हंगेरी
हंगेरी (स्थानिक मॉज्यॉरोर्शाग) हा मध्य युरोपामधील एक भूपरिवेष्टित देश आहे. हंगेरीच्या उत्तरेला स्लोव्हाकिया, पूर्वेला युक्रेन व रोमेनिया, दक्षिणेला सर्बिया व क्रोएशिया, नैऋत्येला स्लोव्हेनिया तर पश्चिमेला ऑस्ट्रिया हे देश स्थित आहेत. बुडापेस्ट ही हंगेरीची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे.
हंगेरी Magyarország | |||||
| |||||
राष्ट्रगीत: | |||||
हंगेरीचे जागतिक नकाशावरील स्थान | |||||
राजधानी (व सर्वात मोठे शहर) |
बुडापेस्ट | ||||
अधिकृत भाषा | हंगेरियन | ||||
सरकार | संसदीय प्रजासत्ताक | ||||
- राष्ट्रप्रमुख | यानोस आदेर | ||||
- पंतप्रधान | व्हिक्तोर ओर्बान | ||||
महत्त्वपूर्ण घटना | |||||
---|---|---|---|---|---|
- स्थापना | 895 | ||||
- हंगेरीचे राजतंत्र | 1000 | ||||
- ऑस्ट्रिया-हंगेरीपासून अलग | 1918 | ||||
- सद्य प्रजासत्ताक | 23 ऑक्टोबर 1989 | ||||
युरोपीय संघात प्रवेश | १ मे २००४ | ||||
क्षेत्रफळ | |||||
- एकूण | ९३,०३० किमी२ (१०९वा क्रमांक) | ||||
- पाणी (%) | ०.७४ | ||||
लोकसंख्या | |||||
-एकूण | ९८,७९,००० (७९वा क्रमांक) | ||||
- गणती | {{{लोकसंख्या_गणना}}}
{{{लोकसंख्या_गणना_वर्ष}}} | ||||
- घनता | १०७.२/किमी² | ||||
वार्षिक सकल उत्पन्न (पीपीपी) | |||||
- एकूण | २०२.३५६ अब्ज अमेरिकन डॉलर (४८वा क्रमांक) | ||||
- वार्षिक दरडोई उत्पन्न | २०,४५५ अमेरिकन डॉलर (४०वा क्रमांक) | ||||
मानवी विकास निर्देशांक . | ▲ ०.८३ (अति उच्च) (३७ वा) (२०११) | ||||
राष्ट्रीय चलन | हंगेरियन फोरिंट (HUF) | ||||
आंतरराष्ट्रीय कालविभाग | मध्य युरोपीय प्रमाणवेळ (यूटीसी+०१:००) | ||||
आय.एस.ओ. ३१६६-१ | HU | ||||
आंतरजाल प्रत्यय | .hu | ||||
आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक | ३६ | ||||
अंदाजे इ.स.च्या नवव्या शतकादरम्यान स्थापन केला गेलेल्या हंगेरीचे रूपांतर इ.स. १००० साली पहिल्या स्टीफनने राजतंत्रामध्ये केले. इ.स. १५४१ ते १६९९ दरम्यान हंगेरी ओस्मानी साम्राज्याच्या अधिपत्याखाली होता. १८६७ ते १९१८ सालांदरम्यान ऑस्ट्रिया-हंगेरी हे एक बालाढ्य राष्ट्र अस्तित्वात होते. पहिल्या महायुद्धामध्ये पराभव झाल्यानंतर ऑस्ट्रिया-हंगेरीचे विघटन झाले व आजचा हंगेरी देश निर्माण झाला. पहिल्या महायुद्धामध्ये अक्ष राष्ट्रांच्या बाजूने लढणाऱ्या हंगेरीने महायुद्ध संपल्यानंतर कम्युनिस्ट राजवटीचा स्वीकार केला. १९८९ साली हंगेरीमध्ये साम्यवादाचा अस्त झाला व संसदीय प्रजासत्ताक पद्धती चालू झाली.
सध्या प्रगत देशांपैकी एक असलेला हंगेरी संयुक्त राष्ट्रे, युरोपियन संघ, नाटो, आर्थिक सहयोग व विकास संघटना इत्यादी महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय संघटनांचा सदस्य आहे.
इतिहाससंपादन करा
नावाची व्युत्पत्तीसंपादन करा
प्रागैतिहासिक कालखंडसंपादन करा
मध्ययुगीन इतिहाससंपादन करा
अर्वाचीन हंगेरीसंपादन करा
भूगोलसंपादन करा
डॅन्यूब व तिसा ह्या हंगेरीमधून वाहणाऱ्या प्रमुख नद्या आहेत.
चतुःसीमासंपादन करा
हंगेरीच्या पूर्वेस रोमेनिया; दक्षिणेस सर्बिया, मॉँटेनिग्रो, क्रोएशिया; पश्चिमेस ऑस्ट्रिया, स्लोव्हेनिया व उत्तरेस स्लोव्हेकिया आणि युक्रेन हे देश आहेत.
राजकीय विभागसंपादन करा
राजकीयदृष्ट्या हंगेरीचे १९ काउंटीमध्ये विभाजन करण्यात आलेले आहे. राजधानी बुडापेस्ट हे शहर कोणत्याही काउंटीच्या आधिपत्याखाली येत नाही.
या काउंटींचे १६७ उप-विभागात विभागणी करण्यात आली आहे. या १६७ काउंटी व बुडापेस्ट शहराचे ७ गट करण्यात आले आहेत.
मोठी शहरेसंपादन करा
शहर | नागरी वस्ती | उपनागरी वस्ती |
बुडापेस्ट | १७,२७,३०० | २५,५०,००० |
देब्रेसेन | २,०५,१०० | २,०५,१०० |
मिस्कोल्क | १,८१,१०० | २,७०,००० |
सेगेद | १,६२,५०० | १,६२,५०० |
पेक्स | १,५८,७०० | १,५८,७०० |
ग्यॉर | १,२८,४०० | १,२८,४०० |
न्यिरेगिहाझा | १,१६,२०० | १,१६,२०० |
केस्केमेत | १,०६,५०० | १,०६,५०० |
झेकेस्फेहेर्वार | १,०३,३०० | १,०३,३०० |
समाजव्यवस्थासंपादन करा
वस्तीविभागणीसंपादन करा
हंगेरीत हंगेरियन वंशाचे लोक बहुतांश (९४%) आहेत. याशिवाय रोमा (२.१%), जर्मन (१.२%), स्लोव्हेकियन (०.४%), रोमेनियन (०.१%) युक्रेनियन (०.१%) व सर्बियन (०.१%) व्यक्तीही येथे राहतात.
धर्मसंपादन करा
इ.स. २००१ च्या वस्तीगणनेनुसार हंगेरीतील लोकांपैकी ५४.५% कॅथोलिक, १५.९% कॅल्व्हिनिस्ट, निधर्मी १४.५%, ल्युथेरन ३% व इतरधर्मीय २% आहेत. १०.१% लोकांनी आपला धर्म सांगण्यास नकार दिला.
शिक्षणसंपादन करा
संस्कृतीसंपादन करा
राजकारणसंपादन करा
अर्थतंत्रसंपादन करा
खेळसंपादन करा
बाह्य दुवेसंपादन करा
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |