शार्लमेन
शार्लमेन (इंग्लिश: उच्चार /ˈʃɑrlɨmeɪn/; फ्रेंच: उच्चार [ʃaʀləˈmaɲ]; लॅटिन: Carolus Magnus, अर्थात ’महान चार्ल्स’; फ्रान्स व पवित्र रोमन साम्राज्याच्या राजांच्या नामावळीनुसार चार्ल्स पहिला) (७४२/७४७ - जानेवारी २८, ८१४) हा फ्रांक टोळ्यांचा राजा होता. ७६८ पासून मृत्यूपर्यंतच्या राजवटीत त्याने आपले राज्य विस्तारून फ्रांक साम्राज्यात रुपांतरित केले.
शार्लमेनाचा जन्म जर्मनीतील आखन येथे झाला. त्याचे वडील 'छोटा पिपीन' तर त्याचे आजोबा 'चार्लस मार्टेल' हेदेखील महान योद्धे होते. पिपीनाने मरण्याआगोदर शार्लमेनाला त्याचा उत्तर भाग अर्धे राज्य म्हणून दिला व दक्षिण भाग त्याच्या भावाला म्हणजे कार्लोमनास दिला.
शारलेमेनाने भावाच्या मृत्युनंतर त्याचे राज्य बळकावले व स्वतःस फ्रांकोनियाचा राजा म्हणून घोषित केले.
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |