गाझियाबाद
गाझियाबाद हे भारताच्या उत्तर प्रदेश राज्यामधील एक मोठे शहर आहे. गाझियाबाद शहर उत्तर प्रदेशच्या पश्चिम भागात नवी दिल्लीपासून २५ किमी व नोएडापासून २० किमी अंतरावर वसले आहे. दिल्लीच्या राष्ट्रीय राजधानी क्षेत्राचा भाग असलेल्या गाझियाबादची लोकसंख्या २०११ साली २३ लाख होती. गाझियाबाद पश्चिम उत्तर प्रदेशातील प्रगत औद्योगिक क्षेत्रांपैकी एक आहे.
गाझियाबाद | |
उत्तर प्रदेशमधील शहर | |
गाझियाबाद रेल्वे स्थानक |
|
देश | भारत |
राज्य | उत्तर प्रदेश |
जिल्हा | गाझियाबाद जिल्हा |
क्षेत्रफळ | १,९३३ चौ. किमी (७४६ चौ. मैल) |
समुद्रसपाटीपासुन उंची | ७०२ फूट (२१४ मी) |
लोकसंख्या (२०११) | |
- शहर | २३,८१,४५२ |
- घनता | १,२०० /चौ. किमी (३,१०० /चौ. मैल) |
प्रमाणवेळ | भारतीय प्रमाणवेळ |
गाझियाबादची स्थापना इ.स. १७४० मध्ये मुघल साम्राज्यादरम्यान केली गेली. भारताच्या स्वातंत्र्यानंतर गाझियाबादची झपाट्याने प्रगती झाली व येथे अनेक कारखाने व उद्योग उभारले. अजच्या घडीला उत्तर प्रदेशामधील औद्योगिक शहरांमध्ये कानपूर खालोखाल गाझियाबादचा क्रमांक लागतो. दिल्लीच्या जवळ स्थित असल्यामुळे गाझियाबादमध्ये मोठ्या प्रमाणावर गृहसंकुले उभी राहिली आहेत व गाझियाबादला दिल्लीच्या उपनगराचा दर्जा प्राप्त झाला आहे.
वाहतूक
संपादनगाझियाबाद शहर भारतामधील इतर भागांसोबत महामार्ग व रेल्वेमार्गांद्वारे जोडले गेले आहे. दिल्लीचा इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ येथून ४५ मिनिटांच्या अंतरावर आहे. दिल्लीचा आनंद नगर बसस्टॅंड गाझियाबादच्या पश्चिमेस आहे. राष्ट्रीय महामार्ग २४, राष्ट्रीय महामार्ग ५८ व राष्ट्रीय महामार्ग ९१ गाझियाबादमधूनच जातात.
दिल्ली मेट्रोची लाल रंगाची मर्गिका सध्याच्या घडीला दिलशाद गार्डन स्थानकापर्यंत धावते. हे स्थानक गाझियाबादहून १८ किमी अंतरावर आहे. ही मार्गिका २०१७ पर्यंत गाझियाबाद बस स्थानकापर्यंत वाढवली जाईल असा अंदाज आहे. ह्यामुळे गाझियाबाद मेट्रोद्वारे दिल्लीसोबत जोडले जाईल.