हवाई हे अमेरिकेच्या ५०पैकी एक राज्य आहे. अमेरिकेच्या राज्यांपैकी हे एकमेव राज्य उत्तर अमेरिका खंडाच्या भूभागाशी जोडलेले नाही. हवाई प्रशांत महासागरामध्ये उत्तर अमेरिका खंडाच्या नैऋत्येला, जपानच्या आग्नेयेला व ऑस्ट्रेलियाच्या ईशान्येला पॉलिनेशिया उपखंडात मोठ्या द्वीपसमूहावर वसले आहे. हवाई हे अमेरिकेचे ५०वे व सर्वात नवे राज्य आहे.१८९८पूर्वी हवाई हा स्वतंत्र देश होता.१८९८ सालापासून अमेरिकेचा भूभाग असलेल्या हवाईला २५ ऑगस्ट १९५९ रोजी राज्याचा दर्जा देण्यात आला.

State of Hawaii
Mokuʻāina o Hawaiʻi
Flag of the United States अमेरिका देशाचे राज्य
हवाई राज्याचा ध्वज हवाई राज्याचे राज्यचिन्ह
ध्वज चिन्ह
टोपणनाव: द अलोहा स्टेट (The Aloha State)
हवाई दर्शविणारा नकाशा
हवाई दर्शविणारा नकाशा

अमेरिकेच्या नकाशावर हवाईचे स्थान
अधिकृत भाषा इंग्लिश, हवाईयन
राजधानी होनोलुलु
मोठे शहर होनोलुलु
क्षेत्रफळ  अमेरिकेत ४३वा क्रमांक
 - एकूण २८,३११ किमी² 
 - % पाणी ४१.२
लोकसंख्या  अमेरिकेत ४२वा क्रमांक
 - एकूण १२,८८,१९८ (२०१० सालच्या गणनेनुसार)
 - लोकसंख्या घनता ७२.८३/किमी² (अमेरिकेत १३वा क्रमांक)
संयुक्त संस्थानांमध्ये प्रवेश २१ ऑगस्ट १९५९ (५०वा क्रमांक)
संक्षेप HI Tex US-HI
संकेतस्थळ www.hawaii.gov/

प्रशांत महासागरात १,५०० मैल पट्ट्यात पसरलेल्या हवाई द्वीपसमूहामधील हवाई, नीहाऊ, काऊई, ओहाऊ, मोलोकाई, लानाई, काहूलावीमाऊई ही आठ प्रमुख बेटे आहेत.