नॉर्वेजियन ही स्कॅंडिनेव्हियामधील नॉर्वे देशाची राष्ट्रभाषा आहे. जर्मेनिक भाषासमूहामधील ही भाषा उत्तर युरोपामधील स्वीडिशडॅनिश भाषांसोबत पुष्कळशी मिळतीजुळती आहे. नॉर्वेजियन दोन वेगवेगळ्या स्वरूपांमध्ये लिहिली जाते. बूक्मोल (Bokmål, पुस्तकी बोली) व नायनोर्स्क (Nynorsk, नवी नॉर्वेजियन) ह्या दोन्ही अधिकृत नॉर्वेजियन भाषा आहेत. २००५ सालच्या एका चाचणीनुसार येथील ८६.३% लोक बूक्मोल, ७.५% लोक नायनोर्स्क तर ५.५% लोक दोन्ही भाषा वापरतात.

नॉर्वेजियन
norsk
स्थानिक वापर नॉर्वे, स्वीडन, डेन्मार्क, आइसलॅंड
प्रदेश उत्तर युरोप
लोकसंख्या ५० लाख
क्रम १११
भाषाकुळ
इंडो-युरोपीय
लिपी ळॅटिन
अधिकृत दर्जा
प्रशासकीय वापर नॉर्वे ध्वज नॉर्वे
भाषा संकेत
ISO ६३९-१ no, nb, nn
ISO ६३९-२ nor
ISO ६३९-३ nor (विदागारातील आवृत्ती वेबॅक मशिनवर)

हे सुद्धा पहा संपादन