एप्रिल १३
दिनांक
एप्रिल १३ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील १०३ वा किंवा लीप वर्षात १०४ वा दिवस असतो.
ठळक घटना आणि घडामोडी
संपादनअकरावे शतक
संपादन- १०५५ - व्हिक्टर दुसरा पोपपदी.
बारावे शतक
संपादनतेरावे शतक
संपादन- १२०४ - चौथ्या क्रुसेडने कॉन्स्टेन्टिनोपल लुटले.
- १२५० - सातव्या क्रुसेडचा ईजिप्तमध्ये पराभव. फ्रांसचा राजा लुई नववा युद्धबंदी.
सतरावे शतक
संपादन- १६९९ - गुरू गोबिंद सिंग यांनी खालसा पंथाची स्थापना केली.
या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.
नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. |
अठरावे शतक
संपादन- १७३१: छत्रपती शाहू महाराज (सातारा) आणि छत्रपती संभाजी महाराज (कोल्हापूर) यांच्यात राज्याच्या सीमेवरून असलेला वाद वारणेचा तह होऊन मिटला.
- १७९६ : अमेरिकेत पहिला हत्ती आला. तो भारतातून पाठवला होता.
एकोणिसावे शतक
संपादन- १८२९ - ब्रिटिश संसदेने रोमन कॅथोलिक व्यक्तिंना धर्मस्वातंत्र्य दिले.
- १८४९ - हंगेरी प्रजासत्ताक झाले.
- १८६१ - अमेरिकन यादवी युद्ध - दक्षिणेच्या सैन्याने फोर्ट सम्टरचा पाडाव केला.
- १८७० : न्यू यॉर्कमधे मेट्रापोलिटन म्युझियम ऑफ आर्टची स्थापना.
विसावे शतक
संपादन- १९१९ - जालियानवाला बागची कत्तल - भारताच्या अमृतसर शहरातील जालियानवाला बाग येथे भरलेल्या निःशस्त्र नागरिकांच्या सभेवर ब्रिटिश सैन्याने गोळीबार केला. ३७९ ठार. भारताच्या स्वातंत्र्यसंग्रामातील ही एक महत्त्वाची घटना होती.
- १९३९ - भारतात हिंदुस्तानी लाल सेनेची स्थापना.
- १९४१ - जपान व सोवियेत संघाने तटस्थतेचा तह केला.
- १९४२: व्ही. शांताराम प्रभात फिल्म कंपनीतून बाहेर पडले.
- १९४५ - जर्मनीच्या गार्डेलजेन शहरात १,०००हून अधिक राजबंदी व युद्धबंद्यांची हत्या.
- १९४८ : भुवनेश्वर ही ओदिशा राज्याची राजधानी करण्यात आली.
- १९६०: अमेरिकाने ट्रान्झिट १-बी हा जगातील पहिला नेव्हिगेशन प्रणालीयुक्त उपग्रह प्रक्षेपित केला.
- १९७० - अपोलो १३मधील ऑक्सिजन टॅंकचा स्फोट. आतील अंतराळवीर यानासह भरकटण्याची भीती.
- १९७४ - व्यापारी तत्त्वावर चालणारा पहिला भूस्थिर उपग्रह वेस्टार १ प्रक्षेपित.
- १९८४ : भारताने सियाचेन ग्लेसियरवर ताबा मिळवला.
- १९९७: मास्टर्स टूर्नामेंट जिंकणारे टायगर वुड्स सर्वात तरुण गोल्फर ठरले.
एकविसावे शतक
संपादन- २००२ - व्हेनेझुएलात ह्युगो चावेझ विरुद्धचा उठाव फसला.
- २००६: देवदासी प्रथेचे उच्चाटन करणारे ‘महाराष्ट्र देवदासी प्रथा’निर्मूलन विधेयक विधानसभेत मंजूर.
- २०१७- प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या पद्मश्री पुरस्कारांचे राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते वितरण केले. ऑलिंपिक पदक विजेती साक्षी मलिक आणि जिम्नॅस्ट दीपा कर्माकर यांच्यासह 75 जणांना पद्मश्री देण्यात आला.
जन्म
संपादन- १७१३ - लॉर्ड फ्रेडरिक नॉर्थ, युनायटेड किंग्डमचा पंतप्रधान.
- १७४३ - थॉमस जेफरसन, अमेरिकेचा तिसरा राष्ट्राध्यक्ष.
- १८६६ - बुच कॅसिडी, अमेरिकन लुटारू.
- १८९० - रामचंद्र गोपाळ तोरणे भारतातले पहिले ('श्री पुंडलिक' नाटकाचे) चित्रीकरण करणारे
- १८९४ - आर्थर फॅडेन, ऑस्ट्रेलियाचा तेरावा पंतप्रधान.
- १८९५: वसंत रामजी खानोलकर भारतातील वैद्यकीय संशोधनाचा पाया घालणारे
- १९०५: ब्रूनो रॉस्सी इटालियन-अमेरिकन पदार्थवैज्ञानिक
- १९०६: कवी सॅम्युअल बेकेट आयरिश लेखक, नाटककार आणि
- १९१३ - दत्ताजी ताम्हाणे, स्वातंत्र्यसेनानी आणि समाजवादी विचारवंत.
- १९२२ - ज्युलियस न्यरेरे, टांझानियाचा पंतप्रधान.
- १९४०: नजमा हेपतुल्ला राज्यसभा सदस्य
- १९५६: सतीश कौशिक अभिनेता, निर्माता आणि दिग्दर्शक
- १९६३ - गॅरी कास्पारोव्ह, रशियाचा बुद्धिबळपटू.
मृत्यू
संपादन- १६०५ - बोरिस गोडुनोव्ह, रशियाचा झार.
- १८६८ - ट्युवोड्रोस, इथियोपियाचा सम्राट.
- १९५१ - भवानराव श्रीनिवासराव पंतप्रतिनिधी औंध संस्थानचे अधिपती
- १९६६ - अब्दुल सलाम आरिफ, इराकचा राष्ट्राध्यक्ष.
- १९७३ - बलराज सहानी अभिनेता दिग्दर्शक
- १९७३ - अनंत काकबा प्रियोळकर भाषा व इतिहास संशोधक, लेखक, संपादक व समीक्षक
- १९७५ - फ्रांस्वा टोम्बालबाये, चाडचा राष्ट्राध्यक्ष.
- १९८८ - हिरामण बनकर महाराष्ट्र केसरी
- १९९९ - हिरोजी बळीरामजी उलेमाले, कृषितज्ज्ञ आणि डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू
- २००० - बाळासाहेब सरपोतदार, चित्रपट निर्माते व वितरक
- २००८ - दशरथ पुजारी, मराठी संगीतकार.
बाह्य दुवे
संपादन- बीबीसी न्यूजवर एप्रिल १३ च्या विशेष घटना (इंग्रजी मजकूर)
एप्रिल ११ - एप्रिल १२ - एप्रिल १३ - एप्रिल १४ - एप्रिल १५ - (एप्रिल महिना)