शिवसेना
शिवसेना | |
---|---|
पक्षाध्यक्ष | एकनाथ शिंदे |
स्थापना | १९ जून १९६६ |
मुख्यालय | शिवसेना जनसंपर्क कार्यालय, मुंबई, महाराष्ट्र |
विभाजन | शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) |
युती | भारतीय जनता पक्ष |
लोकसभेमधील जागा | १९/५४५[१] |
राजकीय तत्त्वे | राजकारण, सत्ता |
प्रकाशने | सामना, मार्मिक, दोपहर का सामना |
संकेतस्थळ | शिवसेना.ऑर्ग |
शिवसेना हा महाराष्ट्रातील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. शिवसेनेची स्थापना बाळ ठाकरे यांनी १९ जून १९६६ रोजी केली.[२] मुंबई मध्ये मराठी माणसांवर होणारा अन्याय अत्याचाराच्या विरोधात शिवसेनेची स्थापना झाली. १७ फेब्रुवारी २०२३ च्या निवडणूक आयोगाच्या निकालानुसार या पक्षाचे अध्यक्षपद एकनाथ शिंदे यांच्याकडे आले आहे.
शिवसेनेने १९८९ साली बाळासाहेब ठाकरे, प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे यांच्या नेतृत्वाखाली भाजप पक्षा बरोबर युती केली व १९९५ साली महाराष्ट्रात शिवसेना भाजप युतीचे सरकार अस्तित्वात आले व शिवसेनेचे मनोहर जोशी हे राज्याचे मुख्यमंत्री झाले. तसेच केंद्रात १९९९ साली अस्तित्वात आलेल्या अटल बिहारी वाजपेयी यांच्या सरकारमध्ये सेनेचे मनोहर जोशी हे लोकसभा अध्यक्ष होते. २०१४ साली शिवसेना व भाजप यांची युती तुटली दोन्ही पक्ष वेगळे लढले व पुन्हा एकदा एकत्र येत सरकार स्थापन केले. २०१९ साली शिवसेनेचे १८ खासदार निवडून आले, विधानसभा निवडणूक दोन्ही पक्षांनी एकत्र लढवली पण मुख्यमंत्री पदावरून दोघांमध्ये वाद झाला व शिवसेनेने युती तोडली. शिवसेनेने राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस यांच्या बरोबर महाविकास आघाडी स्थापन केली व उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे १९वे मुख्यमंत्री झाले. महाराष्ट्र सरकारमध्ये काँग्रेसकडे विधानसभा अध्यक्ष पद, तर राष्ट्रवादी काँग्रेसकडे उपमुख्यमंत्री पद होतं. मात्र २१ जून २०२२ रोजी शिवसेनेचे नेते 'एकनाथ शिंदे' यांनी पक्षातील ४० व अपक्ष आमदारांसोबत बंड केले व २९ जून रोजी महाविकास आघाडी सरकार पडले. सध्या राज्यात शिंदे गट व भाजप असे युतीचे सरकार आहे. मुख्यमंत्रीपद शिंदे गटाकडे व उपमुख्यमंत्री आणि विधानसभा अध्यक्ष ही दोन्ही पदे भाजपकडे आहे.
निवडणूक चिन्ह
संपादन"धनुष्यबाण" हे शिवसेनेचे निवडणूक चिन्ह आहे.
- १९६८ : प्रजासमाजवादी पक्ष. ही युती १९७०पर्यंत टिकली. ही युती मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी होती.
- १९६९ : काँग्रेसचे इंडिकेट आणि सिंडिकेट हे दॊन्ही गट
- १९७२ : रिपब्लिकन पक्ष (रा,सु. गवई गट)
- १९७२ : मुस्लिम लीग (मुंबई महापालिकेच्या निवडणुकीपुरती)
- १९७४ : काँग्रेस
- १९७७ : दलित पँथर (काही काळापुरती)
- १९७७ : काँग्रेस. ही युती १९८० साली तुटली.
- १९९० ते २०१९ : भाजप
- २००७ आणि २०१२ : काँग्रेस
- २००८ : राष्ट्रवादी काँग्रेस
- २४ नोव्हेंबर २०१९ ते २९ जून २०२२ : काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस.
- ३० जून २०२२ पासून : भाजप
संदर्भ
संपादन- ^ "शिवसेना खासदार" (PDF).
- ^ Berger, Peter; Heidemann, Frank (3 June 2013). The Modern Anthropology of India: Ethnography, Themes and Theory. Routledge. p. 179. ISBN 978-1-134-06111-2.
- ^ "शिवसेनेनं आजपर्यंत कुणा-कुणाशी केल्या युती व आघाडी!". लोकसत्ता. 2022-07-09 रोजी मूळ पानापासून संग्रहित.
- ^ "MIMला विरोध, पण शिवसेनेची मुस्लिम लीगसह सेक्युलर पक्षांशीही अनेकदा युती, इतिहास काय सांगतो?". टीव्ही९ मराठी.
पुस्तके
संपादन- शिवसेना या विषयावरचे इंग्रजी पुस्तक, लेखिका मेरी कॅटझेन्स्टाइन (१९८२)
- शिवसेना या विषयावरचे इंग्रजी पुस्तक, लेखक दीपांकर गुप्ता (१९८२)
- शिवसेना या विषयावरचे मराठी पुस्तक, ’जय महाराष्ट्र! हा शिवसेना नावाचा इतिहास आहे’ लेखक प्रकाश अकोलकर (१९९८)
- शिवसेना या विषयावरचे मराठी पुस्तक, ’जय महाराष्ट्र! हा शिवसेना नावाचा इतिहास आहे’ लेखक प्रकाश अकोलकर (२०१३)
- दी डॅशिंग लेडीज ऑफ शिवसेना : पॉलिटिकल मॅट्रोनेज इन अर्बनायझिंग इंडिया (इंग्रजी पुस्तक, लेखिका तारिणी बेदी)
- सॅफ्रन टाईड (इंग्रजी पुस्तक, लेखक किंगशुक नाग)
- सम्राट (इंग्रजी पुस्तक, लेखिका सुजाता आनंदन)
- बाळ ठाकरे (इंग्रजी पुस्तक, लेखक वैभव पुरंदरे)
- बॉम्बे मेरी जान (इंग्रजी पुस्तक, लेखक जेरी पिंटो आणि नरेश फर्नांडिस)
- महाराष्ट्रातला सत्तासंघर्ष (लेखक - सुहास पळशीकर आणि सुहास कुलकर्णी)
- सुवर्ण महोत्सवी सेना (लेखक - विजय सामंत आणि हर्षल प्रधान)
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |