स्वित्झर्लंड

मध्य युरोपमधील सांघिक प्रजासत्ताक


स्वित्झर्लंड पश्चिम युरोपामधील एक भूपरिवेष्टित देश आहे. आल्प्स पर्वतरांगेमध्ये ४१,२८५ चौरस कि.मी. इतक्या छोट्या क्षेत्रफळावर वसलेल्या ह्या देशाची लोकसंख्या ७६,००,००० आहे. स्वित्झर्लंडच्या उत्तरेस जर्मनी, पश्चिमेस फ्रान्स, दक्षिणेस इटली, पूर्वेस ऑस्ट्रियालिश्टनस्टाइन हे देश आहेत. स्वित्झर्लंड हे २६ कँटनांनी - म्हणजे राज्यांनी - बनलेले संघराज्यीय प्रजासत्ताक आहे. स्वित्झर्लंडमध्ये सरकारप्रमुख किंवा राष्ट्रप्रमुख केवळ एक व्यक्ती नसून ७ सदस्य असलेली एक संघीय समिती देशाचा कार्यभार एकत्रितपणे चालवते. ह्या प्रकारचे सरकार असलेला स्वित्झर्लंड हा जगातील एकमेव देश आहे. स्वित्झर्लंडची राजधानी बर्न तर जिनिव्हा, झ्युरिक, बासललोझान ही शहरे मोठी शहरे आहेत.

स्वित्झर्लंड
Schweizerische Eidgenossenschaft (जर्मन)
Confédération suisse (फ्रेंच)
Confederazione Svizzera (इटालियन)
Confederaziun svizra (रोमान्श)
स्वित्झर्लंडचे संघराज्य
स्वित्झर्लंडचा ध्वज स्वित्झर्लंडचे चिन्ह
ध्वज चिन्ह
ब्रीद वाक्य: Unus pro omnibus, omnes pro uno (लॅटिन)
('सर्वांकरता एक, एककरता सर्व')
राष्ट्रगीत: स्विस साल्म
स्वित्झर्लंडचे स्थान
स्वित्झर्लंडचे स्थान
स्वित्झर्लंडचे जागतिक नकाशावरील स्थान
राजधानी बर्न
सर्वात मोठे शहर झ्युरिक
अधिकृत भाषा जर्मन, फ्रेंच, इटालियन, रोमान्श
सरकार संघीय प्रजासत्ताक
महत्त्वपूर्ण घटना
 - निर्मिती अंदाजे इ.स. १३०० 
 - बासेलचा तह 22 सप्टेंबर 1499 
 - वेस्टफालियाची शांतता 24 ऑक्टोबर 1648 
 - संघराज्य 12 सप्टेंबर 1848 
क्षेत्रफळ
 - एकूण ४१,२८५ किमी (१३३वा क्रमांक)
 - पाणी (%) ४.२
लोकसंख्या
 -एकूण ८०,१४,००० (९५वा क्रमांक)
 - गणती {{{लोकसंख्या_गणना}}}

{{{लोकसंख्या_गणना_वर्ष}}}

 - घनता १८८/किमी²
वार्षिक सकल उत्पन्न (पीपीपी)
 - एकूण ३७०.२७७ अब्ज अमेरिकन डॉलर (३९वा क्रमांक)
 - वार्षिक दरडोई उत्पन्न ४५,९९९ अमेरिकन डॉलर 
मानवी विकास निर्देशांक  . ०.९१३  (अति उच्च) (९ वा) (२००९)
राष्ट्रीय चलन स्विस फ्रँक
आंतरराष्ट्रीय कालविभाग मध्य युरोपीय प्रमाणवेळ (CET) (यूटीसी+०१:००)
आय.एस.ओ. ३१६६-१ CH
आंतरजाल प्रत्यय .ch
आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक ४१
राष्ट्र_नकाशा
राष्ट्र_नकाशा

पारंपारिक काळापासून स्वित्झर्लंड तटस्थ राहण्याच्या भूमिकेवर कायम आहे. जगात शांतता राखण्यावर स्वित्झर्लंडने कायम भर दिला आहे. २००२ सालापर्यंत स्वित्झर्लंडने संयुक्त राष्ट्रसंघामध्ये सामील होण्यास नकार दिला होता. सध्या स्वित्झर्लंड युरोपियन संघाचा सदस्य नसलेला युरोपामधील एकमेव आघाडीचा देश आहे. रेड क्रॉस ह्या आंतरराष्ट्रीय संस्थेचा उगम येथेच झाला.

इतिहास संपादन

नावाची व्युत्पत्ती संपादन

प्रागैतिहासिक कालखंड संपादन

अर्वाचीन इतिहास संपादन

भूगोल संपादन

स्वित्झर्लंड युरोप खंडाच्या मध्य पश्चिम भागात स्थित असून त्याच्या भोवताली जर्मनी, फ्रान्स, इटली, ऑस्ट्रियालिश्टनस्टाइन हे देश आहेत. स्वित्झर्लंडचा दक्षिण व आग्नेय भाग आल्प्स पर्वताने व्यापला आहे. ऱ्हाइनऱ्होन ह्या युरोपामधील दोन प्रमुख नद्यांचा उगम स्वित्झर्लंडमध्ये होतो. जिनिव्हा हे मोठे सरोवर देशाच्या नैऋत्य भागात फ्रान्सच्या सीमेवर तर बोडनसे हे सरोवर ईशान्य भागात जर्मनी व ऑस्ट्रिया देशांच्या सीमेजवळ स्थित आहेत.

चतुःसीमा संपादन

राजकीय विभाग संपादन

स्वित्झर्लंड देश एकूण २६ राज्यांमध्ये विभागला गेला आहे.

मोठी शहरे संपादन

समाजव्यवस्था संपादन

वस्तीविभागणी संपादन

धर्म संपादन

शिक्षण संपादन

संस्कृती संपादन

राजकारण संपादन

अर्थतंत्र संपादन

खेळ संपादन

 
१७ ग्रँड स्लॅम टेनिस स्पर्धा जिंकणारा स्वित्झर्लंडचा रॉजर फेडरर हा जगातील सर्वात यशस्वी टेनिस खेळाडू आहे.

बाह्य दुवे संपादन

 
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: