एप्रिल १९
दिनांक
एप्रिल १९ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील ११० वा किंवा लीप वर्षात १११ वा दिवस असतो.
ठळक घटना आणि घडामोडी
संपादनसोळावे शतक
संपादन- १५८७ - सर फ्रांसिस ड्रेकने केडिझच्या बंदरात स्पेनच्या आरमाराचा पराभव केला.
अठरावे शतक
संपादनएकोणिसावे शतक
संपादन- १८१० - व्हेनेझुएलाने स्पेनपासून स्वातंत्र्य जाहीर केले.
- १८३९ - १८३९चा लंडनचा तह - बेल्जियम स्वतंत्र राष्ट्र म्हणून अस्तित्वात.
विसावे शतक
संपादन- १९०४ - कॅनडातील टोरोंटो शहर आगीत भस्मसात.
- १९०९ - जोन ऑफ आर्कला संत घोषित करण्यात आले.
- १९१० - क्रांतिकारक अनंत कान्हेरे, कृष्णाजी गोपाळ कर्वे आणि विनायक नारायण देशपांडे यांना ठाणे कारागृहात फाशी.
- १९१९ - अमेरिकेच्या लेस्ली अर्विनने सर्वप्रथम पॅराशुटच्या सहाय्याने विमानातून उडी मारली.
- १९३६ - पॅलेस्टाईनमध्ये उठाव.
- १९४८ - बर्मा संयुक्त राष्ट्रात समाविष्ट
- १९५६ - गीतरामायणातील शेवटचे गाणे पुणे आकाशवाणीवरून प्रसारित झाले.
- १९६० - दक्षिण कोरियात राष्ट्राध्यक्ष सिंगमन ऱ्ही विरुद्ध विद्यार्थ्यांची निदर्शने.
- १९६१ - पिग्सच्या अखातातील आक्रमण - घुसखोरांचा पराभव.
- १९७१ - सियेरा लिओन प्रजासत्ताक झाले. सियाका स्टीवन्स राष्ट्राध्यक्षपदी.
- १९७१ - रशियाने सर्वप्रथम मानवनिर्मित अंतराळस्थानक सॅल्युत १चे प्रक्षेपण केले.
- १९७५ - आर्यभट्ट या प्रथम भारतीय उपग्रहाचे रशिया मधिल कापुस्टीन यार अवकाश केंद्रावरून यशस्वी प्रक्षेपण.
- १९७८ - लागुमॉट हॅरिस नौरूच्या राष्ट्राध्यक्षपदी.
- १९८९ - यु.एस.एस. आयोवा या अमेरिकेच्या युद्धनौकेवर स्फोट. ४७ ठार.
- १९९३ - वेको, टेक्सास येथे ब्रांच डेव्हिडीयनच्या इमारतीस आग. ८१ ठार.
- १९९५ - ओक्लाहोमा सिटी येथे आल्फ्रेड पी. मरा फेडरल बिल्डींग मध्ये अमेरिकन अतिरेक्यांनी बॉम्बस्फोट घडवला. १६८ ठार.
- १९९९ - जर्मनीची संसद परत बर्लिन येथे.
एकविसावे शतक
संपादन- २००० - एर फिलिपाईन्सचे बोईंग ७३७ जातीचे विमान दाव्हाओ आंतरराष्ट्रीय विमानतळावर कोसळले. १३१ ठार.
- २००५ - जोसेफ रॅट्झिंगर पोप बेनेडिक्ट सोळावा या नावाने पोपपदी.
- २०११ - ४५ वर्षे सत्तेवर राहिल्यावर कुबाच्या साम्यवादी पक्षाच्या केंद्रीय समितीमधून फिडेल कॅस्ट्रोचा राजीनामा.
जन्म
संपादन- १३२० - पेद्रो पहिला, पोर्तुगालचा राजा.
- १४५२ - फर्डिनांड दुसरा, अरागोनचा राजा.
- १७९३ - फर्डिनांड पहिला, ऑस्ट्रियाचा राजा.
