल्यात ठार.
- जून ९ - १८वी फुटबॉल विश्वकरंडक स्पर्धा जर्मनीच्या म्युनिक शहरात सुरू.
- जुलै ३ - २००४ एक्स.पी.१४ हा लघुग्रह पृथ्वीच्या जवळून (साधारण चंद्राइतक्या अतरावरून) गेला.
- जुलै ६ - भारत व तिबेटमधील नथुला खिंड व्यापारास खुली.
- जुलै ११ - मुंबईत उपनगरी रेल्वे गाड्यांमध्ये स्फोट. १००हून अधिक ठार.
- जुलै १३ - इस्रायेलने बैरुत विमानतळावर हल्ला चढवला.
- जुलै १७ - इंडोनेशिया जवळ समुद्रात रिश्टर मापनपद्धतीनुसार ७.२ तीव्रतेचा भूकंप. या नंतरच्या त्सुनामीत ३०० व्यक्ती मृत्युमुखी.
- ऑगस्ट १० - युनायटेड किंग्डमची गुप्त पोलीस संस्था स्कॉटलंड यार्डने इंग्लंडहून अमेरिकेला जाणारी विमाने नष्ट करण्याचा दहशतवाद्यांचा कट उधळुन लावला.
जन्म
संपादनमृत्यू
संपादन- जानेवारी ४ - मक्तूम बिन रशीद अल् मक्तूम (दुबईचे शेख आणि संयुक्त अरब अमिरातीचे पंतप्रधान)
- जानेवारी ३१ - कोरेटा स्कॉट किंग, मार्टिन ल्युथर किंगची पत्नी.
- मे ३ - प्रमोद महाजन, भारतीय राजकारणी.
- ऑगस्ट २१ - उस्ताद बिस्मिल्ला खॉं, ख्यातनाम भारतीय सनईवादक.
- डिसेंबर २८ - प्रभाकर पंडित, मराठी संगीतकार.