शांताराम नांदगावकर

मराठी गीतकार आणि कवी

शांताराम नांदगावकर (जन्मदिनांक : १९ ऑक्टोबर १९३६; - जुलै ११, इ.स. २००९; मुंबई, महाराष्ट्र) हे मराठी गीतकार, कवी होते. त्यांनी अनेक भावगीते आणि काही मराठी चित्रपटांसाठी गाणी लिहिली. पार्श्वगायिका सुहासिनी नांदगावकर त्यांची सून आहे.

नांदगावकर मूळचे कोकणातील कणकवलीच्या नांदगावाचे होते. लहानपणी ते मुंबईत आले. मुंबईत परळ येथील शिरोडकर हायस्कुलात त्यांचे शिक्षण झाले. पुढे मराठी चित्रपटांसाठी त्यांनी विपुल प्रमाणात गीते लिहिली. पुढे इ.स. १९८५ साली ते शिवसेनेकडून महाराष्ट्र विधानपरिषदेवर निवडून गेले होते. उतारवयात ते मधुमेह व अल्झायमराने आजारी होते. जुलै ११, इ.स. २००९ रोजी मुंबईत त्यांचे निधन झाले.

कारकीर्द

संपादन

अशी ही बनवाबनवी, अष्टविनायक, गंमत जंमत, तू सुखकर्ता, धुमधडाका, नवरी मिळे नवऱ्याला, पैजेचा विडा यांसारख्या मराठी चित्रपटांसाठी नांदगावकरांनी गीतलेखन केले.

शांताराम नांदगावकर यांची गाजलेली गीते

संपादन
 • अनुरागाचे थेंब झेलती प्रीत-लतेची पानें (संगीत - अशोक पत्की; गायिका - अनुराधा पौडवाल)
 • अशी नजर घातकी बाई
 • अशीच साथ राहू दे
 • अश्विनी ये ना
 • अष्टविनायका तुझा महिमा कसा (सहकवयित्री - शांता शेळके; संगीत - अनिल-अरुण; गायकः अनुराधा पौडवाल, पंडित वसंतराव देशपांडे)
 • असाच यावा पहाटवारा
 • इवले इवले जीवही येती
 • कुठं कुठं जायाचं हनिमुनला
 • गा गीत तू सतारी
 • झुंजुर-मुंजुर पाऊस माऱ्यानं
 • तळव्यावर मेंदीचा अजून
 • तू गेल्यावर असे हरवले
 • दर्यावरी रे तरली होरी
 • दलितांचा राजा भीमराव माझा.. त्यानं माणसाला माणुसकी दावली
 • दाटून कंठ येतो
 • दोन बोक्यांनी आणला हो
 • धुंदित गंधित होउनि
 • नवरंग उधळीत ये नभा
 • पाहिले न मी तुला
 • प्रथम तुला वंदितो
 • प्रभू मी तुझ्या करांतिल
 • प्रिया आज आले
 • प्रिये, जगू कसा तुझ्याविना मी राणी गं (गायक : किशोर कुमार)
 • प्रीतिच्या चांदराती
 • बंदिनी स्‍त्री ही बंदिनी
 • बे एके बे, बे दुणे चार
 • बेधुंद या आसमंतात
 • मी आले रे
 • मी एक तुला फूल दिले
 • मी नयन स्वप्‍नवेडा
 • मीरेचे कंकण भक्तीचे दर्पण (संगीत -श्रीनिवास खळे, गायिका - कृष्णा कल्ले)
 • मी वाऱ्याच्या वेगाने आले
 • मुरलीधर घनश्याम सुलोचन
 • या दुनियेमध्ये थांबायला वेळ कोणाला…? (गायक - सुनील गावसकर)
 • येऊ कशी प्रिया
 • रजनीगंधा जीवनी या
 • रातराणी गीत म्हणे गं
 • रात्र आहे पौर्णिमेची
 • रामप्रहरी राम गाथा
 • रुपेरी वाळूत माडांच्या बनात
 • लक्ष्मी तू या नव्या
 • विसर प्रीत विसर गीत
 • वृंदावनात माझ्या ही तुळस
 • श्रीरंग सावळा तू
 • सजल नयन नितधार बरसती
 • ससा तो ससा की कापूस जसा (गायिका : उषा मंगेशकर, संगीत : अरुण पौडवाल)
 • सांज रंगात रंगून जाऊ
 • सावळ्या हरिचे घेइ सदा
 • सूर सनईत नादावला
 • हरी नाम मुखी रंगते
 • हसलीस एकदा भिजल्या
 • ही नव्हे चांदणी
 • हे चांदणे ही चारुता
 • हे जीवन म्हणजे क्रिकेट, राजा हुकला तो संपला (गायक - सुनील गावसकर)
 • हे सावळ्या घना
 • ह्या शिवाय सण १९८७ साली डॉ बाबासाहेब आंबेडकरांवर दलितांचा राजा ह्या अलबम साठी अप्रतिम अशी गाणी लिहिलेली आहे.

बाह्य दुवे

संपादन