ओक्लाहोमा सिटी

अमेरिका देशातील ओक्लाहोमा राज्याची राजधानी.


ओक्लाहोमा सिटी (इंग्लिश: Oklahoma City) ही अमेरिका देशातील ओक्लाहोमा राज्याची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. सुमारे ५.८ लाख शहरी लोकसंख्या व १२.८ लाख महानगरी लोकसंख्या असलेले ओक्लाहोमा सिटी ह्या दृष्टीने सध्या अमेरिकेतील ३१व्या क्रमांकाचे मोठे शहर आहे. हे शहर ओक्लाहोमाच्या मध्य भागात वसले असून ते अमेरिकेच्या चक्रीवादळप्रवण क्षेत्रात स्थित आहे. आजवरच्या इतिहासात ओक्लाहोमा सिटीला ९ मोठ्या चक्रीवादळांचा तडाखा बसला असून १९९९ साली झालेल्या चक्रीवादळामुळे येथे १.१ अब्ज डॉलर्सचे नुकसान झाले होते.

ओक्लाहोमा सिटी
Oklahoma City
अमेरिकामधील शहर


ओक्लाहोमा सिटी is located in ओक्लाहोमा
ओक्लाहोमा सिटी
ओक्लाहोमा सिटी
ओक्लाहोमा सिटीचे ओक्लाहोमामधील स्थान
ओक्लाहोमा सिटी is located in अमेरिकेची संयुक्त संस्थाने
ओक्लाहोमा सिटी
ओक्लाहोमा सिटी
ओक्लाहोमा सिटीचे अमेरिकामधील स्थान

गुणक: 35°28′56″N 97°32′7″W / 35.48222°N 97.53528°W / 35.48222; -97.53528

देश Flag of the United States अमेरिका
राज्य ओक्लाहोमा
स्थापना वर्ष एप्रिल २२ इ.स. १८८९
क्षेत्रफळ १,६०८.८ चौ. किमी (६२१.२ चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची १,२०१ फूट (३६६ मी)
लोकसंख्या  (२०१०)
  - शहर ५,७९,९९९
  - घनता ३५६.४ /चौ. किमी (९२३ /चौ. मैल)
  - महानगर १२,८०,५७८
प्रमाणवेळ यूटीसी - ६:००
www.okc.gov

एप्रिल १९, इ.स. १९९५ रोजी घडवून आणलेल्या ओक्लाहोमा सिटी बॉम्बस्फोटात १६८ लोक मृत्यूमुखी पडले. नाईन-इलेव्हन विमान हल्ल्यांअगोदर ओक्लाहोमा सिटी बॉंबस्फोट ही अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात विनाशकारी दहशतवादी घटना होती.

नॅशनल बास्केटबॉल असोसिएशनमध्ये बास्केटबॉल खेळणारा ओक्लाहोमा सिटी थंडर हा येथील एक प्रमुख व्यावसायिक क्रीडा संघ आहे.

बाह्य दुवे

संपादन
 
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: