ऑस्ट्रिया

मध्य युरोपातील एक देश


ऑस्ट्रिया (ऑस्ट्रियन जर्मन: Österreich) मध्य युरोपातील एक भूपरिवेष्ठित देश आहे. ह्याच्या उत्तरेस जर्मनीझेकीया, पूर्वेस स्लोव्हाकियाहंगेरी, दक्षिणेस स्लोव्हेनियाइटली तर पश्चिमेस स्वित्झर्लंडलिश्टनस्टाइन हे देश आहेत. व्हिएन्ना ही ऑस्ट्रियाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. प्रामुख्याने आल्प्स पर्वतरांगेमध्ये वसलेल्या ऑस्ट्रियाचा मोठा भूभाग डोंगराळ स्वरूपाचा असून ६८ टक्के भूभाग समुद्रसपाटीहून ५०० मी व अधिक उंचीवर स्थित आहे. जर्मन ही ऑस्ट्रियाची राष्ट्रभाषा आहे.

ऑस्ट्रिया
Republik Österreich
ऑस्ट्रियाचे प्रजासत्ताक
ऑस्ट्रियाचा ध्वज ऑस्ट्रियाचे चिन्ह
ध्वज चिन्ह
राष्ट्रगीत: लांड देर बेर्गा, लांड आम श्ट्रोमा
(जर्मन)
पर्वतांचा देश, नदीतीरावर वसलेला देश
ऑस्ट्रियाचे स्थान
ऑस्ट्रियाचे स्थान
ऑस्ट्रियाचे जागतिक नकाशावरील स्थान
राजधानी
(व सर्वात मोठे शहर)
व्हियेना
अधिकृत भाषा जर्मन
इतर प्रमुख भाषा हंगेरियन,
स्लोव्हेनियन,
क्रोएशियन
सरकार संघीय सांसदीय प्रजासत्ताक
महत्त्वपूर्ण घटना
 - पवित्र रोमन साम्राज्याचे राज्य इ.स. ११५६ 
 - ऑस्ट्रियन साम्राज्य इ.स. १८०४ 
 - ऑस्ट्रिया-हंगेरी इ.स. १८६७ 
 - पहिले ऑस्ट्रियन प्रजासत्ताक इ.स. १९१८ 
 - आन्श्लुस इ.स. १९३८ 
 - दुसरे ऑस्ट्रियन प्रजासत्ताक इ.स. १९४५ पासून 
युरोपीय संघात प्रवेश १ जानेवारी १९९५
क्षेत्रफळ
 - एकूण ८३,८७९ किमी (११३वा क्रमांक)
 - पाणी (%) १.७
लोकसंख्या
 - २००९ ८७,९४,२६७ (९२वा क्रमांक)
 - गणती {{{लोकसंख्या_गणना}}}

{{{लोकसंख्या_गणना_वर्ष}}}

 - घनता ९६/किमी²
वार्षिक सकल उत्पन्न (पीपीपी)
 - एकूण $४१.५९४ हजार कोटी अमेरिकन डॉलर (३४वा क्रमांक)
 - वार्षिक दरडोई उत्पन्न ४७,८५६ अमेरिकन डॉलर (१७वा क्रमांक)
मानवी विकास निर्देशांक  . ०.८८५ (अति उच्च) (२३ वा) (२०१४)
राष्ट्रीय चलन युरो (EUR)
आंतरराष्ट्रीय कालविभाग मध्य युरोपीय प्रमाणवेळ (यूटीसी+०१:००)
आय.एस.ओ. ३१६६-१ AT
आंतरजाल प्रत्यय .at
आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक +४३
राष्ट्र_नकाशा
राष्ट्र_नकाशा

