मुख्य मेनू उघडा


बेल्जियम हा पश्चिम युरोपातील एक देश आहे. बेल्जियमच्या उत्तरेला नेदरलँड्सउत्तर समुद्र, पूर्वेला जर्मनी, दक्षिणेला लक्झेंबर्गफ्रान्स व पश्चिमेला फ्रान्स हे देश आहेत. बेल्जियम हा युरोपियन युनियनचा स्थापनेपासूनचा सदस्य देश आहे व संघाचे मुख्यालय ब्रसेल्स येथे स्थित आहे. तसेच नाटोसकट इतर अनेक आंतरराष्ट्रीय संस्थांचा बेल्जियम सदस्य देश आहे.

बेल्जियम
Koninkrijk België (डच)
Royaume de Belgique (फ्रेंच)
Königreich Belgien (जर्मन)
बेल्जियमचे राजतंत्र
बेल्जियमचा ध्वज बेल्जियमचे चिन्ह
ध्वज चिन्ह
ब्रीद वाक्य: Eendracht maakt macht  (डच)
L'union fait la force  (फ्रेंच)
Einigkeit macht stark  (जर्मन)
(एकात्मतेतील शक्ती)
राष्ट्रगीत: La Brabançonne
बेल्जियमचे स्थान
बेल्जियमचे जागतिक नकाशावरील स्थान
राजधानी
(व सर्वात मोठे शहर)
ब्रसेल्स
अधिकृत भाषा डच, फ्रेंच, जर्मन
सरकार राजेशाही व सांसदीय लोकशाही[१]
 - राजा आल्बर्ट दुसरा
 - पंतप्रधान एल्यो दि र्‍युपो
महत्त्वपूर्ण घटना
 - स्वातंत्र्य दिवस (नेदरलँड्सपासून)
ऑक्टोबर ४, १८३० (घोषित)
एप्रिल १९, १८३९ (लंडन तहान्वये मान्यता) 
युरोपीय संघात प्रवेश २५ मार्च १९५७
क्षेत्रफळ
 - एकूण ३०,५२८ किमी (१३९वा क्रमांक)
 - पाणी (%) ६.४
लोकसंख्या
 - २०११ १,१०,०७,०२०[२] (७६वा क्रमांक)
 - घनता ३५४.७/किमी²
वार्षिक सकल उत्पन्न (पीपीपी)
 - एकूण ३९४.३४६ अब्ज[३] अमेरिकन डॉलर (३०वा क्रमांक)
 - वार्षिक दरडोई उत्पन्न ३५,४२१ अमेरिकन डॉलर (१२वा क्रमांक)
मानवी विकास निर्देशांक  (२०१०) ०.८६७[४] (अति उच्च) (१८ वा)
राष्ट्रीय चलन युरो (€)
आंतरराष्ट्रीय कालविभाग मध्य युरोपीय प्रमाणवेळ (यूटीसी+१)
आय.एस.ओ. ३१६६-१ BE
आंतरजाल प्रत्यय .be
आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक ३२
राष्ट्र_नकाशा

३०,५२८ वर्ग किमी क्षेत्रफळ असलेल्या बेल्जियमची लोकसंख्या सुमारे १.१ कोटी आहे. बेल्जियममध्ये दोन भिन्न भाषिक प्रदेश आहेत व ह्या प्रदेशांना बव्हंशी स्वायत्तता आहे. उत्तरेकडील फ्लांडर्स हा डच भाषिक तर दक्षिणेकडील वालोनी हा प्रदेश फ्रेंच भाषिक आहे. तसेच देशाच्या पूर्व भागात एक लहान जर्मन भाषिक प्रदेश आहे. राजधानीचे शहर ब्रसेल्स भौगोलिक दृष्ट्या जरी फ्लांडर्स भागामध्ये असले तरी तो एक वेगळे प्रशासकीय विभाग मानला जातो.[५]

मध्ययुगीन काळापासून बेल्जियम हा एक संपन्न देश राहिला आहे. १८३० साली बेल्जियम नेदरलँड्सपासून स्वतंत्र झाला. १८व्या शतकातील औद्योगिक क्रांतीदरम्यान बेल्जियमचा झपाट्याने विकास झाला. विसाव्या शतकामध्ये बेल्जियमने इतर युरोपियन देशांप्रमाणे आफ्रिका खंडामध्ये अनेक वसाहती स्थापन केल्या. सध्या बेल्जियमची अर्थव्यवस्था युरोझोनमधील इतर देशांशी संलग्न आहे.