- १८८२ - गेतुइलो व्हार्गास, ब्राझिलचा पंतप्रधान.
- १८९२ - ताराबाई मोडक, भारतीय शिक्षणतज्ज्ञ.
- १८९७ - पीटर दी नरोन्हा, भारतीय उद्योगपती.
- १९०३ - इलियट नेस, अमेरिकन पोलिस.
- १९३३ - डिकी बर्ड, इंग्लिश क्रिकेटपंच.
- १९३६ - विल्फ्रीड मार्टेन्स, बेल्जियमचा पंतप्रधान.
- १९३७ - जोसेफ एस्ट्राडा, फिलिपाईन्सचा अभिनेता व राष्ट्राध्यक्ष.
- १९५७ - मुकेश अंबाणी, भारतीय उद्योगपती.
- १९६८ - म्स्वाती तिसरा, स्वाझीलॅंडचा राजा.
- १९७५ - जेसन गिलेस्पी, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.
- १९७७ - अंजू बॉबी जॉर्ज, भारतीय खेळाडू.
- १९८७ - मारिया शारापोव्हा, रशियन टेनिस खेळाडू.
मृत्यू
संपादनया लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.
नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. |
- १०५४ - पोप लिओ नववा.
- १३९० - रॉबर्ट तिसरा, स्कॉटलंडचा राजा.
- १५७८ - उएसुगी केन्शिन, जपानी सामुराई.
- १६८९ - क्रिस्टीना, स्वीडनची राणी.
- १८८१ - बेंजामिन डिझरायेली, युनायटेड किंग्डमचा पंतप्रधान.
- १९०६ - पिएर क्युरी, फ्रेंच संशोधक, नोबेल पुरस्कार विजेता.
- १९१०: क्रांतिकारक अनंत कान्हेरे,कृष्णाजी गोपाळ कर्वे आणि विनायक नारायण देशपांडे
- १९५५: ब्रिटिश-भारतीय वन्यजीव तज्ज्ञ आणि लेखक जिम कॉर्बेट
- १९६७ - कॉन्राड अडेनॉउअर, जर्मनीचा चान्सेलर.
- १९७४ - अयुब खान, पाकिस्तानचा पंतप्रधान.
- १९९३: स्वातंत्र्यसैनिक डॉ. उत्तमराव पाटील
- १९९४: मेजर जनरल राजिंदरसिंग ‘स्पॅरो’ – पंजाबचे माजी मंत्री. पाकिस्तानच्या ’पॅटन’ रणगाड्यांचा धुव्वा उडवल्याबद्दल त्यांचा ’ईगल’ (गरूड) म्हणून गौरव केला असता, मी तर केवळ एक ’स्पॅरो’ (चिमणी) आहे, असे त्यांनी सांगितले, आणि तेच त्यांचे टोपणनाव रुढ झाले.
- १९९८: उद्योगपत्नी सौ. विमलाबाई गरवारे
- २००३: भारतीय-इंग्रजी खलीफा मिर्जा ताहिर अहमद
- २००४: गिनेस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डचे सहसंस्थापक नॉरिस मॅक्विहिर
- २००८: लेखिका, संतसाहित्याच्या अभ्यासिका व राजकारणी सरोजिनी बाबर
- २००९: मार्क्सवादी कम्युनिस्ट नेत्या अहिल्या रांगणेकर
- २०१०: लेखक आणि टीकाकार मंगेश विठ्ठल राजाध्यक्ष
- २०१३-वृत्तपत्रउद्योजक सिवंती आदीतन
प्रतिवार्षिक पालन
संपादन- प्रजासत्ताक दिन - सियेरा लिओन
- सायकल दिन
बाह्य दुवे
संपादन- बीबीसी न्यूजवर एप्रिल १९ च्या विशेष घटना (इंग्रजी मजकूर)
एप्रिल १७ - एप्रिल १८ - एप्रिल १९ - एप्रिल २० - एप्रिल २१ - (एप्रिल महिना)