इंडोनेशिया

आग्नेय आशिया व ओशनियामधील एक देश


इंडोनेशिया (अधिकृत नाव: Republik Indonesia; इंडोनेशियाचे प्रजासत्ताक) हा आग्नेय आशियाओशनियामधील एक देश आहे. हा देश हिंदी महासागरामध्ये एकूण १७,५०८ बेटांवर वसला आहे. बोर्नियो, जावा, सुमात्रा, सुलावेसी, तिमोरन्यू गिनी ही येथील प्रमुख बेटे आहेत. इंडोनेशियाची लोकसंख्या सुमारे २३ कोटी असून जगातील सर्वाधिक मुस्लिम लोकसंख्या ह्याच देशात आहे. संस्कृतमध्ये या देशाचे नाव दीपांतर आहे..

इंडोनेशिया
Republik Indonesia
इंडोनेशियाचे प्रजासत्ताक
इंडोनेशियाचा ध्वज इंडोनेशियाचे चिन्ह
ध्वज चिन्ह
ब्रीद वाक्य: भिन्नेका तुंगल इका ('विविधतेत एकता')
राष्ट्रगीत: इंडोनेशिया राया ('महान इंडोनेशिया')
इंडोनेशियाचे स्थान
इंडोनेशियाचे स्थान
इंडोनेशियाचे जागतिक नकाशावरील स्थान
राजधानी नुसंतारा
सर्वात मोठे शहर जकार्ता
अधिकृत भाषा बहासा इंडोनेशिया
सरकार अध्यक्षीय प्रजासत्ताक
 - राष्ट्रप्रमुख जोको विडोडो
महत्त्वपूर्ण घटना
 - स्वातंत्र्य दिवस (नेदरलॅंड्सपासून)
ऑगस्ट १७, १९४५ (घोषित)
डिसेंबर २७, १९४९ (मान्यता) 
क्षेत्रफळ
 - एकूण १९,१९,४४० किमी (१६वा क्रमांक)
 - पाणी (%) ४.८५
लोकसंख्या
 - २००९ २२,९९,६५,०००[१] (४वा क्रमांक)
 - गणती {{{लोकसंख्या_गणना}}}

{{{लोकसंख्या_गणना_वर्ष}}}

 - घनता ११९.८/किमी²
वार्षिक सकल उत्पन्न (पीपीपी)
 - एकूण ९७७.४ अब्ज अमेरिकन डॉलर (१५वा क्रमांक)
 - वार्षिक दरडोई उत्पन्न ४,४५८ अमेरिकन डॉलर (११०वा क्रमांक)
मानवी विकास निर्देशांक  . ०.७३४[२] (मध्यम) (१११ वा) (२००७)
राष्ट्रीय चलन इंडोनेशियन रुपिया (IDR)
आंतरराष्ट्रीय कालविभाग - (यूटीसी +७ ते +९)
आय.एस.ओ. ३१६६-१ ID
आंतरजाल प्रत्यय .id
आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक ६२
राष्ट्र_नकाशा
राष्ट्र_नकाशा

हा देश साडेतीनशे वर्षे डच अधिपत्याखाली होता. मात्र दुसऱ्या महायुद्धानंतर इंडोनेशिया स्वतंत्र झाला.

जकार्ता ही देशाची राजधानी आहे. येथील मुख्य भाषा बहासा इंडोनेशिया आहे. हिच्याखेरीज बासा जावा, बासा बाली, बासा सुंडा, बासा मादुरा इत्यादी अनेक भाषा येथे आहेत. येथे कावी नावाची एक प्राचीन भाषा आहे. येथील प्रमुख साहित्यिक ग्रंथ याच भाषेत आहेत. कावी भाषेतील भिन्नेक तुंग्गल इक - विभिन्नतेत एकता - हे या देशाचे घोषवाक्य आहे.

इंडोनेशियामध्ये जगातली एक सर्वांत मोठी जैविक विविधता आहे. आसियानजी-२० ह्या आंतरराष्ट्रीय संघटनांचा इंडोनेशिया हा सदस्य देश आहे.

इतिहास

संपादन

जीवाश्म अवशेषांवरून काढलेल्या निष्कर्षानुसार येथे पाच लाख वर्षांपूर्वीचा आदिमानव सापडतो. याला जावा पुरुष (इंग्रजी: Java Man) म्हणून ओळखले जाते. सुमारे २००० वर्षापूर्वी येथे पूर्वेकडील देशांमधून म्हणजे तैवानमधून लोक आले व त्यांनी हा भागा ताब्यात घेतला, असे मानणारा एक प्रवाह आहे.. त्यानंतर त्यांनी भातशेती व इतर कलाकौशल्ये मिळवली. भारतचीन या दोन्ही देशांशी असलेल्या व्यापाराने या देशाची संस्कृतीला आकार दिला. सातव्या शतकात श्रीविजय या नाविक प्रबळ असलेल्या राजाने हिंदू तसेच बौद्ध धर्म यांना स्थान दिले. त्यानंतर शैलेंद्रमातारम यांनी अनुक्रमे बोरोबदूरप्रंबनन ही धार्मिक शहरे वसवली. मजापहित हे हिंदू राजघराणे तेराव्या शतकात जावा बेटावर सत्तेत आले. हा काळ इंडोनेशियाच्या इतिहासातले सुवर्णयुग म्हणून ओळखला जातो. मात्र त्या नंतर मुसलमान व्यापारी व्यापाराच्या उद्देशाने येथे आले हळूहळू जम बसवत त्यांनी सुमात्रा बेटावर ठाणे वसवले. येथून इंडोनेशियाच्या मुसलमानीकरणाला सुरुवात झाली. सोळाव्या शतकापर्यंत बहुतेक भाग मुसलमान झाले होते.

इ.स. १५२१ मध्ये येथे पहिल्यांदा युरोप खंडातून पोर्तुगीज लोक आले. त्यांना येथील मसाल्याचे पदार्थ हवे होते. त्यानंतर ब्रिटिशडच आले. डच लोकांनी डच ईस्ट इंडिया कंपनी स्थापन करून येथे अंमल बसवला. इ.स. १८०० मध्ये त्यांनी इंडोनेशियाला आपली वसाहत म्हणून घोषित केले.

दुसऱ्या महायुद्धात जपानी आक्रमण पाहिल्यानंतर स्वातंत्र्याच्या भावनेने येथे मूळ धरले. जपानच्या शरणागतीनंतर इ.स. १९४५ मध्ये सुकार्नो यांनी अध्यक्ष म्हणून सूत्रे हाती घेतली. पण नेदरलॅंड्सने आपला अंमल कायम ठेवण्याची धडपड सोडली नाही. शेवटी डिसेंबर इ.स. १९४९ मध्ये इंडोनेशियाने स्वातंत्र्य मिळवले.

नावाची व्युत्पत्ती

संपादन

इंडिया व एशिया यांचा संगम येथे होतो म्हणून इंडोनेशिया. यास पूर्वी इंडोचायना असेही म्हणत.(?)

प्राचीन राजे, वंश व साम्राज्य कालखंड

संपादन

भूगोल

संपादन

इंडोनेशिया देश हा हिंदी महासागरातील १७,५०८ बेटांचा एक द्वीपसमूह आहे.

चतुःसीमा

संपादन

इंडोनेशियाच्या पूर्व तिमोर, मलेशियापापुआ न्यू गिनी ह्या देशांसोबत जमिनीवरील सीमा तर भारत (अंदमान निकोबार बेटे), फिलिपाईन्स, ऑस्ट्रेलियासिंगापूर ह्या देशांसोबत सागरी सीमा आहेत.

राजकीय विभाग

संपादन

इंडोनेशिया देश एकूण ३४ प्रांतांमध्ये विभागला गेला आहे.

मोठी शहरे

संपादन

समाजव्यवस्था

संपादन

वस्तीविभागणी

संपादन

२००० सालच्या जनगणनेनुसार इंडोनेशियातील ८६.१% नागरिक मुस्लिम होते,[३] ८.७% नागरिक ख्रिश्चन,[४] ३% हिंदू होते तर १.८% बौद्ध वा इतर धर्मीय होते.