इतिहाससंपादन करा

नावाची व्युत्पत्तीसंपादन करा

प्रागैतिहासिक कालखंडसंपादन करा

भूगोलसंपादन करा

चतु:सीमासंपादन करा

बेल्जियमच्या उत्तरेला नेदरलँड्सउत्तर समुद्र, पूर्वेला जर्मनी, दक्षिणेला लक्झेंबर्गफ्रान्स व पश्चिमेला फ्रान्स हे देश आहेत.

राजकीय विभागसंपादन करा

बेल्जियममध्ये तीन स्वायत्त संघ व १० प्रांत आहेतः फ्लांडर्स, वालोनी व राजधानी ब्रसेल्स. फ्लांडर्स प्रदेशामध्ये अँटवर्प, पूर्व फ्लांडर्स, पश्चिम फ्लांडर्स, लिमबर्गफ्लाम्स ब्राबांत हे पाच प्रांत आहेत तर वालोनी प्रदेशामध्ये एनो, लीज, लक्झेंबर्ग, नामुरब्राबांत वालों हे ५ प्रांत आहेत.

मोठी शहरेसंपादन करा

क्र नाव १९८४ लो. २००० लो २००७ लो. प्रांत
१. अँटवर्प 4,88,425 4,46,525 4,66,203 अँटवर्प
2. गेंट 2,35,401 2,24,180 2,35,143 पूर्व फ्लांडर्स
3. चार्लेरॉय 2,13,041 2,00,827 2,01,550 एनो
4. लीज 2,03,065 1,85,639 1,88,907 लीज
5. ब्रसेल्स 1,37,211 1,33,859 1,45,917 -
6. ब्रूज 1,18,146 1,16,246 1,16,982 पश्चिम फ्लांडर्स


समाजव्यवस्थासंपादन करा

वस्तीविभागणीसंपादन करा

धर्मसंपादन करा

शिक्षणसंपादन करा

संस्कृतीसंपादन करा

राजकारणसंपादन करा

अर्थतंत्रसंपादन करा

खेळसंपादन करा

संदर्भसंपादन करा

 1. ^ "Government of Belgium". The World Factbook. CIA. 
 2. ^ "Total population as of  January". Eurostat. 9 February 2010 रोजी पाहिले. 
 3. ^ "Belgium". International Monetary Fund. 20 April 2011 रोजी पाहिले. 
 4. ^ "Human Development Report 2010" (PDF). United Nations. 2010. 5 November 2010 रोजी पाहिले. 
 5. ^ Leclerc, Jacques, , membre associé du TLFQ (18 January 2007). "Belgique • België • Belgien—Région de Bruxelles-Capitale • Brussels Hoofdstedelijk Gewest". L'aménagement linguistique dans le monde (French मजकूर). Host: Trésor de la langue française au Québec (TLFQ), Université Laval, Quebec. 18 June 2007 रोजी पाहिले. "C'est une région officiellement bilingue formant au centre du pays une enclave dans la province du Brabant flamand (Vlaams Brabant)" 
  * "About Belgium". Belgian Federal Public Service (ministry) / Embassy of Belgium in the Republic of Korea. 21 June 2007 रोजी पाहिले. "the Brussels-Capital Region is an enclave of 162 km2 within the Flemish region." 
  * "Flanders (administrative region)". Microsoft Encarta Online Encyclopedia. Microsoft. 2007. (आधीच्या मूळ आवृत्तीत त्रूटी जाणवल्याने विदागारातील आवृत्ती दिनांक 31 October 2009 रोजी मिळविली). 21 June 2007 रोजी पाहिले. "The capital of Belgium, Brussels, is an enclave within Flanders." 
  * McMillan, Eric (October 1999). "The FIT Invasions of Mons". Capital translator, Newsletter of the NCATA, Vol. 21, No. 7, p. 1. National Capital Area Chapter of the American Translators Association (NCATA). 21 June 2007 रोजी पाहिले. "The country is divided into three increasingly autonomous regions: Dutch-speaking Flanders in the north; mostly French-speaking Brussels in the center as an enclave within Flanders and French-speaking Wallonia in the south, including the German-speaking Cantons de l'Est)." 
  * Van de Walle, Steven, lecturer at University of Birmingham Institute of Local Government Studies, School of Public Policy. "Language Facilities in the Brussels Periphery" (PDF). KULeuven—Leuvens Universitair Dienstencentrum voor Informatica en Telematica. (आधीच्या मूळ आवृत्तीत त्रूटी जाणवल्याने विदागारातील आवृत्ती दिनांक 31 October 2009 रोजी मिळविली). 21 June 2007 रोजी पाहिले. "Brussels is a kind of enclave within Flanders—it has no direct link with Wallonia." 


बाह्य दुवेसंपादन करा