मुख्य मेनू उघडा
जगाच्या नकाशावर मानवी विकास निर्देशांक (२००७ सालामधील)
  0.950 व अधिक
  0.900–0.949
  0.850–0.899
  0.800–0.849
  0.750–0.799
  0.700–0.749
  0.650–0.699
  0.600–0.649
  0.550–0.599
  0.500–0.549
  0.450–0.499
  0.400–0.449
  0.350–0.399
  0.350 पेक्षा कमी
  माहिती उपलब्ध नाही

मानवी विकास निर्देशांक हा आकडा जगातील देशांचे विकसित, विकसिनशीलअविकसित असे वर्गीकरण करण्यासाठी वापरला जातो. हा सूचकांक तयार करण्यासाठी देशातील नागरिकांचे सरासरी आयुर्मान, शिक्षण व दरडोई उत्पन्न हे तीन घटक वापरले जातात.

इ.स. १९९० साली पाकिस्तानी अर्थत़ज्ज्ञ महबूब उल हक ह्यांनी मानवी विकास निर्देशांकाची निर्मिती केली व तेव्हापासून हा निर्देशांक संयुक्त राष्ट्रे विकास कार्यक्रम ही संयुक्त राष्ट्रांची संस्था मानवी विकास अहवाल तयार करण्यासाठी वापरते.

अनुक्रमणिका

मोजणीची पद्धतसंपादन करा

नवी पद्धतसंपादन करा

४ नोव्हेंबर २०१० नंतर, तीन घटक असलेली नवी मोजणी पद्धती अमलात आणली गेली.[१]

१. आयुर्मान निर्देशांक (आ. नि.) = (सरासरी आयुर्मान - २०) / (८५ - २०)

जेव्हा सरासरी आयुर्मान ८५ असते तेव्हा निर्देशांक १ असतो आणि जेव्हा ते २० असते तेव्हा निर्देशांक ० असतो.

२. शैक्षणिक निर्देशांक (शै. नि.) = (स. शा. व. नि. + अ. शा. व. नि.)/२

सरासरी शालेय शिक्षण वर्ष निर्देशांक (स. शा. व. नि.) = सरासरी शालेय शिक्षण वर्ष / 15

अपेक्षित शालेय शिक्षण वर्ष निर्देशांक (अ. शा. व. नि.) = अपेक्षित शालेय शिक्षण वर्ष / 18

३. उत्पन्न निर्देशांक (उ. नि.) = [ln (द. डो. ए. रा. उ.) - ln (१००)] / [ln (७५०००) - ln (१००)]

जेव्हा दर डोई एकूण राष्ट्रीय उत्पन्न (द. डो. ए. रा. उ.) हे ७५००० अमेरिकन डॉलर असते तेव्हा हा निर्देशांक १ असतो आणि जेव्हा ते १०० अमेरिकन डॉलर असते तेव्हा तो ० असतो.

मानवी विकास निर्देशांक हा वरील तीनही निर्देशांकाचा भौमितिक मध्य असतो.

मानवी विकास निर्देशांक = ∛(आ. नि.)x(शै. नि.)x(उ. नि.)

२००९ अहवालसंपादन करा

५ ऑक्टोबर, इ.स. २००९ रोजी खुल्या केलेल्या ह्या अहवालानुसार जगातील विकसित देश खालील आहेत.[२]

संदर्भसंपादन करा

हे सुद्धा पहासंपादन करा