केरळ एक्सप्रेस भारतीय रेल्वेची नवी दिल्ली आणि केरळ राज्यातील त्रिवेंद्रम सेंट्रल दरम्यान धावणारी वेगवान प्रवासी रेल्वेगाडी आहे. हीचे प्रवासाचे अंतर 3037 किमीआहे. नवी दिल्ली ते त्रिवेंद्रम दरम्याचे 40 थांबे आहेत आणि सरासरी वेग प्रती तास 60 किमीआहे. [] भारतीय रेल्वेची सर्वात वेगवान आणि सर्वात लांब पल्याची रेल्वेगाडी जी मंगला लक्षद्वीप एक्सप्रेस दररोज केरळ राज्यातील एर्नाकुलम जंक्शन आणि हजरत निजामुद्दीन दरम्यान धावते व जिचे प्रवासाचे अंतर 3066 किमी आणि सरासरी प्रती तास वेग 62 किमीआहे या रेल्वेगाडी नंतरचा दूसरा क्रमांक या केरळ एक्सप्रेस रेल्वेगाडीचा आहे.

केरळ एक्सप्रेसचा फलक
केरळ एक्सप्रेसचा मार्ग नकाशा

इतिहास

संपादन

सन 1976 मध्ये ही रेल्वेगाडी केरळ – कर्नाटक एक्सप्रेस ( के.के.एक्सप्रेस ) या नावाने नवी दिल्ली ते त्रिवेंद्रम, बंगलोर अशी धावू लागली. प्रारंभी हिचा विस्तार जोलारपेट्टई पर्यंत होता. या रेल्वेगाडीला प्रवासासाठी 46.5 तास लागत होते आणि विश्रांतीचे ठिकाण जोळेपेट्टई दीर्घ वेळ होते कारण तेथे केरळ / कर्नाटक रेल्वेगाडीचे वेगवेगळ्या मार्गावर जाणाऱ्या इतर रेल्वेगाडीच्या बोगींची जोडजोडी व्यवस्था होती. सन 1980 मध्ये ह्या रेल्वेगाडीची विभागणी करून केरळ एक्सप्रेस आणि कर्नाटक एक्सप्रेस अस्या दोन रेल्वेगाडी केल्या. केरळ एक्सप्रेस पुन्हा विभागली आणि एक पालघाट जंक्शन आणि दूसरा भाग मंगलोरकडे वळविला. सोरानपूर तेथे जयंती जनता एक्सप्रेसची विभागणी करून एक भाग कोचीन बंदराकडे आणि दूसरा मंगलोरकडे जात होता त्याना या केरळ एक्सप्रेस रेल्वेगाडीचा भाग जोडला.

