जर्मन भाषा (जर्मन: Deutsch; उच्चार: डॉइच) ही पश्चिम जर्मेनिक भाषाकुळातील भाषा असून ती जर्मनीची प्रमुख भाषा आहे. जगभरात ९.५ - १२ कोटी लोक 'प्रथम भाषा' म्हणून व २ कोटी लोक 'द्वितीय भाषा' म्हणून जर्मनचा वापर करतात. भाषिक लोकसंख्येनुसार जर्मन भाषेचा जगभरातील भाषांमध्ये १०वा क्रमांक आहे. जर्मनला अधिकृत राजभाषेचा दर्जा ऑस्ट्रिया, बेल्जियम, डेन्मार्क, युरोपियन युनियन, जर्मनी, इटली, लाइश्टेनस्टाइन, लक्झेंबर्ग, स्वित्झर्लंडनामिबिया या देशात/संस्थात आहे.

जर्मन
डॉइच
स्थानिक वापर जर्मनी, ऑस्ट्रिया, स्वित्झर्लंड व इतर
प्रदेश युरोप, काही प्रमाणात- नामिबिया
लोकसंख्या ९.५-११.८ कोटी (प्रथमभाषा)
२ कोटी (द्वितीयभाषा)
क्रम १०
बोलीभाषा होखडॉइच, फ्रांकनडॉइच, श्वाबनडॉइच, बेर्नीयनडॉइच
भाषाकुळ
लिपी रोमन लिपी
अधिकृत दर्जा
प्रशासकीय वापर जर्मनी, ऑस्ट्रिया, स्वित्झर्लंड, लक्झेंबर्ग, लिस्टनस्टाइन व इतर
भाषा संकेत
ISO ६३९-१ de
ISO ६३९-२ ger/deu
ISO ६३९-३ deu
भाषिक प्रदेशांचा नकाशा

जर्मन भाषिक प्रदेश

बाह्य दुवे

संपादन