भाषाकुळ किंवा भाषाकुटुंब म्हणजे एकाच प्रमुख स्रोतामधून उत्क्रांती पावलेल्या भाषांचा समूह. एका भाषाकुळातील भाषांचे मूळ समान असते. एथ्नॉलॉगच्या अहवालानुसार २००९ साली जगात ६,९०९ जागृत भाषा होत्या. प्रत्येक भाषा कोणत्या कुळात मोडावी ह्यासाठी शास्त्रीय पद्धतींचा आधार घेतला जातो. काही भाषा ह्यांपैकी कोणत्याच कुळात चपखल ठरत नसल्याने त्यांना एकाकी भाषा असे संबोधले जाते.

जगातील भाषाकुळांचा नकाशा

जगातील सर्वाधिक वापरली जाणारी भाषाकुळे खालील यादीमध्ये दिली आहेत.

  1. इंडो-युरोपीय: ४५%.
  2. चिनी-तिबेटी: २२% (पूर्व आशिया)
  3. नायजर-कॉंगो: ६.४% (सहाराच्या दक्षिणेकडील आफ्रिका)
  4. आफ्रो-आशियन: ६% (उत्तर आफ्रिका, आफ्रिकेचे शिंग, मध्य पूर्व)
  5. ऑस्ट्रोनेशियन: ५.९% (ओशनिया, आग्नेय आशिया, मादागास्कर)
  6. द्रविडी: ३.७% (दक्षिण आशिया)
  7. आल्ताय: २.३% (मध्य आशिया, सायबेरिया, अनातोलिया)
  8. जपानी भाषासमूह: २.१% (जपान)
  9. ऑस्ट्रो-आशियन: १.७% (आग्नेय आशिया)
  10. ताई-कदाई:१.३% (आग्नेय आशिया)

बाह्य दुवे संपादन