एप्रिल १४
दिनांक
एप्रिल १४ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील १०४ वा किंवा लीप वर्षात १०५ वा दिवस असतो.
ठळक घटना आणि घडामोडीसंपादन करा
इ.स.पू. पहिले शतकसंपादन करा
- ४३ - फोरम गॅलोरमची लढाई - ज्युलियस सीझरचा मारेकरी डेसिमस ज्युनियस ब्रुटस मार्क ऍन्टनीच्या सैनिकांकडून ठार.
सतरावे शतक
- १६६१: प्रिन्स सेसी या शास्त्रज्ञाने प्रथमच दुर्बिणीसाठी टेलिस्कोप ही संज्ञा वापरली.
- १६६५: सुप्रसिद्ध पुरंदरच्या वेढ्यामध्ये दिलेरखान पठाणने वज्रमाळ किल्ला जिंकला.
- १६९९ : गुरू गोविंद सिंग यांनी 'खालसा'ची स्थापना केली.
अठरावे शतक
- १७३६: चिमाजीअप्पा यांनी अद्वितीय पराक्रम करून जंजिऱ्याच्या सिद्दीसाताचा पराभव केला.
एकोणिसावे शतकसंपादन करा
- १८२८ - नोआह वेब्स्टरने डिक्शनरीचा कॉपीराईट नोंदवला.
- १८६० - पोनी एक्सप्रेसचा पहिला घोडेस्वार साक्रामेंटो, कॅलिफोर्निया येथे पोचला.
- १८६५ - जॉन विल्कस बूथने अब्राहम लिंकनवर गोळी झाडली. लिंकन दुसऱ्या दिवशी मृत्यू पावला.
विसावे शतकसंपादन करा
- १९१२ - आर.एम.एस. टायटॅनिकची हिमनगाशी टक्कर. बोटीला भगदाड पडून बुडु लागली.
- १९१५ - तुर्कस्तानने आर्मेनियावर आक्रमण केले.
- १९३१ - स्पेनच्या सर्वोच्च न्यायालयाने राजा आल्फोन्सो तेराव्याची हकालपट्टी केली व दुसरे स्पॅनिश प्रजासत्ताक अस्तित्वात आल्याचे जाहीर केले.
- १९४० - युनायटेड किंग्डमचे सैनिक नॉर्वेतील नाम्सोस गावात शिरले व गाव काबीज केले.
- १९४४ - मुंबईच्या बंदरात उभ्या असलेल्या बोटीवर महाभयानक विस्फोट. ३०० ठार. त्याकाळच्या २ कोटी पाउंडचे नुकसान.
- १९६२ - जॉर्जेस पॉम्पिदु फ्रांसच्या पंतप्रधानपदी.
- १९८६ - अमेरिकेच्या लढाउ विमानांनी लिब्याच्या बेंगाझी व ट्रिपोली शहरांवर हल्ला केला. ६० ठार.
- १९८६ - बांगलादेशमध्ये १ किलो वजनाच्या अतिप्रचंड गारांचा वर्षाव. ९२ ठार. गारांच्या वजनाचा हा विक्रम अजून अबाधित आहे.
- १९८८ : यू.एस.एस.आर.ने अफगाणिस्तानातून माघार घेण्याचा निर्णय घेतला.
- १९९४ : भारताने गॅट करारास मान्यता दिली.
- १९९५: टेबल टेनिसमध्ये सलग ६,६७० रॅलीज करण्याचा जागतिक विक्रम डॉ. रमेश बाबू यांनी पुण्यात नोंदवला.
एकविसावे शतकसंपादन करा
जन्मसंपादन करा
- १३३६ - गो-कोगोन, जपानी सम्राट.
- १५७८ - फिलिप तिसरा, स्पेनचा राजा.
- १७४१ - मोमोझोनो, जपानी सम्राट.
- १८३३-सत्यशोधक समाजाचे पहिले अध्यक्ष डॉ. विश्राम रामजी घोले
- १८६६ - ऍन सुलिव्हान, हेलन केलरची शिक्षिका.
- १८९१ - डॉ. बाबासाहेब आंबेडकर, भारतीय संविधानचे शिल्पकार, मानवी हक्काचे कैवारी, अद्वितीय विद्वान
- १९१४: अभिनेत्री शांता हुबळीकर
- १९१९: पार्श्वगायिका शमशाद बेगम
- १९१९: भारतीय लेखक आणि नाटककार के. सरस्वती अम्मा
- १९२२: मैहर घराण्याचे जागतिक कीर्तीचे सरोदवादक उस्ताद अली अकबर खॉं तथा खॉंसाहेब
- १९२५ - एबेल मुझोरेवा, झिम्बाब्वेचा पंतप्रधान.
- १९२७: विनोदी लेखक द. मा. मिरासदार
- १९४२: केंद्रीय मंत्री व राजस्थानच्या राज्यपाल मार्गारेट अल्वा
- १९४३: वात्रटिकाकार रामदास फुटाणे
- १९७२-गायिका, अभिनेत्री राजेश्वरी सचदेव
मृत्यूसंपादन करा
- १५९९ - हेन्री वॅलप, इंग्लिश राजकारणी.
- १७५९ - जॉर्ज फ्रीडरीक हान्डेल, जर्मन संगीतकार.
- १९५० - श्री रमण महर्षी, भारतीय तत्त्वज्ञ.
- १९६२ - सर मोक्षगुंडम् विश्वेश्वरैया, भारतीय अभियंता.
- १९६३: इतिहासकार केदारनाथ पांडे तथा राहूल सांकृतायन
- १९९७: चित्रपट आणि नाट्य अभिनेते चंदू पारखी
- २०१३: उद्योगपती राम प्रसाद गोएंका
प्रतिवार्षिक पालनसंपादन करा
- आंबेडकर जयंती – भारत व जगभरात
- ज्ञान दिन – महाराष्ट्र राज्य
- मुंबई अग्निशमन सेवा दिन
- अभियंता दिन (भारत, विश्वेश्वरैय्या यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ)
बाह्य दुवेसंपादन करा
- बीबीसी न्यूजवर एप्रिल १४ च्या विशेष घटना (इंग्रजी मजकूर)
एप्रिल १२ - एप्रिल १३ - एप्रिल १४ - एप्रिल १५ - एप्रिल १६ - (एप्रिल महिना)