आनंद विहार टर्मिनल रेल्वे स्थानक
आनंद विहार टर्मिनस रेल्वे स्थानक हे भारताच्या दिल्ली शहरामधील एक प्रमुख रेल्वे स्थानक आहे. दिल्लीच्या पूर्व भागातील आनंद विहार उपनगरात स्थित असलेले हे स्थानक २००९ साली तत्कालीन रेल्वेमंत्री ममता बॅनर्जी ह्यांच्या हस्ते उद्घाटित करण्यात आले. नवी दिल्ली रेल्वे स्थानकावरील वाहतूकीचा ताण कमी करण्यासाठी ह्या स्थानकाचे प्रयोजन करण्यात आले होते. ह्या स्थानकाची प्रमुख इमारत नवी मुंबईच्या वाशी रेल्वे स्थानकावरून प्रेरणा घेऊन रचण्यात आली आहे. आजच्या घडीला आनंद विहार टर्मिनसहून दर आठवड्याला ५० लांब पल्ल्याच्या गाड्या सुटतात. प्रामुख्याने दिल्लीच्या पूर्वेकडील उत्तर प्रदेश, बिहार तसेच पश्चिम बंगाल व ईशान्य भारताकडे धावणाऱ्या गाड्या येथून सुटतात.
आनंद विहार टर्मिनल भारतीय रेल्वे स्थानक | |
---|---|
स्थानकाची इमारत | |
स्थानक तपशील | |
पत्ता | आनंद विहार, दिल्ली |
गुणक | 28°30′00″N 77°18′55″E / 28.50000°N 77.31528°E |
समुद्रसपाटीपासूनची उंची | २०९ मी |
मार्ग | दिल्ली-हावडा मुख्य रेल्वेमार्ग |
फलाट | ७ |
इतर माहिती | |
उद्घाटन | इ.स. २००९ |
विद्युतीकरण | होय |
संकेत | ANVT |
मालकी | रेल्वे मंत्रालय, भारतीय रेल्वे |
विभाग | उत्तर रेल्वे |
स्थान | |
|
आनंद विहार टर्मिनस मेट्रो स्थानक दिल्ली मेट्रोच्या निळ्या मार्गिकेवर आहे. तसेच स्वामी विवेकानंद आंतरराज्यीय बस स्थानक येथून जवळच असल्यामुळे ज्यामुळे प्रवाशांना ह्या स्थानकापर्यंत पोचणे सुलभ होते.
गाड्या
संपादनह्या स्थानकामधून अनेक महत्त्वाच्या गाड्या सुटतात.
- आगरताळा राजधानी एक्सप्रेस
- ओडिशा संपर्क क्रांती एक्सप्रेस
- आनंद विहार-लखनौ डबल डेकर एक्सप्रेस
- नॉर्थ ईस्ट एक्सप्रेस
- आनंद विहार-गोरखपूर हमसफर एक्सप्रेस
- आनंद विहार-हावडा युवा एक्सप्रेस