दक्षिण आशिया
दक्षिण आशिया हा आशिया खंडामधील एक भौगोलिक प्रदेश आहे. ह्या प्रदेशामध्ये भारतीय उपखंडामधील भूभागाचा समावेश होतो. भौगोलिक दृष्ट्या दक्षिण आशिया हिमालयाच्या व हिंदुकुश पर्वतरांगे दक्षिणेकडील भारतीय प्रस्तरावर स्थित असून त्याच्या दक्षिणेस हिंदी महासागर आहे. भारत, पाकिस्तान, बांगलादेश व श्रीलंका हे भारतीय उपखंडामधील प्रमुख देश तसेच, नेपाळ, अफगाणिस्तान, भूतान व मालदीव ह्या आठ देशांना साधारणपणे दक्षिण आशियाई देश मानले जाते.
दक्षिण आशिया | |
---|---|
लोकसंख्या | १७० कोटी |
देश |
१२ |
जीडीपी (२०१४) | $९०५ अब्ज |
प्रमाणवेळा | यूटीसी+०५:००, यूटीसी+०५:३०, यूटीसी+०५:४५, यूटीसी+०६:०० |
राजधानीची शहरे |
यादी |
१९८५ साली दक्षिण आशियाई देशांनी प्रादेशिक राजकीय व वाणिज्य संबंध बळकट करण्यासाठी सार्कची स्थापना केली व २००४ साली दक्षिण आशियाई मुक्त व्यापार कराराला मान्यता दिली.
बाह्य दुवे
संपादन- विश्वबँकेच्या संकेतस्थळावरील माहिती Archived 2012-07-16 at Archive.is
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |