वालोनी
वालोनी (वालून: Walonreye, फ्रेंच: Wallonie, जर्मन: Wallonie, डच: Wallonië ) हा बेल्जियम देशाचा एक प्रशासकीय प्रदेश आहे. देशाच्या दक्षिण भागातील हा प्रदेश मुख्यतः फ्रेंच भाषिक आहे. बेल्जियमच्या एकूण क्षेत्रफळाचा ५५ टक्के भाग वालोनी प्रदेशाने व्यापला आहे व एकूण लोकसंख्येच्या ३३ टक्के जनता येथे वसलेली आहे.
वालोनी प्रदेश Région wallonne (फ्रेंच) Waals Gewest (डच) Wallonische Region (जर्मन) | |||
बेल्जियमचा प्रांत | |||
| |||
वालोनी प्रदेशचे बेल्जियम देशामधील स्थान | |||
देश | बेल्जियम | ||
राजधानी | नामुर | ||
क्षेत्रफळ | १६,८४४ चौ. किमी (६,५०४ चौ. मैल) | ||
लोकसंख्या | ३४,५६,७७५ | ||
घनता | २०५.२ /चौ. किमी (५३१ /चौ. मैल) | ||
आय.एस.ओ. ३१६६-२ | BE-WAL | ||
संकेतस्थळ | www.wallonie.be |
नामुर हे वालोनीचे प्रशासकीय मुख्यालय असून चार्लेरॉय, लीज, माँस ही येथील मोठी शहरे आहेत. उत्तरेकडील डच भाषिक फ्लांडर्स प्रदेशाच्या तुलनेत वालोनीची अर्थव्यवस्था बरीच कमकुवत आहे. वाढती बेरोजगारी व ढासळते दरडोई उत्पन्न ह्यांमुळे येथील व फ्लांडर्समधील जनतेमधील दरी वाढत चालली आहे.
बाह्य दुवे
संपादनविकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत
- अधिकृत संकेतस्थळ Archived 2012-05-31 at the Wayback Machine. (फ्रेंच)
- पर्यटन
- संगीत Archived 2016-03-03 at the Wayback Machine.
- संस्कृती व कला