कॅनडा हा उत्तर अमेरिकेतील एक प्रमुख देश आहे. रशियानंतर कॅनडा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा मोठा देश आहे.

कॅनडा
Canada
कॅनडा
कॅनडाचा ध्वज कॅनडाचे चिन्ह
ध्वज चिन्ह
ब्रीद वाक्य: A Mari Usque Ad Mare (लॅटिन)
(समुद्रापासून समुद्रापर्यंत)
राष्ट्रगीत: ओ कॅनडा
कॅनडाचे स्थान
कॅनडाचे जागतिक नकाशावरील स्थान
राजधानी ओटावा
सर्वात मोठे शहर टोराँटो
अधिकृत भाषा इंग्रजी, फ्रेंच
सरकार
 - राष्ट्रप्रमुख एलिझाबेथ दुसरी (राणी), मिकाएल ज्याँ (गव्हर्नर जनरल)
 - पंतप्रधान स्टीवन हार्पर
महत्त्वपूर्ण घटना
 - स्वातंत्र्य दिवस (ब्रिटनपासून)
जुलै १, १८६७ 
क्षेत्रफळ
 - एकूण ९९,८४,६७० किमी (२वा क्रमांक)
 - पाणी (%) ८.९२
लोकसंख्या
 -एकूण ३,२६,०१,३६० (३६वा क्रमांक)
 - घनता ३.३/किमी²
वार्षिक सकल उत्पन्न (पीपीपी)
 - एकूण १.१०५ निखर्व अमेरिकन डॉलर (११वा क्रमांक)
 - वार्षिक दरडोई उत्पन्न ३४,२७३ अमेरिकन डॉलर (७वा क्रमांक)
राष्ट्रीय चलन कॅनेडियन डॉलर
आंतरराष्ट्रीय कालविभाग यूटीसी -३.५ ते -८
-२.५ ते -७ (DST)
आय.एस.ओ. ३१६६-१ CA
आंतरजाल प्रत्यय .ca
आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक +१
राष्ट्र_नकाशा

हा देश अतिशय श्रीमंत असून तो संयुक्त राष्ट्रे, जी-८ तसेच जी-२० या प्रमुख आंतराष्ट्रीय संघटनांचा सदस्य आहे.

अनुक्रमणिका

इतिहाससंपादन करा

नावाची व्युत्पत्तीसंपादन करा

कॅनडा हे नाव इराक्वॉस जमातीतील गाव किंवा वाडी या अर्थाच्या शब्दापासून आलेले आहे.

प्रागैतिहासिक कालखंडसंपादन करा

भूगोलसंपादन करा

कॅनडा उत्तर अमेरिकेच्या उत्तर भागात पसरलेला विशाल देश आहे. याला फक्त अमेरिकेशी सीमा आहे व कॅनडाच्या इतर तीन बाजूंना समुद्र आहेत.

चतु:सीमासंपादन करा

कॅनडाच्या दक्षिणेला अमेरिका, पूर्वेला अटलांटिक महासागर, उत्तरेला आर्क्टिक महासागर तर पश्चिमेला पॅसिफिक महासागर व अमेरिकेचे अलास्का राज्य आहेत.

राजकीय विभागसंपादन करा

कॅनडाचे १० प्रांत व तीन इतर राजकीय प्रदेश आहेत.

मोठी शहरेसंपादन करा

१० सर्वात मोठी शहरे
शहर लोकसंख्या
टोराँटो
२६,१५,०६०
माँत्रियाल
१६,४९,५१९
कॅल्गारी
१०,९६,८३३
ओटावा
८,८३,३९१
एडमंटन
८,१२,२०१
मिसिसागा
७,१३,४४३
विनिपेग
६,६३,६१७
व्हँकूव्हर
६,०३,५०२
हॅमिल्टन
५,१९,९४९
क्वेबेक सिटी
५,१६,६२२

समाजव्यवस्थासंपादन करा

वस्तीविभागणीसंपादन करा

इ.स. २००६च्या अंदाजानुसार कॅनडाची लोकसंख्या ३,१६,१२,८९७ आहे. येथील लोकसंख्येतील वाढ मुख्यत्वे बाहेरदेशातून येणाऱ्या लोकांमुळे आहे. वस्तीवृद्धीचा दर वर्षास ५.४% आहे.

