भारतीय रेल्वे मंत्रालय

भारत सरकारचे एक मंत्रालय

भारतीय रेल्वे मंत्रालय हे भारत सरकारचे एक मंत्रालय आहे. भारत देशामधील रेल्वे वाहतूक पार पाडण्याची जबाबदारी रेल्वे मंत्रालयावर आहे. भारतीय रेल्वे ही भारतामधील एकमेव रेल्वे कंपनी रेल्वे मंत्रालयाच्या अखत्यारीत येते. रेल्वे मंत्रालयाचे मुख्यालय नवी दिल्लीमधील रेल भवन येथे असून केंद्र सरकारमधील रेल्वे मंत्री ह्याचे नेतृत्व करतात. रेल्वे मंत्री हे कॅबिनेट दर्जाचे मंत्रीपद भारतामधील सर्वात प्रतिष्ठेच्या व महत्त्वाच्या मंत्रालयांपैकी एक मानले जाते.

रेल्वे मंत्रालयामध्ये एक कॅबिनेट रेल्वे मंत्री तर दोन राज्य-दर्जाचे रेल्वे मंत्री असतात.

रेल्वे अर्थसंकल्प

संपादन

रेल्वेमंत्री दरवर्षी फेब्रुवारी महिन्यात संसदेमध्ये रेल्वे अर्थसंकल्प सादर करतात ज्यामध्ये रेल्वेच्या जमखर्चाचा ताळमेळ, भाडेबदल, नवीन गाड्यांबद्दलची माहिती इत्यादी दिली जाते.

हे सुद्धा पहा

संपादन

बाह्य दुवे

संपादन