नंतर या दोन्ही गाड्यांचे एकत्रीकरण करून केरळ मंगला एक्सप्रेस असे नाव दिले. सन 1990 मध्ये मंगलोरसाठी स्वतंत्र रेल्वेगाडी चालू केली. ती या पुवीच्याच मार्गावरून धावू लागली. प्रारंभी ही रेल्वेगाडी दररोज धावत न्हवती. तामिळनाडू एक्सप्रेस, आंध्र प्रदेश एक्सप्रेस, आणि कर्नाटक एक्सप्रेस या रेल्वेगाडी बरोबर या रेल्वेगाडीचा सहभाग होता. ही रेल्वेगाडी जेव्हा दररोज धावू लागली तेव्हा तिचे स्वतंत्र वेळापत्रक चालू झाले. [] केरळ एक्सप्रेसचा सुरुवातीचा क्रं 125 / 126 होता. नंतर तो सन 1989 मध्ये भारतीय रेल्वेने 4 अंकी नंबर पद्दत स्वीकारली आणि या रेल्वेगाडीचा क्रं. 2625 / 2626 केला. [] सन 2010 मध्ये भारतीय रेल्वेने 5 अंकी नंबर पद्दत स्वीकारली आणि त्यामुळे केरळ एक्सप्रेसचा तो नंबर बदलून चालू क्रं. Up 12625 आणि down 12626 आहे. [][] केरळ एक्सप्रेस आंध्र प्रदेशचा आंध्र प्रदेश एक्सप्रेस पेक्षा अधिक भाग, तामिळनाडूचा तामिळनाडू एक्सप्रेस पेक्षा अधिक भाग फिरते. त्याने ही रेल्वेगाडी नवी दिल्लिसी दक्षिण भारताच्या तीन राज्यांच्या प्रवाश्यांना मोठ्या प्रमाणात मदत करते. दुखद घटना म्हणजे राजकीय दबावामुळे केरळ एक्स्प्रेसला कमी महत्त्वाची ठिकाणे थांबे म्हणून मिळालेत आणि चांगली स्थानके तामिळनाडू एक्सप्रेसला बहाल केलेत. उदाहरण म्हणजे तामिळनाडू रेल्वेगाडीचा सरासरी वेग तासी 67 किमी आणि केरळ एक्स्प्रेसचा तासी सरासरी वेग 60 किमी आहे. अति दूर जाणारे प्रवाशी केरळ एक्सप्रेसचा वेग वाढविण्याची अपेक्षा करताहेत कारण त्यांना वाटते आपण प्रवासास सुरुवात करण्यापूर्वी जेवन घ्यावे आणि आपल्या इछित ठिकाणी तिसऱ्या दिवशी जेवण वेळेचे आधी पोहचावे.

तपशील

संपादन
गाडी क्रमांक मार्ग प्रस्थान आगमन कधी
१२६२५ त्रिवेंद्रम सेंट्रलनवी दिल्ली ११:१५ १३:४५ (तिसऱ्या दिवशी) रोज
१२६२६ नवी दिल्ली – तिरुवनंतपुरम सेंट्रल ११:२५ १४:३५ (तिसऱ्या दिवशी) रोज

बोगी व्यवस्था

संपादन

केरळ एक्स्प्रेस या रेल्वेगाडीला 24 बोगी आहेत. त्यात 7 एसी बोगी, ( 2 टू टायर एसी, 5 थ्रि टायर एसी ) 4 सामान्य बोगी, आणि एक खान पान व्यवस्था बोगी. सामान्यतः ही रेल्वेगाडी WAP 4 ने पळविली जाते आणि हिचा कमाल वेग तासी 110 किमी आहे. या रेल्वेगाडीला लवकरच नवीन LHB बोगी मंजूर कराव्यात आणि WAP 7 locoचा वापर करावा असी अति दूर प्रवास करणारे प्रवाशी अपेक्षा करताहेत.

मुख्य स्थानक

संपादन

या रेल्वेगाडीचे प्रवासा दरम्यान तिरुवनन्तपुरम ते नवी दिल्ली दरम्यान मुख्य 32 स्थानक आहेत.

संदर्भ

संपादन
  1. ^ "तिरुवानंतपुरम केंद्र (त्रिवेंद्रम) आणि नवी दिल्ली दरम्यानची स्थानके" (इंग्लिश भाषेत). २८ जुलै २०१५ रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
  2. ^ "बदल रेल्वे" (इंग्लिश भाषेत). २८ जुलै २०१५ रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
  3. ^ "जुन्या रेल्वेंचे क्रमांक व नव्या रेल्वेंचे क्रमांक" (इंग्लिश भाषेत). २८ जुलै २०१५ रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
  4. ^ "केरळ एक्सप्रेस वेळापत्रक" (इंग्लिश भाषेत). 2015-09-08 रोजी मूळ पान पासून संग्रहित. २८ जुलै २०१५ रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
  5. ^ "रेल्वे गाड्या निरीक्षण 5 अंकी क्रमांक योजना स्थलांतर" (इंग्लिश भाषेत). २८ जुलै २०१५ रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)

बाह्य दुवे

संपादन