कॅनडातील तीन चतुर्थांश वस्ती कॅनडा व अमेरिकेच्या सीमेपासून १५० कि.मी. (९० मैल) अंतराच्या आत राहते.

धर्मसंपादन करा

कॅनडा मधील धर्म (२०११)[१]
ख्रिश्चन धर्म
  
67.2%
निधर्मी
  
23.9%
इस्लाम
  
3.2%
हिंदू धर्म
  
1.5%
शिख धर्म
  
1.4%
बौद्ध धर्म
  
1.1%
ज्यू धर्म
  
1.0%
इतर
  
0.6%

धर्मनिरपेक्षता ही कॅनडातील जनतेचे महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. इ.स. २०११ च्या जनगणनेनुसार कॅनडातील लोकसंख्येत ६७.२% ख्रिश्चन, २३.९% निधर्मी, ३.२% मुस्लिम, १.५% हिंदू, १.४% शिख, १.१ बौद्ध, १% ज्यू व ०.६% इतरधर्मीय आहेत.

शिक्षणसंपादन करा

कॅनडातील प्रांत व प्रदेश आपआपल्या भागातील शिक्षणव्यवस्थेची रचना ठरवतात. या सगळ्या व्यवस्था साधारण सारख्याच असतात परंतु त्यात प्रदेशानुसार संस्कृती व भूगोलाबद्दलची माहिती वेगवेगळी असते.[२] प्रदेशानुसार वयाच्या ५-७ पासून १६-१८ वर्षांपर्यंतचे शिक्षण सक्तीचे आहे. यामुळे कॅनडातील साक्षरताप्रमाण ९९% आहे. उच्चमाध्यमिक शिक्षणसुद्धा प्रांतीय व प्रादेशिक सरकारचालवतात व त्याचा खर्च सरकारी तिजोरीतून येतो. याशिवाय केंद्र सरकारकडून संशोधनासाठी निधी आणि विद्यार्थ्यांना कर्ज तसेच शिष्यवृत्ती दिल्या जातात. इ.स. २००२मध्ये कॅनडातील २५ ते ६४ वर्षांमधील व्यक्तींपैकी ४३% व्यक्तींनी उच्चमाध्यमिक शिक्षण घेतलेले होते तर २५-३४ वर्षांमधील व्यक्तींपैकी ५१% व्यक्ती उच्चशिक्षित होत्या.[३]

राजकारणसंपादन करा

अर्थतंत्रसंपादन करा

कॅनडा जगातील धनाढ्य देशांपैकी एक आहे व त्यामुळे तो ओ.ई.सी.डी. आणि जी-८ या संघटनांमध्ये शामिल आहे. कॅनडा जगातील व्यापारउदीमातील पहिल्या दहा देशांमधील एक आहे.[४] कॅनडाचे अर्थतंत्र मिश्र स्वरुपाचे आहे.[५] हेरिटेज फाउंडेशनने या देशाला आर्थिक स्वातंत्र्याच्या बाबतीत अमेरिकेपेक्षा खाली तर युरोपमधील देशांपेक्षा वर क्रमित केलेले आहे.[६]

संदर्भ व नोंदीसंपादन करा

  1. .
  2. Council of Ministers of Canada. कॅनडातील शिक्षणपद्धतीचे सिंहावलोकन. Education@Canada. 2006-05-22 रोजी पाहिले.
  3. Department of Finance (2005-11-14). "कॅनडातील उच्चशिक्षण". Department of Finance Canada. (आधीच्या मूळ आवृत्तीत त्रूटी जाणवल्याने विदागारातील आवृत्ती दिनांक २५ ऑगस्ट २०१४ रोजी मिळविली). 2006-05-22 रोजी पाहिले. 
  4. WTO (2008-04-17). Latest release. WTO. 2008-07-03 रोजी पाहिले.
  5. PBS, Commanding Heights, map of the world's economic systems. 2008-01-31 रोजी पाहिले.
  6. The Heritage Foundation (2008). Index of Economic Freedom. The Heritage Foundation. 2009-01-09 रोजी पाहिले.