ऐतिहासिक काळापासून युरोपाच्या इतिहासामध्ये महत्त्वाचे स्थान असलेला ऑस्ट्रिया बहुतेक सर्व मोठ्या युद्धांना सामोरा गेला आहे. मध्य युगत पवित्र रोमन साम्राज्यचा भाग राहिलेल्या ऑस्ट्रियावर हाब्सबुर्ग राजघराण्याची सत्ता होती. प्रोटेस्टंट सुधारणांनंतर ऑस्ट्रियामध्ये प्रोटेस्टंट पंथ झपाट्याने लोकप्रिय झाला. तीस वर्षांचे युद्ध प्रमुख्याने मध्य युरोपातच लढले गेले. १७व्या व १८व्या शतकांदरम्यान ऑस्ट्रिया युरोपातील सर्वात बलाढ्य राष्ट्रांपैकी एक होता. १८०४ साली फ्रान्समध्ये झालेल्या नेपोलियनच्या राज्याभिषेकाला शह देण्यासाठी ऑस्ट्रियन साम्राज्यची स्थापना करण्यात आली. ह्याचदरम्यान जर्मनीमध्ये प्रशियाचे राजतंत्र देखील बलशाली बनले होते. जर्मन-भाषिक राष्ट्रांवरील वर्चस्वासाठी १८६६ साली ऑस्ट्रो-प्रशियन युद्ध झाले ज्यामध्ये प्रशियाचा विजय झाला. १८६७ साली ऑस्ट्रिया व हंगेरीचे राजतंत्र ह्यांनी ऑस्ट्रिया-हंगेरी ह्या एकत्रित राष्ट्राची निर्मिती केली. ह्यानंतरच्या काळात जर्मन साम्राज्यासोबत ऑस्ट्रियाचे सौदार्हाचे संबंध बनले. इ.स. १९१० च्या पूर्वार्धातील अत्यंत तणावपूर्ण वातावरणादरम्यानच १९१४ साली बोस्निया आणि हर्जगोव्हिनाची राजधानी सारायेव्हो येथे ऑस्ट्रियाचा आर्कड्युक फ्रान्झ फर्डिनांड ह्याची हत्या केली गेली. ह्यामुळे खवळून उठलेल्या ऑस्ट्रियाने जर्मन साम्राज्याच्या चिथावणीखाली येऊन सर्बियाविरुद्ध युद्ध पुकारले ज्याचे रूपांतर झपाट्याने पहिल्या महायुद्धात झाले.

१९१८ मधील पराभवानंतर पहिले ऑस्ट्रियन प्रजासत्ताक निर्माण करण्यात आले. ऑस्ट्रियामध्ये जन्मलेला ॲडॉल्फ हिटलर १९३४ साली नाझी जर्मनीचा राष्ट्रप्रमुख बनला व १९३८ साली ऑस्ट्रिया जर्मनीमध्ये विलीन (आन्श्लुस) केले गेले. १९४५ साली दुसऱ्या महायुद्धानंतर दुसऱ्या व सद्य ऑस्ट्रियन प्रजासत्ताकाचा उदय झाला. आजच्या घडीला ऑस्ट्रिया जगातील सर्वात श्रीमंत व सुबत्त देशांपैकी एक मानला जातो.

इतिहास संपादन

नावाची व्युत्पत्ती संपादन

ऑस्ट्रिया हा देश मध्य युगात जर्मन संघराज्यांचा भाग होता आणि ऑस्ट्रियाच्या जर्मन संघराज्यातील भौगोलिक स्थानाप्रमाणे त्याचे नाव पडले. बायर्न, बाडेन-व्युर्टेंबर्ग, हेसेन, थ्युरिंगेन इत्यादी राज्यांच्या पूर्वेकडे ऑस्ट्रिया आहे. ऑस्ट्रियाचे स्थानिक जर्मन भाषेतील नाव ऑस्टराईश (मूळ उच्चार अयो-स्ट-राईश) असे आहे. जर्मन भाषेत याचा अर्थ पूर्वेकडील राज्य असा होतो(ओस्ट: पूर्व, राईश्च: राज्य). याचा इंग्रजीत अपभ्रंश होऊन ऑस्ट्रिया असे नाव रुळले. जर्मनीस्वित्झर्लंडमध्ये ऑस्ट्रियास ऑस्टराईश असेच म्हणतात. इंग्लिशभाषिक देशांत ऑस्ट्रिया असे नाव रूढ आहे.

प्रागैतिहासिक कालखंड संपादन

अर्वाचीन इतिहास संपादन

भूगोल संपादन

चतुःसीमा संपादन

ऑस्ट्रियाच्या उत्तरेस जर्मनीचेक प्रजासत्ताक, पूर्वेस स्लोव्हेकियाहंगेरी, दक्षिणेस स्लोव्हेनियाइटली तर पश्चिमेस लिश्टनस्टाइनस्वित्झर्लंड आहेत.

राजकीय विभाग संपादन

ऑस्ट्रिया देश एकूण ९ राज्यांमध्ये विभागला गेला आहे.

मोठी शहरे संपादन

समाजव्यवस्था संपादन

वस्तीविभागणी संपादन

धर्म संपादन

शिक्षण संपादन

संस्कृती संपादन

राजकारण संपादन

अर्थतंत्र संपादन

बाह्य दुवे संपादन