नवी दिल्ली

राजधानी, दिल्लीचा जिल्हा


नवी दिल्ली हे दक्षिण आशियामधील भारत देशाच्या राजधानीचे शहर आहे. त्याचबरोबर भारताच्या दिल्ली ह्या केंद्रशासित प्रदेशाच्या मुख्यालयाचे ठिकाण देखील नवी दिल्ली येथेच आहे. राजधानी असल्याने भारत सरकारच्या विधी, न्याय व प्रशासन ह्या तिन्ही शाखांची मुख्यालये येथे आहेत. ह्या शहराची कोनशिला १५ डिसेंबर १९११ला बसवली गेली.[१] भारताच्या राजधानी क्षेत्राचा उल्लेख करताना दिल्ली व नवी दिल्ली ही दोन्ही नावे वापरात असली तरीही नवी दिल्ली हा दिल्ली प्रदेशाचा एक लहान जिल्हा आहे. दिल्ली महानगर क्षेत्रामधील नोएडा, फरिदाबाद, गुरुग्राम, गाझियाबाद इत्यादी शहरे नवी दिल्लीसोबत रस्ते व रेल्वेमार्गांद्वारे जोडली गेली आहेत.

नवी दिल्ली
भारत देशाची राजधानी
राष्ट्रपती भवन, कनॉट प्लेस, हुमायूनची कबर, इंडिया गेट, अक्षरधाम मंदिरलोटस टेंपल
नवी दिल्ली is located in भारत
नवी दिल्ली
नवी दिल्ली
नवी दिल्लीचे भारत३मधील स्थान

गुणक: 28°36′50″N 77°12′32″E / 28.61389°N 77.20889°E / 28.61389; 77.20889

देश भारत ध्वज भारत
प्रदेश राष्ट्रीय राजधानी क्षेत्र
स्थापना वर्ष इ.स. १९११
क्षेत्रफळ ४२.७ चौ. किमी (१६.५ चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची ७०९ फूट (२१६ मी)
लोकसंख्या  (१ जानेवारी २०११)
  - शहर २,५७,८०३
  - घनता ६,००० /चौ. किमी (१६,००० /चौ. मैल)
  - महानगर २,८५,१४,०००
प्रमाणवेळ भारतीय प्रमाणवेळ
http://www.ndmc.gov.in/

ब्रिटिश राजवटीदरम्यान १९११ साली भरवलेल्या दिल्ली दरबारामध्ये नवी दिल्ली ह्या शहराचा आराखडा मांडला गेला. एडविन ल्युटेन्सहर्बर्ट बेकर ह्या दोन ब्रिटिश स्थापत्यकारांनी नवी दिल्लीची रचना केली व १३ फेब्रुवारी १९३१ रोजी वॉईसरॉय Lord Irwin ह्याच्या हस्ते नवी दिल्लीचे उद्घाटन करण्यात आले. केवळ ४२.७ चौरस किमी एवढे क्षेत्रफळ असणारे नवी दिल्ली हे दिल्ली महानगराचा एक लहान भाग आहे. दिल्लीचे क्षेत्रफळ १४८३ चौ.किमी. आहे. २०११ साली नवी दिल्लीची लोकसंख्या सुमारे २.५७ लाख तर दिल्ली महानगराची लोकसंख्या सुमारे २.८५ कोटी होती.

२० व्या शतकातील अग्रगण्य ब्रिटीश वास्तुविशारद एडविन लुटियन्स यांनी आखलेल्या बहुतेक नवी दिल्ली शहराचे मध्यवर्ती प्रशासकीय क्षेत्र म्हणून ब्रिटनच्या शाही महत्त्वाकांक्षा दाखवल्या गेल्या. राजपथ आणि जनपथ या दोन मध्यवर्ती टप्प्याटप्प्याने नवी दिल्लीची रचना आहे. राजपथ किंवा किंग वेज राष्ट्रपती भवन ते इंडिया गेटपर्यंत पसरलेला आहे. जनपथ (हिंदी: "लोकांचे पथ"), पूर्वी क्वीन्स वे, कॅनॉट सर्कसपासून सुरू होते आणि राजपथला काटकोनात कट करते. जवळपास शांतीपाठवर (19: "शांतीचा मार्ग") वर 19 विदेशी दूतावास आहेत, हे भारतातील सर्वात मोठे राजनयिक एन्क्लेव्ह बनवित आहे. शहराच्या मध्यभागी एक भव्य राष्ट्र भवन आहे (पूर्वी व्हायसरॉय हाऊस म्हणून ओळखले जाते) रायसीना हिलच्या शिखरावर आहे. भारत सरकारची मंत्रालये असलेली सचिवालय राष्ट्रपती भवनाच्या बाहेर आहे. हर्बर्ट बेकर यांनी डिझाइन केलेले संसद भवन सांसद मार्गावर आहे.

वाहतूक

संपादन

नवी दिल्ली रेल्वे स्थानक हे भारतामधील सर्वात वर्दळीचे स्थानक असून ते भारतीय रेल्वेच्या उत्तर रेल्वे क्षेत्राचे मुख्यालय आहे. त्याचबरोबर हजरत निजामुद्दीन रेल्वे स्थानक, दिल्ली जंक्शन रेल्वे स्थानक, दिल्ली सराई रोहिल्ला रेल्वे स्थानकआनंद विहार टर्मिनल रेल्वे स्थानक ही देखील येथील मोठी रेल्वे स्थानके आहेत. दिल्ली मेट्रो ही भारतामधील सर्वात मोठी जलद परिवहन प्रणाली असून आजच्या घडीला दिल्ली मेट्रोचे जाळे ३८९ किमी एवढे पसरले आहे. इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ हा भारतामधील सर्वात वर्दळीचा विमानतळ नवी दिल्लीच्या नैऋत्येस स्थित असून तो दिल्ली-गुरगांव द्रुतगतीमार्गद्वारे नवी दिल्लीसोबत जोडला गेला आहे.

 
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:

संदर्भ

संपादन
  1. ^ Lahiri, Tripti (13 January 2012). "New Delhi: One of History's Best-Kept Secrets". The Wall Street Journal.