नॉर्वे
नॉर्वे (नॉर्वेजियन: Norge) हा उत्तर युरोपातील एक देश आहे. स्कॅंडिनेव्हियन द्वीपकल्पाच्या पश्चिम भागात वसलेल्या नॉर्वेच्या सीमेचा मोठा हिस्सा स्वीडन देशासोबत आहे तर फिनलंड व रशिया देश नॉर्वेच्या अतिउत्तर सीमेवर आहेत. पश्चिम व दक्षिणेस नॉर्वेजियन समुद्र व उत्तर समुद्र आहेत. स्वालबार्ड व यान मायेन हे आर्क्टिक महासागरामधील द्वीपसमूह नॉर्वेच्या अधिपत्याखाली आहेत. ओस्लो ही नॉर्वेची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. सध्या नॉर्वेमध्ये संविधानिक राजेशाही व सांसदीय लोकशाही आहे. हाराल्ड पाचवा हे येथील विद्यमान राजे आहेत.
नॉर्वे Kongeriket Norge Kongeriket Noreg नॉर्वे | |||||
| |||||
ब्रीद वाक्य: आल्ट फोर नोर्गे (नॉर्वेकरता सर्व काही) | |||||
राष्ट्रगीत: या, वी एल्स्कर डेट लांडेट (हो, आम्ही या भूमीवर प्रेम करतो.) | |||||
![]() | |||||
राजधानी (व सर्वात मोठे शहर) |
ओस्लो | ||||
अधिकृत भाषा | नॉर्वेजियन | ||||
इतर प्रमुख भाषा | सामी | ||||
सरकार | संविधानिक एकाधिकारशाही व संसदीय लोकशाही | ||||
- राजा | हाराल्ड पाचवा | ||||
- पंतप्रधान | जेन्स स्टोल्टेनबर्ग | ||||
महत्त्वपूर्ण घटना | |||||
---|---|---|---|---|---|
- एकत्रीकरण | इ.स. ८७२ | ||||
- संविधान | १७ मे १८१४ | ||||
- स्वीडन व नॉर्वेच्या संघाची बरखास्ती | ७ जून १९०५ | ||||
- नाझी आक्रमण | ९ एप्रिल १९४० ८ मे १९४५ | ||||
क्षेत्रफळ | |||||
- एकूण | ३८५,२०७[१] किमी२ (६७वा क्रमांक) | ||||
- पाणी (%) | ५.७ | ||||
लोकसंख्या | |||||
-एकूण | ५,५९४३४०[२] (२०२५) (१२०वा क्रमांक) | ||||
- गणती | {{{लोकसंख्या_गणना}}}
{{{लोकसंख्या_गणना_वर्ष}}} | ||||
- घनता | १४.५/किमी² | ||||
वार्षिक सकल उत्पन्न (पीपीपी) | |||||
- एकूण | ३७७.१ अब्ज[३] अमेरिकन डॉलर | ||||
- वार्षिक दरडोई उत्पन्न | ५२,९६४ अमेरिकन डॉलर | ||||
मानवी विकास निर्देशांक . | ▲ ०.९६६[४] (अति उच्च) (पहिला) (२०२२) | ||||
राष्ट्रीय चलन | नॉर्वेजियन क्रोन (NOK) | ||||
आंतरराष्ट्रीय कालविभाग | मध्य युरोपीय प्रमाणवेळ (CET) (यूटीसी +१/+२) | ||||
आय.एस.ओ. ३१६६-१ | NO | ||||
आंतरजाल प्रत्यय | .no | ||||
आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक | ४७ | ||||
![]() |
अत्यंत विकसित व समृद्ध असलेला नॉर्वे देश दरडोई उत्पन्नामध्ये जगात दुसऱ्या क्रमांकावर आहे.[५][६][७] नॉर्वे हा जगातील पाचव्या क्रमांकाचा खनिज तेल उत्पादक आहे. नॉर्वेचा मानवी विकास निर्देशांक जगात सर्वाधिक आहे.[८]
नॉर्वे देशातील नागरिक जगातील कोणत्याही देशाच्या तुलनेने सर्वात जास्त पुस्तके वाचतात. आणि ते दरवर्षी सरासरी पाच हजार रुपये आपल्या पुस्तकावर खर्च करतात.
जर तुम्ही नॉर्वेमध्ये एखादे चांगले पुस्तक लिहिले तर सरकार त्याच्या एक हजार कॉपी खरेदी करून आपल्या लायब्ररीमध्ये ठेवते. येथे दरवर्षी दोन हजार पेक्षा जास्त पुस्तके प्रकाशित होतात.
नॉर्वेमध्ये पुरुषांसाठी दोन नावे खूप प्रसिद्ध आहेत. एक म्हणजे Odd आणि दुसरे म्हणजे Even.
खेळ
संपादनसंदर्भ
संपादन- ^ "Arealstatistics for Norway 2019". Kartverket, mapping directory for Norway. 2019. 2019-06-08 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2019-03-24 रोजी पाहिले.
- ^ "Population, 2025-01-01" (इंग्रजी भाषेत). Statistics Norway. 2025-02-25. 2025-02-26 रोजी पाहिले.
- ^ Norway, International Monetary Fund
- ^ "2022 Human Development Index Ranking" (इंग्रजी भाषेत). United Nations Development Programme. 2023-03-13. 2024-03-16 रोजी पाहिले.
- ^ World Economic Outlook Database-April 2009, Gross domestic product per capita, current prices, International Monetary Fund. Retrieved April 22, 2009.
- ^ World Economic Outlook Database-April 2009, Gross domestic product based on purchasing-power-parity (PPP) per capita GDP, International Monetary Fund. Retrieved April 22, 2009.
- ^ "Report for selected countries and subjects – current account balance, U.S. dollars, billions". International Monetary Fund. 2009-05-12 रोजी पाहिले.
- ^ "Human Development Index 2009" (PDF). Human Development Report. 2009-10-05 रोजी पाहिले.
बाह्य दुवे
संपादनविकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |
- अधिकृत संकेतस्थळ (इंग्लिश मजकूर)
- नॉर्वेच्या सांख्यिकीविषयीचे संकेतस्थळ (इंग्लिश मजकूर)