शिक्षण

संपादन

उच्च शिक्षणाची व्यवस्था आहे पण तरीही अनेक धनवान विद्यार्थी अमेरिकेची संयुक्त संस्थानेऑस्ट्रेलिया येथे उच्च शिक्षणासाठी जातात.

संस्कृती

संपादन

भारतीयचिनी संस्कृतीचा मिलाफ येथे दिसून येतो. या देशाचा भारताशी पुरातन संबंध आहे. भारतातल्या पुराणांमध्ये याचा उल्लेख दीपांतर भारत म्हणजेच समुद्रापारचा भारत असा आढळतो. दीपांतर हे नाव इंडोनेशिया मध्ये अजूनही प्रचलित आहे. सुमारे पाचशे वर्षांपूर्वी हा देश एक हिंदू देश होता. परंतु नंतर त्यातले बहुसंख्य लोकांना धर्मांतराने मुसलमान करण्यात आले व हा देश मुसलमान गणला जायला लागला.[ संदर्भ हवा ] आजही इंडोनेशियाच्या बाली नावाच्या बेटावर सुमारे ९०% लोक हिंदू आहेत. हिंदू धर्माला येथे आगम हिंदू धर्म या नावाने ओळखतात. येथे अनेक प्राचीन मंदिरे आहेत, बहुतेक मंदिरे चंडी देवीच्या उपासनेसाठी स्थापन करण्यात आली होती. त्यामुळे या मंदिरांनादेखील चंडी नावाने ओळखले जाते.

इंडोनेशियातील लष्कराची आणि पोलीस दलाची घोषवाक्ये

संपादन
 • कर्मण्यवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन -इंडोनेशियन वायुदल स्पेशल फोर्स कोअर
 • जलेषु भूम्याम्‌च जयामहे -इंडोनेशियन मरीन कोअर
 • जलेष्वेव जयामहे -इंडोनेशियन नौदल
 • त्रिसंन्ध्या-युद्ध -इंडोनेशियन पायदळ
 • द्वि-शक्ति-भक्ति -इंडोनेशियन इक्विपमेन्ट कोअर
 • धर्म-विचक्षण-क्षत्रिय -इंडोनेशियन पोलीस प्रबोधिनी (इथे धर्म म्हणजे रिलिजन नाही, तर कर्तव्य हा मूळ अर्थ)
 • राष्ट्रसेवकोत्तम -इंडोनेशियन राष्ट्रीय पोलीस दल
 • सत्य-वीर्य-विचक्षणा -इंडोनेशियन सैनिकी पोलीस

राजकारण

संपादन

फुटीरतावादी शक्ती येथे कार्यरत आहेत. आचे बंडा हा मुस्लिम भाग स्वतंत्र होण्यासाठी मागणी करतो आहे. तिमोर प्रांत फुटून ईस्ट तिमोर हा ख्रिश्चनबहुल भाग फुटून वेगळा निघाला आहे.

अर्थतंत्र

संपादन

इ.स. १९९८ मधील आर्थिक धक्क्यातून हा देश सावरण्याचा प्रयत्‍न करतो आहे. या मंदीमध्ये जागतिक बँकेचा यांचा सल्ला घेणे अडचणीचे ठरले होते. मात्र त्सुनामी लाटा व भूकंपप्रवण क्षेत्र असल्याने अर्थव्यवस्थेवर नैसर्गिक आपत्तींचा ताण आहे.

संदर्भ

संपादन
 1. ^ Department of Economic and Social Affairs Population Division. "World Population Prospects, Table A.1" (PDF). 2008 revision. United Nations. 12 March 2009 रोजी मिळवले.
 2. ^ "Human Development Report 2009. Human development index trends: Table G" (PDF). 5 October 2009 रोजी पाहिले.
 3. ^ "Indonesia – The World Factbook". 2008-12-10 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2010-08-30 रोजी पाहिले.
 4. ^ [ संदर्भ हवा ]

बाह्य दुवे

संपादन
 
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: