अमेरिकन डॉलर
अमेरिकन डॉलर (इंग्लिश: United States dollar; चिन्ह: $) हे अमेरिकेची संयुक्त संस्थाने (किंवा अमेरिकेची संयुक्त संस्थाने) या राष्ट्राचे अधिकृत चलन आहे. तसेच भारतासह इतर अनेक राष्ट्रांत ते राखीव साठा चलन म्हणूनदेखील वापरले जाते. या चलनाच्या वितरणाचे नियंत्रण अमेरिकेच्या केंद्रीय रिझर्व बँक या संस्थेद्वारा केले जाते. या चलनासाठी $ हे चिन्ह सामान्यतः प्रचलित आहे. तसेच, ISO 4217 प्रणालीनुसार अमेरिकन डॉलरचे चिन्ह USD असे असून, आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनुसार US$ असे आहे.
United States dollar US$ | |
---|---|
ISO 4217 | |
Code | USD (numeric: 840) |
Subunit | ०.०१ |
चलनाचे विभाजन | |
Subunit | |
१०० सेंट | {{{subunit_name_1}}} |
Banknotes | $१, $२, $५, $१०, $२०, $५०, $१०० |
Coins | १¢, ५¢, १०¢, २५¢, ५०¢, १$ |
भौगोलिक माहिती | |
User(s) | अमेरिका |
१९९५ साली ३८० अब्ज डॉलर चलनात होते, व त्यापैकी दोन-तृतीयांश हे अमेरिकेबाहेर होते. एप्रिल २००४ च्या अंदाजानुसार, सुमारे ७०० अब्ज [८] इतके डॉलर चलनात होते, व तेव्हासुद्धा त्यापैकी सुमारे अर्धे ते दोन-तृतीयांश हे अमेरिकेबाहेर होते [९].
अमेरिका हा डॉलर या नावाचे चलन वापरणार्या अनेक देशांपैकी एक आहे. (इतर अनेक देशांची "डॉलर" या नावाची स्वतंत्र चलने आहेत. उदा. कॅनडा,ऑस्ट्रेलिया, न्यू झीलंड, सिंगापुर, जमैका इ.) तसेच, अनेक राष्ट्रांमध्ये अमेरिकन डॉलर हे अधिकृत चलन आहे किंवा व्यवहारासाठी वैध चलन म्हणून मान्यताप्राप्त आहे.
संदर्भ
संपादन- ^ US Dollar and Pakistani rupee are widely accepted.
- ^ Alongside Cambodian Riel
- ^ Alongside East Timor centavo coins
- ^ Alongside Ecuadorian centavo coins
- ^ Salvadoran colón is now used only by some banks in few electronic transactions.
- ^ Alongside Panamanian balboa coins
- ^ Alongside Zimbabwean dollar (suspended indefinitely from 12 April 2009), Euro, Pound Sterling, South African rand and Botswana pula. The US Dollar has been adopted as the official currency for all government transactions.
- ^ [१]
- ^ http://www.federalreserve.gov/paymentsystems/coin/default.htm Archived 2004-12-25 at the Wayback Machine. फेडरल रिझर्व
हे सुद्धा पहा
संपादन- डॉलर - निसंदिग्धकरण
बाह्य दुवे
संपादनविकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |
- अधिकृत संकेतस्थळ (इंग्रजी)
- नाणी Archived 2016-11-10 at the Wayback Machine. (इंग्रजी)
- अमेरिकन डॉलर (नोटा) (इंग्रजी) (जर्मन)