नवी दिल्ली रेल्वे स्थानक
चेन्नई शहरामधील एक मोठे रेल्वे स्थानक
नवी दिल्ली रेल्वे स्थानक हे भारताच्या दिल्ली शहरामधील प्रमुख रेल्वे स्थानक आहे. १६ फलाट असलेल्या ह्या स्थानकामधून दररोज सुमारे ३०० गाड्या सुटतात ज्यांमधून अंदाजे ५ लाख प्रवासी प्रवास करतात. हे भारतामधील सर्वात वर्दळीचे रेल्वे स्थानक आहे. भारतीय रेल्वेच्या उत्तर रेल्वे क्षेत्रातील दिल्ली विभागाचे मुख्यालय येथेच आहे.
नवी दिल्ली भारतीय रेल्वे स्थानक | |
---|---|
फलक | |
स्थानक तपशील | |
पत्ता | दिल्ली |
गुणक | 28°38′31″N 77°13′12″E / 28.64194°N 77.22000°E |
समुद्रसपाटीपासूनची उंची | २१४.४२ मी |
फलाट | १६ |
इतर माहिती | |
उद्घाटन | इ.स. १९२६ |
विद्युतीकरण | होय |
संकेत | DEE |
मालकी | रेल्वे मंत्रालय, भारतीय रेल्वे |
विभाग | उत्तर रेल्वे |
स्थान | |
|
नवी दिल्ली रेल्वे स्थानक दिल्ली मेट्रोच्या पिवळ्या मार्गिकेवर आहे ज्यामुळे येथे पोचण्यासाठी मेट्रोचा वापर शक्य होतो. तसेच दिल्ली एअरपोर्ट मेट्रो एक्सप्रेस ही मार्गिका नवी दिल्ली स्थानकाला थेट इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळासोबत जोडते.
गाड्या
संपादनह्या स्थानकामधून भारतामधील अनेक महत्त्वाच्या गाड्या सुटतात.
हे सुद्धा पहा
संपादनबाह्य दुवे
संपादनविकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत