दशरथ पुजारी (ऑगस्ट ३०, इ.स. १९३० - एप्रिल १३, इ.स. २००८) हे मराठी संगीतकार होते.

Dasharath Pujari.jpg
दशरथ पुजारी
जन्म ऑगस्ट ३०, इ.स. १९३०
बडोदा, ब्रिटिश भारत
मृत्यू एप्रिल १३, इ.स. २००८
मुंबई, महाराष्ट्र, भारत
राष्ट्रीयत्व भारत भारतीय
कार्यक्षेत्र संगीत (संगीतदिग्दर्शन)
पत्नी Tara Pujari

जीवनसंपादन करा

दशरथ पुजारी यांचा जन्म ऑगस्ट ३०, इ.स. १९३० रोजी बडोद्यात झाला. त्यांचे शालेय शिक्षण मुंबईत गिरगावातील युनियन हायस्कूलमध्ये झाले. त्यांचे वडील वैद्यकीय पेशात असल्यामुळे पुजारी कुटुंबीयांचे सोलापूर, बार्शी, पंढरपूर अशा विविध ठिकाणी वास्तव्य घडले. बार्शीच्या गोपाळराव भातंब्रेकर गुरुजींकडून दहरथ पुजारी यांनी संगीताचे व गायनाचे धडे घेतले. वयाच्या अवघ्या १८ वर्षांपासूनच त्यांनी संगीत दिग्दर्शनातील कारकिर्दीस सुरुवात केली.

दशरथ पुजारी यानी आपल्या प्रदीर्घ संगीत कारकिर्दीत मंगेश पाडगावकर, रमेश आणावकर, शांताराम नांदगावकर, सुधांशु, योगेश्‍वर अभ्यंकर, मधुकर जोशी यांसारख्या गीतकारांच्या गाण्यांना चाली बांधल्या. 'झिमझिम झरती श्रावणधारा', 'अशीच अमुची आई असती', 'चल ऊठ रे मुकुंदा', 'केशवा, माधवा, तुझ्या नामात रे गोडवा', 'मृदुल करांनी छेडित तारा' इत्यादी गाणी त्यांच्या अतिशय गाजलेल्या गाण्यांपैकी आहेत. त्यांनी 'अजून त्या झुडपांच्या मागे' हे आत्मचरित्रपर पुस्तकही लिहिले आहे.

एप्रिल १३, इ.स. २००८ रोजी मुंबईत कर्करोगाने त्यांचा मृत्यू झाला.[१]

कारकीर्दसंपादन करा

पुजारी यांच्या गाजलेल्या गाण्यांपैकी काही गाणी:

 • अजून त्या झुडुपांच्या मागे
 • अभंगाची गोडी करी ज्यास वेडी
 • अशीच अमुची आई असती
 • एक तारी सूर जाणी
 • केशवा माधवा तुझ्या नामात रे गोडवा
 • गोकुळाला वेड लाविले
 • चल ऊठ रे मुकुंदा
 • जगी ज्यास कोणी नाही
 • जनी नामयाची रंगली कीर्तनी
 • झिमझिम झरती श्रावणधारा
 • ते नयन बोलले काहीतरी
 • देव माझा विठू सावळा
 • नकळत सारे घडले
 • नंदाघरी नंदनवन फुलले
 • मुरलीधर घनश्याम
 • मृदुल करांनी छेडित तारा
 • या झोपल्या जगात
 • या मीरेचे भाग्य उजळले
 • रे क्षणाच्या संगतीने
 • रंगरेखा घेउनी मी
 • सावळ्या विठ्ठला तुझ्या दारी आले
 • क्षणभर उघड नयन देवा

बाह्य दुवेसंपादन करा

 1. ^ संगीतकार दशरथ पुजारी जन्मदिवस, लोकमत