अलास्का
ह्या लेखाला एकही संदर्भ दिला गेलेला नाही. विश्वसनीय स्रोत जोडून या लेखातील माहितीची पडताळणी करण्यात मदत करा. संदर्भ नसल्याने प्रस्तुत लेखाची उल्लेखनीयता ही सिद्ध होत नाही. संदर्भहीन मजकूराची पडताळणी करता येत नसल्याने व उल्लेखनीयता सिद्ध होत नसल्याने हा लेख काढून टाकला जाऊ शकतो याची नोंद घ्यावी. |
अलास्का हे अमेरिकेच्या ५० राज्यांपैकी एक आहे. अलास्का व हवाई ही दोन राज्ये अमेरिकेच्या एकमेकांशी संलग्न असलेल्या अन्य ४८ राज्यांपासून वेगळी पडली आहेत. अलास्काच्या पूर्वेला कॅनडा देशाचे युकॉन व ब्रिटिश कोलंबिया हे प्रांत, उत्तरेला आर्क्टिक महासागर व पश्चिम व दक्षिणेला प्रशांत महासागर आहे. पश्चिमेला बेरिंगची सामुद्रधुनी अलास्काला रशियापासून वेगळे करते. क्षेत्रफळाच्या दृष्टीने अलास्का हे अमेरिकेचे सर्वात मोठे राज्य आहे, परंतु लोकसंख्या घनतेच्या दृष्टीने अलास्का अमेरिकेतील सर्वात तुरळक लोकवस्तीचे (०.४९ व्यक्ती प्रति चौरस किमी) राज्य आहे.
अलास्का | |||||||||||
अमेरिका देशाचे राज्य | |||||||||||
| |||||||||||
अधिकृत भाषा | - | ||||||||||
इतर भाषा | इंग्लिश | ||||||||||
रहिवासी | अलास्कन | ||||||||||
राजधानी | जुनू | ||||||||||
मोठे शहर | ॲंकरेज | ||||||||||
सर्वात मोठे महानगर | ॲंकरेज | ||||||||||
क्षेत्रफळ | अमेरिकेत १वा क्रमांक | ||||||||||
- एकूण | १७,१७,८५४ किमी² (६,६३,२६८ मैल²) | ||||||||||
- रुंदी | ३,६३९ किमी | ||||||||||
- लांबी | २,२८५ किमी | ||||||||||
- % पाणी | १३.७७ | ||||||||||
लोकसंख्या | अमेरिकेत ४७वा क्रमांक | ||||||||||
- एकूण | ७,३१,४४९ (२०१० सालच्या गणनेनुसार) | ||||||||||
- लोकसंख्या घनता | ०.४९/किमी² (अमेरिकेत ५०वा क्रमांक) | ||||||||||
- सरासरी उत्पन्न | $६४,३३३ | ||||||||||
संयुक्त संस्थानांमध्ये प्रवेश | (४९वावा क्रमांक) | ||||||||||
गव्हर्नर | शॉन पार्नेल | ||||||||||
संक्षेप | AK US-AK | ||||||||||
संकेतस्थळ | www.alaska.gov |
इ.स. १८६७ साली अमेरिकेने अलास्का प्रदेश रशियन साम्राज्याकडून ७२ लाख डॉलर्स किंमतीला विकत घेतला. ११ मे १९१२ रोजी अलास्काला अमेरिकेचा एक प्रदेश बनवण्यात आले तर ३ जानेवारी १९५९ रोजी अलास्का अमेरिकन संघामधील ४९वे राज्य बनले. जुनू ही अलास्काची राजधानी तर ॲंकरेज हे येथील सर्वात मोठे शहर व महानगर आहे. अलास्कामधील ५० टक्के रहिवासी ॲंकरेज महानगर क्षेत्रामध्येच राहतात.
अलास्काची अर्थव्यवस्था खनिज तेल, नैसर्गिक वायू व मासेमारी ह्या नैसर्गिक संपत्तीवर अवलंबून असून येथील वार्षिक दरडोई उत्पन्न अमेरिकेमध्ये चौथ्या क्रमांकावर आहे.
गॅलरी
संपादन-
येथील माउंट मॅककिन्ले हा पर्वत उत्तर अमेरिकेमधील सर्वात उंच पर्वत आहे.
-
अलास्का राज्य विधान भवन
-
अलास्काचे प्रतिनिधित्व करणारे २५ सेंट्सचे नाणे
संदर्भ
संपादनबाह्य दुवे
संपादन- Alaska.gov – अधिकृत संकेतस्थळ
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |